हायपोव्होलेमिया - Hypovolemia in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

December 03, 2018

July 31, 2020

हायपोव्होलेमिया
हायपोव्होलेमिया

हायपोव्होलेमिया काय आहे?

रक्त, प्लाजमा आणि / किंवा प्लाझमा पाणी गेल्याने रक्ताचे प्रमाण कमी होणे म्हणजे हायपोव्होलेमिया. हे गंभीर निर्जलीकरण किंवा रक्त जाण्याच्या बाबतीत आढळून येते. यामुळे अखेरीस वाहिकांतर्गत गोष्टींचे नुकसान होऊ शकते आणि टिश्यूंमधील द्रवनिवेश मर्यादित होतो. उपचार न केल्यास हे घातक ठरु शकते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

हायपोव्होलेमियाच्या सामान्य चिन्हे आणि लक्षणेंमध्ये खाली नमूद केल्याप्रमाणे आहेत:

  • सामान्य अशक्तपणा.
  • त्वचा निस्तेज होणे.
  • थंड आणि चिकट त्वचा किंवा घाम, ओलसर त्वचा.
  • जलद श्वास.
  • चिंता किंवा उद्विगनता.
  • कमी रक्तदाब (हायपोटेन्शन).
  • मूत्रविसर्जन कमी किंवा नाही. 
  • गोंधळणे.
  • मुर्छित होणे.

याची मुख्य कारणं काय आहेत?

हायपोव्होलेमिया खालील कारणांमुळे होऊ शकतो:

  • शरीरातील द्रवपदार्थांचे खालील कारणांमुळे झालेले नुकसान:
  • खालील कारणांमुळे रक्ताची हानी होणे:

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

चिन्हे आणि लक्षणे आणि संपूर्ण शारीरिक तपासणीवर आधारित डॉक्टर निदान करतात. खालील तपासणीच्या आधारावर पुढील मूल्यांकन केले जाते:

  • किडनीच्या कार्याचे मूल्यांकन करण्यासाठी आणि हृदयाच्या स्नायूंना नुकसान तपासण्यासाठी रक्त तपासणी, रक्ताची संपूर्ण चाचणी (सीबीसी).
  • एक्स-रे.
  • अल्ट्रासाऊंड.
  • कॉम्प्युटेड टोमोग्राफी (सीटी) स्कॅन.
  • एंडोस्कोपी.
  • इकोकार्डियोग्राम.
  • हृदयाच्या उजव्या भागाचे कॅथीटेरायझेशन.
  • मूत्राशय कॅथीटेरायझेशन.

हायपोव्होलेमियाच्या उपचारांसाठी या पद्धती वापरु शकतात:

  • उपचारांचा पहिला टप्प्यात रक्त आणि द्रवपदार्थ पुन्हा भरण्याच्या दृष्टीने हानी मोजली जाते.  हायपोव्होलेमियामुळे झालेले रक्त किंवा द्रवपदार्थांचे नुकसान रक्तसंक्रमणाद्वारे, ओरल रीहायड्रेटिंग लिक्विड किंवा इंट्राव्हेनस (IV-द्वारे नसांतून) रक्तसंक्रमणाद्वारे साध्य करता येते. पुढे, हायपोव्होलेमिया टाळण्यासाठी व्यक्तीस आरामदायक आणि उबदार जागी ठेवले जाते.
  • जर कशाची ॲलर्जी असेल तर अँटी-ॲलर्जन्स दिले जातात.
  • गंभीर प्रकरणांमध्ये, रक्तदाब आणि हृदयाच्या आउटपुटमध्ये वाढ होण्यासाठी  (हृदयातून बाहेर पडलेल्या रक्ताची मात्रा) नॉरपेनिफेरिन, डोपामाइन, एपिनेफ्राइन किंवा डोबुटामिन सारखी औषधे दिली जातात.



संदर्भ

  1. MedlinePlus Medical: US National Library of Medicine; Hypovolemic shock
  2. Mohanchandra Mandal. Ideal resuscitation fluid in hypovolemia: The quest is on and miles to go!. Int J Crit Illn Inj Sci. 2016 Apr-Jun; 6(2): 54–55. PMID: 27308250
  3. Agency of Clinical innovation. Management of Hypovolaemic Shock in the Trauma Patient. Government of New South Wales. [internet].
  4. Clinical Trials. Hypertonic Saline With Dextran for Treating Hypovolemic Shock and Severe Brain Injury. U.S. National Library of Medicine. [internet].
  5. Clinical Trials. Autonomic Challenges From Mild Hypovolemia and Mechanical Ventilation. U.S. National Library of Medicine. [internet].

हायपोव्होलेमिया चे डॉक्टर

Dr. Srikanth M Dr. Srikanth M Hematology
25 Years of Experience
Dr. Kartik Purohit Dr. Kartik Purohit Hematology
13 Years of Experience
डॉक्टरांचा सल्ला घ्या

Find Hematologist in cities

  1. Hematologist in Surat