सिट्टाकॉसिस काय आहे?
सिट्टाकॉसिस किंवा पॅरोट फिव्हर हा एका प्रकारचा संसर्ग आहे जो क्लॅमिडिया सिट्टाकी नावाच्या जीवाणूमुळे होतो. हा जीवाणू पक्ष्यांना, विशेषत: पोपट, चिकन, टर्की, पॅराकेट्स, कबूतर, कॉकटेल आणि इतर उडणाऱ्या पक्ष्यांना संसर्गित करतो. संसर्गित पक्ष्यांच्या संपर्कात आलं तर मानवांना देखील हा संसर्ग होऊ शकतो.
त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
काही संसर्गित लोकांवर कोणतीही चिन्हे किंवा लक्षणे दिसत नाहीत; मात्र, इनक्युबेशन (रोगजंतूंनी शरीरात प्रवेश मिळविल्यानंतर प्रत्यक्ष रोग आरंभ होईपर्यंत काळ) कालावधीनंतर, सामान्य लक्षणे जी सिट्टाकॉसिसकडे लक्ष केंद्रित करतात ती अशी आहेत:
- फ्लू सारख्या लक्षणांसोबत ताप आणि थंडी.
- मळमळ आणि उलटी.
- अतिसार.
- थकवा आणि अशक्तपणा.
- सांधे आणि स्नायूंच्या वेदना.
सिट्टाकॉसिसमध्ये फ्लू-सारखी लक्षणं दिसतात पण हे लक्षात ठेवले पाहिजे की उपरोक्त कोणत्याही पक्ष्यांसोबत, खासकरुन वन्य क्षेत्रात आढळून येण्याच्या पक्ष्यांच्या संपर्कात येण्याच्या 9 -15 दिवसांच्या आत हे लक्षणे सुरू होतात.
याची मुख्य लक्षणं काय आहेत ?
मुख्य किंवा विशेषकरून सांगायचे झाल्यास सिट्टाकॉसिस होण्याच्या एकमेव कारणांमध्ये संसर्गित किंवा आजारी पक्ष्यांच्या संपर्कात येणे होय. पक्षी हा क्लॅमिडिया सिट्टाकी ने संसर्गित आहे का, हे तपासण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे खालील चिन्हांसाठी पक्ष्यांचे निरीक्षण करणे:
- थरथरण्यासोबत डोळ्यातून आणि नाकातून डिस्चार्ज.
- आळस, झोप येणे.
- कमी खाणे किंवा पूर्णतः खाणे बंद करणे.
- वेगवेगळ्या रंगाचे (हिरव्या रंगाची विविध छटा) मूत्र किंवा मल.
- अतिसार.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?
सिट्टाकॉसिसचे निदान सामान्य नाही आणि प्रभावित व्यक्तीस अलिकडील कोणत्याही संसर्गित पक्ष्यासोबत संपर्कात आल्या बद्दल डॉक्टरला सांगणे आवश्यक आहे. सिट्टाकॉसिसच्या निदानसाठी केल्या जाणाऱ्या चाचण्यांमध्ये सामान्य रक्त तपासणी आणि स्पटम कल्चर समाविष्ट आहे.
बॅक्टेरियाच्या अँटीबॉडीजच्या अस्तित्वाची पुष्टी करण्यासाठी अँटीबॉडी टायटर चाचणीची मागणी केली जाऊ शकते. शरीरात जीवाणूसारख्या बाहेरील पदार्थ (अँटीजन) शोधल्यानंतर रोगप्रतिकारक प्रणाली अँटीबॉडीज तयार करण्यास प्रारंभ करते. मानवी शरीरात अँटीबॉडी आणि त्याच्या पातळीतील बदल देखील सिट्टाकॉसिसच्या निदानची पुष्टी करतात.
अँटीबायोटिक्ससह उपचार - डॉक्सिसायक्लिन आणि टेट्रासाइक्लिन हे सिट्टाकॉसिसचा उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वात सामान्य औषधी आहेत. ताप कमी झाल्यानंतर दीर्घ काळापर्यंत अँटीबायोटिक कोर्स सुरू होतो. पुनर्प्राप्ती जास्त वेळ घेते परंतु पूर्ण होते.