Malnutrition - Malnutrition in Marathi

Malnutrition
Malnutrition

सारांश

कुपोषण म्हणजे दोषपूर्ण असे पोषण. कुपोषण हे अती पोषण आणि अल्प पोषण असे दोन्ही असू शकते. अल्प पोषण जगभर लक्षावधी लोकांना भेडसावणारी अशी समस्या आहे. हे लेख मुख्यत्त्वे अल्प पोषणावर केंद्रित आहे, कारण ते जगभर मोठ्या प्रमाणात आढळते. कुपोषण अधिकतर मुले आणि प्रौढांच्या एकूण आरोग्यावर प्रभाव पाडते. कुपोषणाची लक्षणे म्हणजे वजनात असामान्य बदल, थकवा, दैनंदिन गतिविधी करण्यात असामर्थ्य आणि अशक्त एकाग्रता. काही प्रकरणांमध्ये, कुपोषणाचे निदान करणें कठीण असू शकते, कारण काही विशेष लक्षणे नसतात. कुपोषणामागे अयोग्य खाद्य सवयी, सामाजिक-आर्थिक घटक आणि वर्तमान आरोग्य अवस्था असू शकतात. उपचार न केल्यास, कुपोषणामुळे मुले तसेच, प्रौढांमध्येही गंभीर गुंतागुंती होऊ शकतात. कुपोषणाच्या उपचारानंतर बहुआयामी पद्धत अवलंबावी लागते, ज्यामध्ये निरोगी आहार घेणें तसेच नियमित आरोग्य तपासणी करून घेणें सामील असते. उपचारादरम्यान मित्र व कुटुंबीयांचे निरंतर समर्थनसुद्धा चांगल्या उपचार परिणामासाठी आवश्यक आहे. सामाजिक स्तरावर, अशक्त सामाजिक-आर्थिक घटकांना वैद्यकीय मदत आणि खाद्य संसाधने पुरवून कुपोषणाशी संबद्ध संख्या, गुंतागुंती आणि मृत्यूंना आळा बसू शकतो.

Malnutrition symptoms

कुपोषण किंवा अल्पपोषणाची लक्षणे पोषणिक कमतरतेवर आधारित असतात. मुलांमधील कुपोषणाची सामान्य व वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे खालीलप्रमाणें आहेत:

कुपोषणामुळे मानसिक कल्याणावरही प्रभाव पडते. या पैलूची लक्षणे याप्रमाणें असतील:

  • एकाग्रतेत समस्या
  • शिकण्यात समस्या
  • संभ्रम
  • लक्ष देण्यात अडचण.
  • सामान्य समस्या सोडवू न शकणें.

विशिष्ट पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे काही वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे विकसित होऊ शकतात.

उदा. लौहाच्या कमतरतेमुळे थकवा आणि खूप कमी एकाग्रता काळावधी असेल. मुलांमध्ये आयोडीन कमतरतेमुळे मानसिक गतिमंदता आणि सामान्य शारीरिक विकासामध्ये समस्या उद्भवू शकतात.

प्रौढ आणि किशोरांमधील कुपोषणाची लक्षणे (अल्पपोषण) खालीलप्रमाणें असू शकतात:

  • वजन कमी होणें
    वजन कमी होणें कुपोषणाचे सर्वांत सहज लक्षण आहे. तथापी, व्यक्तीचे वजन निरोगी किंवा अधिक असले, तरी ती व्यक्ती कुपोषित होणें शक्य आहे. अनैच्छिकरीत्या 5-10% शरिराचे वजन 3 ते 6 महिन्यांच्या आत कमी होणें अल्पपोषणाचे लक्षण कमी असू शकते. लक्षणीयरीत्या कमी शरीर-भार सूचकांकसुद्धा कुपोषणाचे सूचक असते.
  • वजन कमी होण्याशिवाय, इतर लक्षणे असू शकतात:
    • भूक कमी लागणें.
    • ऊर्जेचे अभाव.
    • सामान्यपणें सवय असलेल्या गोष्टी करू न शकणें.
    • अत्यल्प एकाग्रता
    • नेहमी थंडी वाजणें.
    • मूड स्विंग होणें.
    • मध्येमध्ये अवसाद जाणवणें.
    • जखमा बर्र्या होण्यास खूप वेळ लागणें.
    • निष्कारण आळस.
    • सारखे आजारी पडणें

Malnutrition treatment

कुपोषणावरील उपचार त्याचे कारण व गंभीरतेवर अवलंबून असते. एखाद्या व्यक्तीचे कुपोषणासाठी घरीच उपचार होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये, रुग्णालयात जावे लागू शकते. उपचाराचे प्रमुख उद्देश गुंतागुंती विकसित होण्याचा धोका कमी करणें असे असते.

घरी उपचार

  • उपचार घरी होणार असल्यास, आरोग्य निगा व्यावसायिकाला परत निरोगी होण्यासाठी करण्यात येणारे आहार बदल अधोरेखित करावे लागतील. तुम्हाला पोषण काळजी योजनाही दिली जाऊ शकते, जी तुमच्याकडून व कुटुंबाकडून काही माहिती घेतल्यानंतरच आखली जाईल.
  • पोषक तत्त्वे ग्रहण करण्यात टप्प्याटप्प्याने वाढ उदा. कार्बोदके, प्रथिने आणि वसा यांचा सल्ला दिला जाऊ शकतो. विशिष्ट पोषक तत्त्वाच्या कमतरतेच्या बाबतीत, पूरक तत्त्वाचाही सल्ला दिला जाऊ शकतो. आवश्यक अन्नाचे प्रमाण ग्रहण करण्यास एखादा अपयशी असल्यास, भोजननलिकेसारखे कृत्रिम उपायही योजावे लागू शकते. अशा नलिका रुग्णालयांमध्ये लावलेल्या असतात, पण त्या घरीही वापरता येतात.

रुग्णालयातील उपचार

  • डॉक्टराद्वारे सतत पर्यवेक्षण
  • पोषणतज्ञाची उपस्थिती
  • सल्लागाराची उपस्थिती
  • सामाजिक कार्यकर्त्याची उपस्थिती
  • अन्न खाण्याच्या आणि पचवण्याच्या व्यक्तीच्या क्षमतेचे मूल्यांकन केले जाऊ शकते. आवश्यक असल्यास, भोजननलिका वापरली जाऊ शकते. भोजननलिका नाकातून पोटामध्ये प्रविष्ट केली जाऊ शकते किंवा ती पोटामार्फत जठरामध्ये शस्त्रक्रियेद्वारे ठेवली जाऊ शकते. सामान्यतः व्यक्तीला योग्य मूल्यांकनानंतर सुटी दिली जाते. तथापी, आरोग्य प्रगतीचे अहवाल ठेवणें आणि चालू आहार योजना काम करत असल्याची खात्री करण्यासाठी दर आठवड्याला यायची गरज पडू शकते.
  • ठिबक पोषण
    यामध्ये ठिबकेचे वापर करून थेट रक्तनलिकेत पोषण दिले जाते. खाऊन जी पोषकतत्त्वे मिळत नाही, ती प्राप्त करण्यासाठी अशी व्यवस्था करतात. ठिबकातून जाणार्र्या द्रावणामध्ये गरजांप्रमाणें काही पोषक तत्त्वे आणि इलेक्ट्रॉलाइट असू शकतात.

जीवनशैली व्यवस्थापन

कुपोषणाचा सामना करण्यासाठी काही जीवनशैली बदल मदतीचे ठरू शकतात:

  • दर काही तासांनी थोडे थोडे जेवण करा. कमीत कमी दिवसांतून तीनदा भरपोट जेवण आणि काही अल्पोपहार मध्ये घ्या. याने ऊर्जास्तरही सुधारेल.
  • पर्याप्त प्रमाणात कार्बोदके, प्रथिने, वसा, जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेले आहार घ्या.
  • जेवण केल्यानंतर काही मिनिटांनी पाणी प्या. जेवणापूर्वी भरपूर पाणी पिल्याने पोट भरलेले वाटू शकते.
  • मद्यपान कमी करा.
  • वजन कमी असल्यास विशेषकरून, कॅफीन ग्रहण कमी करा.
  • दिवसभर ऊर्जावान वाटावे, म्हणून प्रथिनप्रचुर नाष्टा घ्या.
  • गोड पदार्थ टाळा.
  • फळे आणि कच्च्या भाज्या अधिक घेतल्याने पोषणस्तर सुधारेल. फळांमुळे गोड पदार्थांची उणीवही भरून निघते, आणि भाज्यांमध्ये प्रचुर प्रमाणात खनिजे आणि जीवनसत्वे असल्याने माणूस लवकर बरा होतो. आहारांमध्ये फळे घेण्याचे प्रयत्न करा, कारण त्यांमध्ये अधिक खनिजे किंवा कॅलॉरी नसतात.
  • अल्पोपहार म्हणून सुका मेवा घ्या आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा.
  • वजन वाढवायचे असल्यास, डेअरी उत्पाद उदा. अंडी, दुध, दही आणि चिझ घ्या.
  • लगेच ऊर्जा मिळण्यासाठी बटाटे आणि भात यांसारखे कार्बोदक प्रचुर आहार घ्या.
  • निर्जलीकरण टाळण्यासाठी, रस, पाणी आणि मौखिक जलीकरण लवणे यांसारखे तरळ पदार्थ सोबत ठेवा. एनर्जी ड्रिंक टाळा. यांमध्ये कॅफीन व साखर असते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण प्रभावित होते.
  • नैसर्गिक भूक लागावी, म्हणून रोज व्यायाम करा.
  • भोजन विकार असल्यास, आधारगटे विभिन्न लोकांशी अनुभव सामायिक करून, सकारात्मक शरीरछवी बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण असतात.
  • अवस्था सुधारत असल्याची खात्री करून घेण्यासाठी, नियमित आरोग्य तपासण्या महत्त्वाच्या असतात.


संदर्भ

  1. London School of Hygiene and Tropical Medicine [internet] Bloomsbury, London; Types of malnutrition
  2. National Health Service [Internet]. UK; Malnutrition
  3. World Health Organization [Internet]. Geneva (SUI): World Health Organization; What is malnutrition?
  4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Malnutrition
  5. British Association for Parenteral and Enteral Nutrition [internet] UK Introducing 'MUST'
  6. Nidirect [Internet]. Government of Northern Ireland; Treating malnutrition
  7. Nidirect [Internet]. Government of Northern Ireland; Increasing nutritional intake

Malnutrition चे डॉक्टर

Dr. Dhanamjaya D Dr. Dhanamjaya D Nutritionist
16 Years of Experience
Dt. Surbhi Upadhyay Dt. Surbhi Upadhyay Nutritionist
3 Years of Experience
Dt. Manjari Purwar Dt. Manjari Purwar Nutritionist
11 Years of Experience
Dt. Akanksha Mishra Dt. Akanksha Mishra Nutritionist
8 Years of Experience
डॉक्टरांचा सल्ला घ्या

Malnutrition साठी औषधे

Medicines listed below are available for Malnutrition. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.