सुस्ती म्हणजे काय?
सुस्ती म्हणजे आळशीपणा किंवा थकवा. ज्या व्यक्तींना सतत झोपेची गरज आणि थकव्यासारख्या लक्षणांची जाणीव होते त्यांना सुस्त म्हटले जाऊ शकते. जडपणा आणि आळशीपणा हा शारीरिक किंवा मानसिक असू शकतो तसेच तो आंतरिक शारिरीक किंवा मानसिक परिणामही असू शकतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
सुस्त व्यक्ती साधारणतः निषिद्ध आणि हळुवार काम करणारे असतात. मूड बदलणे, थकवा, ऊर्जेची कमतरता आणि कमी वैचारिक क्षमता ही इतर काही लक्षणे सुस्त व्यक्तींमध्ये आढळतात. या व्यक्तींमध्ये सावधपणाची कमतरता असते.
सुस्तीचे मुख्य कारणे काय आहेत?
ताप आणि फ्लू सारखा आजार झाल्यास अशक्त आणि सुस्त वाटणे हे सामान्य आहे. शिवाय अन्य काही गोष्टीही सुस्तीस कारणीभूत ठरू शकतात ज्या पुढील प्रमाणे आहेत:
- हायपरथायरॉईडीसीम.
- हायपोथायरॉईडीसीम.
- स्ट्रोक.
- गरोदरपणा.
- खूप जास्त प्रमाणात मद्यप्राशन.
- ताप.
- मेनिन्जायटिस.
- मेंदूला दुखापत.
- मूत्रपिंडाची विकृती.
- लाइम रोग.
- निर्जलीकरण, अपूर्ण झोप किंवा असंतुलित आहार.
- मानसिक व्याधी जसे की नैराश्य, उदासीनता, पोस्ट पार्टम नैराश्य, किंवा प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोमअँटीडिप्रेसंट्स सारख्या काही औषधांचे परिणाम.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
सुस्तीच्या निदानासाठी रुग्णाचा संपूर्ण वैद्यकीय इतिहास आणि शारिरीक तपासणी आवश्यक असते. हृदय आणि फुप्फुसांची तपासणीही केली जाते. डॉक्टर मानसिक सावधतेचे मूल्यमापन तसेच बॉवेलच्या आवाजाची आणि दुखण्याचीही तपासणी करतात.सुस्तीचे संभाव्य कारणे आणि त्यांचे वैद्यकीय परिणाम तपासण्यासाठी विविध प्रकारच्या चाचण्या तसेच इमेजिंग अभ्यासही केला जातो.
सुस्तीच्या उपचारासाठी अंतर्गत कारण शोधून काढणे महत्वाचे असते. त्यांनतर आजाराच्या स्वरूपानुसार उपचाराची सुरवात केली जाते. डॉक्टर सुस्तीशी संबंधित मानसिक आजारांवर परिणामकारक अशी अँटिडिप्रेसंट औषधे देतात. सोप्या उपचारांमध्ये पुरेश्या प्रमाणात पाणी, झोप, संतुलित आहार आणि तणावाच्या व्यवस्थापनामुळे सुस्ती मर्यादित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.