स्नायूंचे आखडणे म्हणजे काय?
स्नायू आखडणे म्हणजे अचानक,अनियंत्रित, एक किंवा अनेक स्नायूंचे आखडणे होय. हे आखडणे सामान्यपणे व्यायामानंतर होते व त्याला लवकर आराम मिळत नाही. पायाच्या स्नायूंचे आखडणे हे सर्वात सामान्य पणे दिसून येणारे असते. याशिवाय स्नायू आखडणे हे मुख्यतः पाय, हात, दंड, पोट व पोटऱ्यां मध्ये दिसून येते. वयस्कर माणसे, धावपटू, गर्भवती महिला आणि मेंदू व थायरॉईड विकार असणाऱ्यांमध्ये स्नायूंचे आखडणे दिसून येते.
याच्याशी संबंधित मुख्य चिन्हं आणि लक्षणं काय आहेत?
याची लक्षणे स्नायूंच्या आखडण्याच्या तीव्रतेवर अवलंबून असतात. उदा. कमी तीव्रतेचे दुखणे किंवा अस्वस्थ करणारे दुखणे. स्नायूंचे आखडणे हे त्वचेच्या खालील भागात होते ज्यामुळे अवघडल्याची भावना निर्माण होते. ते काही सेकंदासाठी राहतात पण बऱ्याच मिनिटापर्यंत वाढू शकतात. ते पूर्णपणे बरे होण्याआधी बऱ्याच वेळ जाणवू शकतं. स्नायूंचे आखडणे हे घाम, जखमा किंवा इतर कारणांशी संबंधित असतात.
याची मुख्य कारणं काय आहेत?
काहीवेळेस स्नायू आखाडण्याच्या मागील कारणे कळू शकत नाहीत. तरीही काही माहीत असलेली व सामान्य कारणे पुढीलप्रमाणे आहेत:
- स्नायूंमध्ये वात येणे.
- अतिसार.
- इलेक्ट्रोलाईट चे प्रमाण कमी होणे जसे मॅग्नॆशियम, सोडियम, कॅल्शिअम व पोटॅशियम.
- स्नायूंना रक्तपुरवठा कमी होणे.
- डायलिसिस.
- काही औषधे.
- गरदोरपणा.
- अपघात किंवा जखमेमुळे मज्जातंतू दाबले जाणे.
- अती कष्ट.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
निदान करताना स्नायू आखडण्याची स्थिती जाणून घेतली जाते. त्यामध्ये पुढील चाचण्या केल्या जातात:
- शारीरिक चाचणी.
- स्नायूंची बायोप्सी.
- इलेक्ट्रोमायोग्राम.
- मज्जा तंतूंच्या नसांचा अभ्यास.
- क्रिएटीनिन किनसे रक्त तपासणी.
सामान्यपणे स्नायू आखडण्याला कोणतीही विशिष्ट चाचणी ची गरज नसते व ते बरे होऊ शकते:
- मसाज व स्नायूंच्या ताणण्या मुळे.
- द्रव्याचे प्रमाण वाढवून, अतिसार वाटत असल्यास क्षारांचा समावेश करावा.
कठीण स्नायूंवर गरम शेक किंवा बर्फाने शेकले जाऊ शकतात.
तुमच्या डॉक्टर कडून स्थितीनुसार औषधे दिली जातात. तुम्ही बऱ्याच प्रमाणात द्रव्यांचे सेवन करून व ताणून स्नायूंचे आखडणे थांबवू शकता.