डोळे लाल होणे म्हणजे काय?
डोळे लाल होणे हे एक डोळ्यांच्या काही समस्यांचे एक लक्षण आहे. यातील काही समस्या किरकोळ असतात तर काही वेदनादायक आणि गंभीर असतात. सूज येऊन कन्जंक्टीव्हायटिस नावाचा संसर्ग झाल्यापासून ते सबकन्जंक्टीव्हायटल हॅमरेज नामक डोळ्यांमधील रक्तसत्राव यासारख्या विविध कारणांमुळे डोळे लाल होतात.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
लाल डोळ्यांशी संबंधित मुख्य चिन्हे आणि लक्षणे खालील प्रमाणे आहेत:
- वेदना.
- सूजलेले डोळे.
- डोळे खाजवणे, कधी कधी पाणी येणे.
- तीव्र डोकेदुखी.
- प्रकाशाची संवेदनशीलता.
- काही गंभीर प्रकरणात बघण्याचा दृष्टीक्षेप बदलल्याची पण तक्रार दिसून येते.
याचे मुख्य कारणं काय आहे?
लाल डोळ्यांची कारण पुढील प्रमाणे आहेत:
- डोळ्यात बाह्य कण जाणे, ॲलर्जी किंवा रोगप्रतिकारशक्तीची प्रतिक्रिया.
- दुखापत जी बोचणारी किंवा सपाट असू शकते.
- रासायनांमुळे जळजळ.
- डोळ्यातील रक्त वाहिन्या फुटणे.
- व्हायरल किंवा जिवाणूजन्य संसर्ग
- कन्जक्टीव्हायटीस, कॅलाझिऑन,आणि केराटायटीस.
- ग्लॉकोमा, युव्हेटिस आणि कॉर्नियल अल्सर मुळे डोळे वेदनादायक आणि लाल होतात.
- ॲस्पिरिन किंवा वॉरफरिन सारखी औषधे.
- रक्तसत्राव होणे हे जसे की सबकन्जक्टीव्हायटल हॅमरेज जी एक वैद्यकीय इमर्जन्सी आहे.
याचे निदान व उपचार कसे केले जाते?
वैद्यकीय लक्षणांचा इतिहास बघून संसर्गाचा कालावधी व प्रमाण व संबंधित वेदनेची तीव्रता बघून डॉक्टर डोळ्यांची पूर्ण तपासणी करतात.त्यासाठी ते खालील चाचण्या करायला सांगतात:
- दृष्टी.
- बाह्य डोळ्यांचा स्नायूचीं हालचाल.
- इंट्राऑक्यूलर दबाव.
- स्लिट लँप चाचणी.
- कॉर्नियावरचा ओरखडा, घर्षण,सूज/एडिमा.
- पापण्या आणि आसवांच्या पिशवीचे परिक्षण.
लाल डोळयांचे व्यवस्थापन संपूर्णपणे कारणांवर अवलंबून असते. त्यात हे समाविष्ट असू शकतात:
- घरगुती व्यवस्थापन, जसे:
- डोळे बंद करुन त्यावर कॉल्ड कंप्रेस किंवा ओले कापड वापरणे.
- डोळ्यांना हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे आणि रोज नवीन चादर व टॉवेल वापरणे.
- ॲलर्जीचे ट्रिगर्स किंवा इरीटंट्स टाळणे.
- डोळ्यात बाह्य कण गेल्यास ते काढणे.
- औषधींनी व्यवस्थापनात हे समाविष्ट आहे:
- संसर्गजन्य प्रकरणात ऑप्थॅल्मिक अँटीबायोटीक.
- ॲलर्जीसाठी अँटीहिस्टामाइन / व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर एंजट.
- अँटी इन्फ्लेमेटरी औषधे, कोरड्या डोळ्यांसाठी कृत्रिम अश्रू आणि ल्युब्रिकंट्स.
- ग्लॉकोमा असल्यास रक्तदाब कमी करणारी औषधे.
- गंभीर प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया.