सोरायटिक संधिवात (आर्थरायटीस) काय आहे?
सोरायसिस ही त्वचेची दीर्घकालीन स्थिती आहे ज्यात त्वचा लालसर आणि खवलेदार बनते. सोरायटिक संधिवात (आर्थरायटीस) हे सांध्यांमध्ये होणारी दाह (सूज) आहे जी सोरायसिस असलेल्या लोकांमध्ये उद्भवते; प्रभावित सांधे सूजतात आणि बऱ्याचदा खूप वेदनादायी असतात. सामान्यतः, संधिवातच्या लक्षणांचा विकास होण्याआधी सोरायटिक संधिवात (आर्थरायटीस) असलेल्या लोकांना काही वर्षांपूर्वी सोरायसिस होतो.
त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
या प्रकारच्या संधिवातामध्ये चिन्हे आणि लक्षणे वेगवेगळ्या प्रकरणात वेगवेगळी असतात. या स्थितीत लोकांमधे आढळणारी सर्वात सामान्य चिन्हे आणि लक्षणे आहेत:
- सुजलेले किंवा ताठर सांधे.
- स्नायूंमध्ये वेदना.
- त्वचेवर खवलेदार डाग.
- हाताचे बोट, पायाचे बोट, मनगट, टाच (पाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा) आणि कोपर यासारख्या लहान सांध्यांचा समावेश.
काही प्रकरणांमध्ये डोळ्याच्या समस्या देखील उद्भवू शकतात, त्यात कंजंक्टीव्हायटिस आणि यूव्हआयटीस सर्वात सामान्य आहे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
सोरायसिसपासून निदान मिळालेल्या लोकांमध्ये सहसा काही वेळा नंतर सोरायटिक संधिवात (आर्थरायटीस) उद्भवतो. सोरायटिक संधिवात (आर्थरायटीस) जसे की सोरायसिस, हा तेव्हा उद्भवतो जेव्हा रोगप्रतिकारक प्रणाली निरोगी टीशुंवर हल्ला करतात. म्हणूनच याला ऑटोइम्युन स्थिती (स्वयंप्रतिकार स्थिती) म्हणतात. या हल्ल्यांना कशामुळे चालना मिळते हे स्पष्ट नाही, परंतु अनुवांशिक घटक आणि पर्यावरणीय घटक यांचे मिश्रण जसे की ताण, व्हायरस किंवा एखादी दुखापत यामागे भूमिका बजावते असा विचार आहे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
सांध्यांच्या समस्या किंवा ताठरतेच्या लक्षणांवर आधारीत, डॉक्टर चाचण्या करण्याचा सल्ला देऊ शकतात आणि व्यक्तीला पुढील मूल्यांकनसाठी वैयक्तिक संधिवातशास्त्रज्ञांचा (रुमॅटोलॉजिस्ट) संदर्भ देऊ शकतात. संधिवाताचा प्रकार ओळखण्यासाठी काही सामान्य चाचण्या केल्या जातात जसे की एक्स-रे आणि रक्त तपासणी ज्याद्वारे इरिथ्रोसाइटस सेडीमेन्टेशन दर आणि सी-रीएक्टिव्ह प्रोटीनची वाढलेली पातळी बघता येते.
एक विशिष्ट औषध संधिवाताच्या प्रत्येक बाबतीत काम करू शकत नाही, म्हणून योग्य आणि प्रभावी औषध मिळण्याअगोदर अनेक औषधांची चाचणी केली गेली असू शकते. हालचाली आणि सांध्यांच्या समस्येत मदत करण्यासाठी शारीरिक उपचारासह अँटी-इंफ्लॅमेटरी आणि अँटी-रिह्युमेटिक औषधे निर्धारित केली जाऊ शकतात.कॉर्टिकोस्टिरॉईड्स, बायोलॉजिक्स किंवा इम्यूनोस्प्रेशन्स सारखी औषधे देखील निर्धारित केल्या जाऊ शकतात.
संधिवात, बऱ्याच बाबतीत, सतत असतो आणि त्यापासून पूर्णतः सुटका मिळवणे आव्हान असू शकते परंतु योग्य औषधोपचार आणि थेरपीसह, याचे पुन्हा बळावणे टाळता येते.