सारांश
हायपरयुरिसेमिआ एक आरोग्य असमस्या आहे,ज्यामध्ये शरिरात असामान्यपणें अधिक युरिक असिडचे प्रमाण असते. युरिक असिड शरिरात प्रथिने तुटल्याने तयार होतो. प्रथिने तुटतात, तेव्हा त्यांच्यातील प्युरिन नावाचे रासायनिक यौगिक विभाजित होऊन युरिक असिड तयार होतो. युरिक असिडच्या प्रमाणात वाढ तीन प्रमुख कारणांमुळे होऊ शकते युरिक असिडचे वाढलेले उत्पादन, युरिक असिडचे कमी झालेले उत्सर्ग,किंवा या दोन अवस्थांचे समायोजन.
हायपरयुरिसेमिआ यामध्ये लक्षणे असू आणि नसूही शकतात. युरिक असिड वाढल्याने लक्षणे असलेल्या अनेक वैद्यकीय परिस्थिती शरिरात निर्माण होऊ शकतात. यामध्ये युरिक असिड नेफ्रोपॅथी( लघवीत युरिक असिड च्या अत्युच्च पातळीमुळे मूत्रपिंडाचे कार्य कमी होणें), गाउट( रक्तातील संचार करणार्र्या युरिड एसिडच्या अतीप्रमाणामुळे सांध्यांत युरेट क्रिस्टल संचय होणें), आणि युरिक असिड नेफ्रोलिथिअसिस(युरिक असिडचे मुतखडे). हायपरयुरिसेमिआची काही लक्षणे नसल्यास, उपचाराचा सल्ला दिला जात नाही, पण लक्षणयुक्त हायपरयुरिसेमिआमध्ये वैद्यकीय परिस्थितीनुसार उपचाराचीग गरज असते. हायपरयुरिसेमिआच्या गुंतागुंतींमध्ये, गाउट, युरिक असिड नेफ्रोपॅथी,युरिक असिड नेफ्रोलिथिअसिस आणि घातक मूत्रपिंडसंबंधी अपर्याप्तता सामील आहेत.