चिडचिडेपणा - Irritability in Marathi

Dr. Nadheer K M (AIIMS)MBBS

December 14, 2018

July 31, 2020

चिडचिडेपणा
चिडचिडेपणा

चिडचिडेपणा म्हणजे काय?

चिडचिडेपणा एक असमर्थनीय प्रतिक्रिया आहे. हा कमी नियंत्रणाने दर्शविला जातो, ज्याचा परिणाम साधारणतः चिडून बोलणे किंवा उद्रेकने वागणे हा होतो. यामुळे व्यक्ती चिडून बोलतो किंवा ओरडतो आणि आपल्या मनःस्थितीवरुन याचा अंदाज घेता येतो. हा दीर्घकाळापर्यंत राहू शकतो, सामान्य असू शकतो किंवा टप्प्य्टप्प्याने येऊ शकतो. चिडचिडेपणा सामान्यतः येणारा राग किंवा काही अंतर्भूत विकारांमुळे होणारी अस्वस्थता असू शकतो.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

चिडचिडेपणाच्या सामान्य लक्षणांमध्ये हे समाविष्ट आहेत:

  • शीघ्रकोपी.
  • घोर निराशा.

दीर्घकालीन आणि अति चिडचिडपणाचे लक्षणे अशी आहेत:

  • असंबंधित व्यक्तींबद्दल व्यक्त केलेली टोकाची प्रतिक्रिया.
  • उदासीनता, तणाव आणि चिंता यामुळे त्रस्त असल्याने प्रतिकूल प्रतिक्रिया.
  • दीर्घकालीन चिडचिडेपणाच्या परिणामाने तणाव होतो.
  • सहनशील व्यक्ती, नातेवाईक आणि कामाच्या ठिकाणी सहकार्यांना त्रास.

याची मुख्य कारणं काय आहेत?

चिडचिडेपणा नेहमीच अंतर्निहित स्थितीचा परिणाम असू शकत नाही. नियमित त्रास, पुनरावृत्ती उत्तेजन किंवा तीव्र ताण यांमुळे देखील होऊ शकतो.

चिडचिडपणाचे सामान्य कारण असे आहेत:

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

निदान हे इतिहास आणि मूल्यमापन काळजीपूर्वक घेण्यावर आधारित असते. कौटुंबिक सदस्यांना लक्षणांचा इतिहास विचारणे देखील निदान करण्यासाठी आवश्यक आहे.

अंतर्भूत स्थिती निर्धारित करण्यासाठी तुमचे डॉक्टर तपासण्या करण्याचा सल्ला देऊ शकतात.

चिडचिडेपणाच्या उपचारात अंतर्भूत आरोग्य स्थितीचे मूल्यांकन आणि व्यवस्थापन करणे आणि ट्रिगर कारणे शोधणे समाविष्ट असते.

संवेदनाशील वर्तनात्मक थेरपी आणि चिंतेचे नियंत्रण तंत्र जसे चिंतन आणि मेडिटेशन करण्याचा सल्ला चिडचिडेपणाचा उपचार करण्यासाठी दिला जातो.

डॉक्टर अँटिडिप्रेसर्स आणि मूड-स्टॅबिलाइझिंग एजंट्ससारखी औषधे लिहून देऊ शकतात.

चिडचिडेपणावर मात करायला आरामदायी तंत्र वापरले जातात, त्यातील काही खाली नमूद आहेत:

  • चालणे आणि पोहणे यासारख्या शारीरिक ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतणे.
  • संगीत ऐकणे, पुस्तके वाचणे.
  • श्वासाचे व्यायाम.



संदर्भ

  1. American Academy of Pediatrics. [Internet]. Washington, D.C., United States; Irritability and Problem Behavior in Autism Spectrum Disorder: A Practice Pathway for Pediatric Primary Care.
  2. Leslie Born. et al. A new, female-specific irritability rating scale. J Psychiatry Neurosci. 2008 Jul; 33(4): 344–354. PMID: 18592028.
  3. Snaith RP, Taylor CM. Irritability: definition, assessment and associated factors.. Br J Psychiatry. 1985 Aug;147:127-36. DOI: 10.1192/bjp.147.2.127
  4. Daniel J Safer. Irritable mood and the Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders. Child Adolesc Psychiatry Ment Health. 2009; 3: 35. PMID: 19852843.
  5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Fussy or irritable child.

चिडचिडेपणा साठी औषधे

Medicines listed below are available for चिडचिडेपणा. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.