सारांश
माइग्रेन एक मज्जातंत्रीय अवस्था आहे, ज्यामध्ये पुनरावर्ती, तीव्र ते सौम्य प्रकारच्या डोकेदुखींची वैशिष्ट्यपूर्ण मालिका अनुभवली जाते. माइग्रेनमुळे साधारणपणें डोक्याच्या एका बाजूला थोपटण्यासारखा त्रास होतो. हे लक्षात आले आहे की, माइग्रेनची तीव्र लक्षण असलेली व्यक्ती अंधारात, आणि अधिक करून शांत जागेत पूर्ण विश्रांती घेऊ इच्छिते. काही लोकांमध्ये माइग्रेनपूर्वी व त्यावेळी, लाइट फ्लॅश, काही ठिकाणी अंधार दिसणें, बाह किंवा पायात झिणझिण्या, आणि सोबत मळमळ आणि उलटीही येऊ शकते. माइग्रेनवर संपूर्ण औषधोपचार उपलब्ध नसले, तरी काही औषधे, जीवनशैली बदल इ. माइग्रेनची वारंवारता व तीव्रता कमी करू शकतात.