सांध्यातील कडकपणा म्हणजे काय?
सांधे हलवण्यात अवघडलेपण किंवा त्रास जाणवणे म्हणजे सांध्यातला कडकपणा होय. सांध्यातल्या कडकपणाचा त्रास मनगट किंवा हातातल्या एक किंवा अधिक लहान सांध्यांना होऊ शकतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
सांध्यातील कडकपणामध्ये हालचाल करण्यास त्रास होणे, सांधे करकरणे आणि संबंधित जागेवर आग किंवा सूज असा त्रास होऊ शकतो. दिवसाच्या ठराविक वेळी, विशेषत: सकाळच्या वेळी सांध्यात कडकपणा वाढू शकतो. हे घडते कारण रात्रीच्यावेळी सांधे सक्रिय नसतात आणि दोन हाडांमधल्या द्रवाची हालचाल होत नाही. पण, जसाजसा दिवस पुढे जातो तसतसे सांधे स्वतःभोवती आवरण तयार करतात आणि व्यक्तीला बरे वाटू लागते. सतत येणारा सांध्यातला कडकपणा कायमची अक्षमता आणू शकतो.
याची मुख्य कारणं काय आहेत?
सांध्यात कडकपणा एखाद्या दुखापतीमुळे हालचालीत स्वत:ची मर्यादा निर्माण झाल्यामुळे येऊ शकतो. सांध्यात दीर्घकालीन कडकपणा येतो विविध अंतर्गत वैद्यकीय परिस्थितीमुळे होऊ शकतो. सांध्यात कडकपणाचे मुख्य कारण सांधेदुखी आहे ज्यात र्हुमेटाइड आर्थराइटिस हे सर्वसामान्य आहे. हे सांध्यांच्या निरोगी पेशींना प्रभावित करणारे एक ऑटोइम्यून विकार आहे, ज्यामुळे त्यांना सूज येते, वेदना होतात आणि ते कडक बनतात. सामान्यतः ओस्टियोआर्थराइटिसमुळे वृद्धांमध्ये कडकपणा येतो. ज्यात प्रामुख्याने गुडघा, नितंब आणि पाठ यासारख्या सांध्यांचा समावेश असतो. सांध्यात कडकपणाची इतर कारणे जीवनशैलीच्या सवयींशी संबंधित असतात जसे की सतत एका जागी बसून काम करणे, जास्त वजन असणे आणि सदोष असानस्थितीची सवय असणे. हाडांचा कॅन्सर हे सांध्यात कडकपणाचे एक दुर्लभ कारण आहे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
सांध्यात कडकपणा हे अंतर्गत वैद्यकीय किंवा जीवनशैली विकारांचे लक्षण आहे; म्हणून, स्थितीचे निदान करण्यासाठी सविस्तर मूल्यांकन आवश्यक आहे. व्यक्तीचे वय, जीवनशैली आणि वैद्यकीय इतिहासावर अवलंबून, डॉक्टर निदान झाल्यास रक्त तपासणी आणि एक्स-रे करण्याचा सल्ला क्रमवारीने देऊ शकतात. निदानावर आधारित, जळजळ-विरोधी औषधे, स्टेरॉईड्स आणि वेदनाशामकांच्या मदतीने सांध्यातील कडकपणा व्यवस्थापित केला जातो. सांध्यात कडकपणापासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दिवसातून काही वेळा प्रभावित सांध्यांना गरम फॉमेंटेशन लावणे. उष्णता ही सांध्यासाठी उपचार मानली जाते, कारण त्यामुळे सांधे मोकळे होतात आणि रक्ताभिसरण वाढते. नियमित व्यायाम करून वजन कमी करणे आणि माशांच्या तेलासारख्या पूरकांद्वारे सांध्यातील कडकपणा कमी करण्यास मदत होऊ शकते.