सारांश
रेबीज हा आजार अशा विषाणूंमूळे होतो, जे रेबीजग्रस्त प्राण्याच्या लाळेच्या माध्यमातून पसरतात. रेबीजचे बरेच वाहक आहेत, ज्यात सर्वात अधिक आहेत कुत्री आणि वटवाघुळे. विषाणूग्रस्त प्राण्याच्या चाव्याने किंवा त्याची लाळ उघड्या जखमेच्या संपर्कात आल्यास पसरतात. एकदा पसरले की विषाणू शरीरात निवास करायला सुरु करातात आणि मज्जातंतू प्रणालीवर आक्रमण करून कोमा किंवा उपचार न केल्यास शेवटी मृत्यूस कारणीभूत ठरतात. रेबीजचे दोन प्रकार आहेत- आक्रमक आणि परजीवी. रेबीजच्या प्रमूख लक्षणांमध्ये प्रकाशाप्रतीची संवेदनशीलता, वेदना आणि स्नायूं अकडणे,लाळेचे अतिप्रमाणात गळणे, आणि पाण्याची भीती वाटणे समविष्ट आहे. आजारांच्या प्रगत चरणांमध्ये, कोमा किंवा पक्षघात होण्याची भीती अधिक असते. रेबीजच्या उपचारांमध्ये संपूर्ण ग्रस्त भागाला धुणे, आणि रेबीजरोधक लसींच्या मात्रा पुढील काही आठवडे घेणे समाविष्ट आहे. रेबीजचा उपचार वेळेत न झाल्यास काही गंभीर परिणाम होण्याच्या शक्यता असतात. काहींना झटके येणे,श्वसन थांबणे,आणि मेंदूवर सूज येण्याचा अनुभव येतो. रेबीज पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि वेळेत उपचार झाल्यास रेबीज झालेले लोक सुदृढ व सामान्य जीवन जगू शकतात.