मायकोसिस फँगगोईड्स म्हणजे काय?
मायकोसिस फँगगोईड्स हा पांढऱ्या रक्त पेशींच्या रक्ताचा कर्करोगाचा एक प्रकार आहे. हा भारतातील नॉन-हॉजकिन लिम्फोमाचे सर्वात सामान्य प्रकार आहे. मायकोसिस फँगगोईड्स प्रामुख्याने त्वचेवर परिणाम करतात आणि घाव निर्माण करतात. हे सर्वसाधारणपणे 40 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये दिसून येते. मुले आणि तरुण देखील प्रभावित होतात. अहवाला नुसार पुरुष हे स्त्रियांपेक्षा अधिक सामान्यपणे प्रभावित असल्याचे दिसून येतात.
त्याचे मुख्य चिन्हं आणि लक्षणं काय आहेत?
त्वचेच्या जखमा हे सर्वात सामान्य लक्षणं आहेत. त्वचेच्या जखमांच्या प्रकार आहेत:
- त्वचेवर लाल पॅच.
- रॅशेस.
- वाढलेली अडथळे.
- उंच किंवा कठोर पॅच.
जखम सामान्यत: छाती, उदर, नितंब, वरची मांडी आणि स्तनाच्या क्षेत्रात आढळतात आणि जळजळ आणि वेदना यांच्याशी संबंधित असतात. हे त्वचेचे जखम इतर त्वचेच्या विकारांसारखे दिसते जसे की एक्झामा आणि सोरायसिस.
नंतरच्या टप्प्यात, अशक्तपणा, ताप, वजन कमी होणे, आतड्यांसंबंधी अल्सर, डोळ्यात वेदना आणि अस्पष्ट दृष्टी यासारखे लक्षणे येऊ शकतात.
मुख्य कारणं काय आहेत?
मायकोसिस फँगगोईड्सचे अचूक कारण अजून स्पष्ट झालेले नाही आहे. या स्थितीत, टी-पेशी, एक प्रकारच्या पांढ-या पेशीं कर्करोगासारखे बनतात आणि त्वचा प्रभावित करतात. जरी त्वचा समाविष्ट असेल, तरी त्वचेच्या पेशी कर्करोगासारख्या नसतात. प्रभावित व्यक्तींमध्ये काही विशिष्ट जीन्समध्ये असामान्यता सामान्यतः पाहिली जाते.
संशोधकांनी सुचविलेले इतर कारण पुढीलप्रमाणे आहेत:
- हानिकारक पदार्थांच्या (कॅर्सिनोजेन ) संपर्कात.
- जीवाणू किंवा विषाणू चे संसर्ग (बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन).
याचे निदान आणि उपचार कसे केले जाते?
तुमचे डॉक्टर (त्वचा विशेषज्ञ) तुमच्या त्वचेची संपूर्ण तपासणी करतील आणि रक्ताच्या पेशींमध्ये असामान्यता ओळखण्यासाठी रक्त तपासणी करतील. बायोप्सी, अशी एक प्रक्रिया आहे जी निदानाच्या हेतूने जखमांमधून पेशी काढून टाकते, तुमचे डॉक्टर याची शिफारस करतील. बायोप्सीमार्गे घेतलेले सेल मायकोसिस फँगगोईड्सचे निदान करण्यासाठी तपासणीसाठी पाठवले जातात. काही वेळा तुमचे डॉक्टर बायोप्सीद्वारे प्राप्त झालेल्या चाचणी परिणामांची पुष्टी करण्यासाठी प्रथिने चाचणीची शिफारस करतील. जीन चाचणी जीन्समधील कोणत्याही फरक ओळखण्यास मदत करते, जेव्हा इतर चाचण्यांचे परिणाम स्पष्ट होत नाही.
तुमच्या आजाराच्या स्थितीनुसार तुमचे डॉक्टर कॉर्टिकोस्टेरॉईड, अल्ट्राव्हायलेट उपचार, फोटोकेमो थेरेपी आणि इतर औषधे यांची शिफारस करतील.