जपानी एनसेफेलिटिस काय आहे?
जपानी एनसेफेलिटिस (JE) हा एक विषाणूजन्य रोग आहे जो मानवांना व प्राण्यांना समान प्रकारे बाधित करतो. साध्या शब्दात सांगायचे तर एनसेफेलिटिस म्हणजे मेंदूच्या एक किंवा अधिक भागांना सूज असा होतो. जपानी एनसेफेलिटिस हा एक सामान्य आजार आहे जो लसीकरणाद्वारे रोखला जाऊ शकतो. आशिया खंड आणि पॅसिफिकच्या पश्चिमेकडील भागात एनसेफेलिटिसचे प्रमुख कारण आढळते. 3-6 वर्षांची वयोगटातील मुले सामान्यतः याने प्रभावित होतात. भारतात याचे दरवर्षी 1500-4000 रोगी आढळतात.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
बहुतेक रुग्णात कोणतेच लक्षण दिसत नाहीत. असे आढळून आले आहे की 1% पेक्षा कमी रुग्ण क्लिनिकल लक्षणं दाखवतात. मुख्य लक्षणांमध्ये खालील बाबींचा समावेश होतो:
- ताप (38 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त).
- डोकेदुखी.
- उर्जेची कमतरता /मरगळलेपणा.
- पातळ शौच.
- तीव्र अश्या स्नायूंमध्ये वेदना.
थोड्याच प्रकरणात खालील लक्षणे दिसू शकतात:
- झटके.
- हालचालींमधील अपंगत्व.
- स्नायूंमध्ये असामान्य कडकपणा.
याची मुख्य कारणं काय आहेत?
फ्लेविवियरस जीनसच्या व्हायरसमुळे जपानी एनसेफेलिटिस होतो. हा सामान्यतः मच्छर चावल्यामुळे पसरतो. संसर्गाची जोखीम खालील बाबींवर अवलंबून आहे:
- तुम्ही ज्या ठिकाणी राहता किंवा भेट देता (ज्या ठिकाणी जेई(JE) ची साथ पसरली आहे).
- तुम्ही अशा ठिकाणी भेट देता तेव्हाचा ऋतू.
- तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता (बाहेर जास्त वेळ घालवता).
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
तपशीलवार इतिहास आणि शारीरिक तपासणीवर आधारित निदान केले जाते. डॉक्टरांनी निदानाची पुष्टी करण्यासाठी ज्या तपासण्या करण्याचा सल्ला देतात त्या खालीलप्रमाणे आहेत:
- रक्त तपासणी: व्हायरस विरूद्ध अँटीबॉडीज शोधण्यासाठी.
- लंबर पंचर: सेरेब्रोस्पायनल फ्लुइडमध्ये अँटीबॉडीज तपासण्यासाठी.
- मेंदूचा स्कॅनः मेंदूच्या प्रतिमा वैशिष्ट्यपूर्ण बदल दर्शवतात.
या रोगाचा उपचार करण्यासाठी विशिष्ट औषधे उपलब्ध नाही आहेत. लक्षणात्मक उपायांसाठी सहाय्यक उपाय केले जाऊ शकतात. भविष्यात इन्फेक्शन टाळण्यासाठी लसीकरण केले जाऊ शकते. हे विशेषतः लोकांना दिले जाते जे जिथे ही परिस्थिती सामान्यपणे उद्भवते अश्या ठिकाणी प्रवास करणार असतात. 2 महिन्यांहून कमी वयाच्या नवजात मुलांमध्ये लसीकरण टाळले जाते. लसीतील कोणत्याही घटकांची ॲलर्जी असणा-या लोकांना देखील हे देण्याचा सल्ला दिला जात नाही.
स्वत:ची काळजी घेण्याच्या टिप्सः
- रीपेलंट्स आणि नेट्सचा वापराने मच्छरांद्वारे होणाऱ्या व्हायरसचा प्रसार टाळण्यास मदत होऊ शकते.
- मच्छर चावणे टाळण्यासाठी लांब बाह्या असलेले आरामदायक कपडे घाला.
- आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ राखा आणि मच्छरांची पैदास करू शकणारे साचलेले पाणी काढून टाका.