गरोदरपणात पायात क्रॅम्प्स येणे म्हणजे काय?
गर्भावस्थेत पायात क्रॅम्प्स येणे हे एक खूप सामान्य लक्षण आहे आणि हे जवळजवळ 50% गर्भवती महिला अनुभवतात. पायात क्रॅम्प्स सहसा संध्याकाळी किंवा रात्री येतात आणि विशेषतः गर्भावस्थेच्या तिसऱ्या तिमाहीत सामान्य आहेत. ते वेदनादायक असून अस्वस्थ करतात आणि दररोजच्या कार्यांमध्ये व्यत्यय आणू शकतात.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
गरोदरपणा ही एक अशी अवस्था आहे जिथे महिल शारीरिक आणि मानसिक बदल अनुभवतात, आणि गर्भधारणेदरम्यान पायात क्रॅम्प्स येणे सामान्यपणे गंभीर चिंतेची बाब नाही आहे. क्रॅम्प्स येण्याचे स्पष्ट कारण देखील नसते.
क्रॅम्प्स सह इतर संबंधित चिन्हे आणि लक्षणे या प्रकारे आहेत:
- सतत डोके दुखणे.
- ओटीपोटात दुखणे आणि श्रोणीत दुखणे.
- तंत्रिकेवर ताण.
- पाठीची खालची बाजू दुखणे.
स्नायूची वेदना सामान्यतः काही सेकंद ते जास्तीत जास्त 10 मिनिटे असते.
याची मुख्य कारणं काय आहेत?
गरोदरपणात पायात क्रॅम्प्स येण्याला कोणतेही विशिष्ट कारण नाही; पण, हे वजन वाढल्यामुळे होऊ शकते. बाळामुळे ठराविक रक्तवाहिन्यांवरील अतिरिक्त दाब पायांच्या रक्त परिसंचरण कमी करू शकते. जेव्हा स्नायू अचानक आकसून जातात तेव्हा क्रॅम्प्स येतात. यामुळे स्नायूंचा ताण वाढतो. कॅल्शियम आणि सोडियमसारख्या काही खनिजांची कमतरता देखील स्नायूंमध्ये क्रॅम्प्स येण्यासाठी कारणीभूत असू शकते.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
डॉक्टर सामान्यत: केवळ विद्यमान लक्षणे आणि शारीरिक तपासणी करून क्रॅम्प्सचे निदान करतात.
लक्षणानुसार औषधे आणि मिनरल सप्लिमेंट्स दिली जातात. बऱ्याच प्रकरणांमध्ये, वैद्यकीय उपचाराशिवाय सुद्धा त्वरित आराम मिळतो.
स्वत: ची काळजी घ्यायच्या टिप्सः
- पोटरीचे स्नायू ताणल्याने पोटरीतील क्रॅम्प्सपासून आराम मिळतो.
- मालिश केल्याने दुखणे कमी होऊ शकते.
- भरपूर पाणी पिल्याने स्नायूंचा त्रास कमी होतो.
- नियमित व्यायाम केल्याने स्नायू आणि सांध्यांचा कडकपणा कमी होऊन क्रॅम्प्सचा त्रास कमी होऊ शकतो.
- रक्त परिसंचरण सुधारण्यासाठी स्टॉकिंगचा वापर केला जाऊ शकतो.
- आपले पाय कलते ठेवून तीव्र वेदना कमी होऊ शकतात
- शेकल्याने आराम मिळतो.