डोक्यात उवा होणे म्हणजे काय?
डोक्यातील उवा ह्या छोटे परजीवी असून ते माणसाच्या शरीरातील पेशींवर वाढतात आणि त्यांचे रक्त पितात . उवा लिखान पासून वाढतात, जे त्यांचे अंडे असतात.
यांचे मुख्य चिन्ह आणि लक्षणे काय आहे?
एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात उवा झाल्या आहेत की नाही हे शोधणे फार कठीण आहे, विशेषतः सुरवातीच्या काळात जेव्हा उवांचे फक्त अंडे असतात. डोक्यात उवा होण्याचे मुख्य लक्षणे खालीलप्रमाणे आहे:
- स्पॉटिंग/दिसणे - एखाद्या वेळेस कंगव्याने केस विंचरताना केसाला चिटकून आलेली लिख आपल्याला दिसू शकते. हे खूप छोटे पांढऱ्या रंगांचे दाण्यासारखे दिसणारे असतात जे केसांच्या मुळांना चिकटलेले असतात.
- खाज- नंतरच्या टप्प्यावर, उवा मोठ्या होऊन वाढत जातात त्यामुळे डोके सतत खाजवते कारण उवा रक्तपिण्यासाठी स्काल्प च्या आत घुसतात.
मुख्य कारणे काय आहेत?
डोक्यातील उवा (पेडिकलस ह्युमनस कॅपिटीस) जेव्हा त्यांच्या वाढीसाठी पोषक वातावरण आणि उपयुक्त परिस्थिती असते तेव्हा वाढतात. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे उवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमक असतात. अभ्यासातून हे दिसून आल आहे की डोक्यातील उवा ह्या लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात कारण खेळतांना किंवा शाळेत ते इतर मुलांच्या संपर्कात असतात.
डोक्यातील उवा ह्या संक्रमित व्यक्तीचे कपडे केल्यामुळे देखील होऊ शकते. कॅप्स आणि स्कार्फ/रुमाल कोणाबरोबर ही शेअर करू नये आणि नेहमी वेगळे ठेवावे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जाते?
डोक्यातील उवांच्या निदानासाठी कोणतीही टेस्ट सांगितलेली नाही आहे. आपण उवांसाठी येणारा कंगवा वापरून किंवा डोक्याच्या त्वचेचे निरीक्षण करून निदान करू शकतो.
डोक्यातील उवांच्या उपचारामध्ये औषधीयुक्त प्रसाधने जसे शॅम्पू, तेल आणि इतर गोष्टींचासमावेश असतो जे बऱ्याचदा थेट स्काल्प वर वापरले जातात आणि नंतर प्रसाधने धुवून किंवा विंचरून काढले जाते . बाजारातील काही सर्वात कॉमन आणि मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या प्रसाधनांमध्ये इव्हरमेक्टिन असते जे उवा आणि लिखाना मारायचं काम करते.
विशिष्ट कंगवे जे बारीक दातांनी बनवलेले असतात जे उवांना आणि लिखाना केस सरळ विंचरल्यावर बाहेर काढण्यास मदत करतात.
आवश्यक घ्यायची काळजी म्हणजे प्रत्येकाचे कपडे वेगळे ठेवणे आणि जोपर्यंत डोक्यातील उवांचे संसर्ग पूर्णपणे जात नाही तोपर्यंत कोणाच्याही वस्तू ज्यांचा डोक्याशी किंवा मानेशी संबंध येतो ते वापरू नये.