पिंटा काय आहे ?
पिंटा जो अझुल, टीना, आणि लोटासारख्या इतर नावांनी ओळखला जातो हा दुर्मिळ संसर्गजन्य रोग आहे जो त्वचेवर परिणाम करतो. मेक्सिकोमधे सोळाव्या शतकात हा रोग पहिल्यांदा नोंदविला गेला होता. सध्याच्या काळात पिंटाची जास्य प्रकरणे नोंदवली जात नाही कारण हा अतिशय दुर्मिळ झाला आहे.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत ?
पिंटा एखाद्या व्यक्तीस तीन टप्प्यांमध्ये प्रभावित करतो:
- प्रारंभिक टप्प्यात, व्यक्तीच्या हात आणि पाय आणि शरीराच्या इतर भागांवर लाल ठिपके आणि जखम होतात. हे ठिपके किंवा पॅपुल्स (पुटकुळी किंवा त्वचेवर उठलेली घट्ट लहान पुळी) यावर खाज सुटू शकते आणि ते आकारात मोठे होऊ शकतात.
- द्वितीय टप्प्यात हा द्वितीय त्वचेच्या (सेकंडरी स्किन) उद्रेक (जोराने बाहेर निघाल्याने) होण्याने ओळखले जाते ज्याला पिंटीड्स म्हणतात.
- पिंटाचा शेवटचा टप्पा सुरुवातीच्या टप्प्याच्या 2-5 वर्षानंतर होऊ शकतो आणि पांढऱ्या किंवा रंगहीन जखमा तयार होण्याचा त्यात समावेश होतो. व्यक्तीवर जाड आणि कोरडी त्वचा देखील विकसित होऊ शकते जी पॅची आणि सुरकुत्या असलेली दिसू शकते.
याची मुख्य कारणं काय आहेत ?
पिंटा हा ट्रॅपोनेमा कॅरेटियम या जिवाणूमुळे होतो आणि हा जीव थेट संपर्काच्या माध्यमातून पसरतो. वैयक्तिक स्वच्छता आणि सभोवतालच्या स्वच्छतेमध्ये सुधारणा केल्यामुळे, या जीवाचे अस्तित्व जवळ-जवळ अज्ञात झाले आहे. मात्र ही स्थिती काही विकसनशील देशांमध्ये अद्याप संसर्गजन्य (विशिष्ट ठिकाणी असलेल्या लोकांना होणारा रोग) आहे जसे काही आफ्रिकेतील देश.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?
पिंटाच्या निदानात बराच वेळ लागू शकतो कारण त्याच्या प्रारंभिक अवस्थेत याचा त्वचेच्या इतर विकारांसोबत गोंधळ होऊ शकतो. त्या व्यक्तीला संसर्गजन्य परिसरात रोगाची बाधा झाली आहे का हे तपासण्यासाठी प्रवासाच्या इतिहासाबद्दल विचारणा करून डॉक्टर तपशीलवार इतिहास घेतात. इतर निदान चाचणींमध्ये खालील समाविष्ट आहे:
- रक्त तपासणी.
- टीश्युच्या नमुन्यांचे परीक्षण.
पिंटाचा उपचार सहसा अँटिबायोटिक्सने केला जातो, जे जिवाणू नष्ट करण्यात आणि त्याद्वारे लक्षणे दूर करण्यात फार प्रभावी असतात. पिंटा जो शेवटच्या टप्प्यात माहिती होतो त्याचा निदान होण्यास तुलनेने जास्त वेळ लागू शकतो. हा रोग अमेरिकेत प्रचलित नाही परंतु उष्णकटिबंधीय भागात आढळू शकतो, म्हणूनच या प्रदेशांमधून येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांची चाचणी केली जाते जर त्यांना या लक्षणांचा अनुभव येत असेल तर.