अपचन म्हणजे काय?
अपचन ही व्यापक संज्ञा असून ते पुढील लक्षणांचे वर्णन करते जसे कि, पोटातील अस्वस्थता, ढेकर येणे, जळजळ, अपानवायू, आणि पोट फुगणे. विकास, बदलती जीवनशैली व खाण्यापिण्याच्या सवयी आणि शहरीकरण यामुळे ताणतणाव वाढून अपचनाची समस्या भारतीयांमध्ये सामान्य झाली आहे.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
अपचनामध्ये जळजळ, पोटातील अस्वस्थता, पोट फुगणे, मळमळ, बदललेली चव, सतत ढेकर येणे आणि दुखणे या सर्व लक्षणांचा समावेश होतो. सहसा ही लक्षणे जेवणानंतर जास्त प्रकर्षाने जाणवू लागतात विशेषतः तणाव व चिंता च्या वेळी वाढतात. अनेक लोकांमध्ये मीटिंग, परिक्षा आणि प्रेझेंटेशनच्या आधी अपचनाची लक्षणे अधिक जाणवू लागण्याचा इतिहास आहे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
जुनाट गॅस्ट्रोइसोफागेल रिफ्लक्स किंवा पोटाचा अल्सर मुळे अपचनाची लक्षणे होऊ शकतात, तसेच सामान्यपणे अपचन चुकीच्या जेवणाच्या सवयी, दोन जेवणात जास्त अंतर ठेवणे आणि मद्यपानामुळे होते. अपचन हे पोटाच्या विचलनाशी संबंधित असून ते जेवताना हवा गिळल्यानेही होते. तणावग्रस्त राहणे, कॉफी सारख्या पेयांचे अधिक सेवन आणि अनियमित झोप अपचन होण्यास कारणीभूत असतात. इतर कारणांमध्ये औषधे सेवनाचा समावेश होतो ज्यामुळे गॅस्ट्रिक म्युकोसल लाइनिंग मध्ये बिघाड होतो. याव्यतिरिक्त भावनिक ताण सुद्धा अपचनाशी संबंधित असतो.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
तुमचे डॉक्टर तुमचा सखोल वैद्यकीय इतिहास मिळवतात आणि संपूर्ण शारीरिक तपासणी करून अपचनाचे कारण शोधले जाते आणि त्यानुसार योग्य तो उपचार ठरवला जातो. जुनाट आणि दीर्घ काळ असणाऱ्या अपचनाच्या प्रकरणांमध्ये पोटाचा अल्सर किंवा गॅस्ट्रिक रिफ्लक्स तपासण्यासाठी एन्डोस्कोपी केली जाते. काही गंभीर प्रकरणं वगळता रक्त आणि इमेजिंग चाचण्या अपचनाच्या निदानासाठी फार उपयुक्त नसतात.
उपचारांमध्ये मुख्यतः अँटासिड्स चा समावेश असतो ज्यामध्ये मॅग्नेशिअम सल्फेट, तोंडी औषधे जसे कि प्रोटॉन पंप इनहिबिटरस आणि एच-2 रिसेप्टर ब्लॉकर्स असतात. वैयक्तिक काळजी हा अपचन व्यवस्थापनाचा अंतर्गत घटक आहे कारण अपचन हा बदलत्या जीवनशैलीमुळे होणारा विकार आहे. या उपायांमध्ये सावकाश जेवणे, नियमित जेवणे, पुरेश्या प्रमाणात द्रव पदार्थ घेणे, नियमित व्यायाम, ताणतणाव व्यवस्थापन, खूप प्रमाणात मसालेदार पदार्थ टाळणे, रात्री उशिरा न जेवणे आणि कॅफिन व मद्यपान न करणे यांचा समावेश होतो. जिरे किंवा जिरे पाणी अपानवायूची समस्या, पोट फुगणे आणि जळजळ वर खूप प्रभावी असते.