हात दुखणे - Hand Pain in Marathi

Dr. Nadheer K M (AIIMS)MBBS

December 08, 2018

July 31, 2020

हात दुखणे
हात दुखणे

हात दुखणे म्हणजे काय?

हात दुखणे सौम्य किंवा गंभीर असू शकते आणि बऱ्याचदा हे एवढे अक्षम करु शकते की व्यक्ती रोजची दैनंदिन कार्य करू शकत नाही. बहुतेक प्रकरणांमध्ये, या वेदना रोगाची एखादी सुरुवात असू शकते आणि मूळ कारणांचा उपचार केल्याने सहसा वेदना स्थिर होतात.

त्याचे मुख्य चिन्हं आणि लक्षणं काय आहेत ?

सूज, जखम, नर्व्हचे नुकसान, दीर्घकालीन आरोग्यविषयक परिस्थिती (जसे की कमतरता, हायपर्युरिसेमिया), कुठल्याही,एकापेक्षा अधिक लिगामेंट्स आणि हाताच्या हाडांमध्ये लचक किंवा फ्रॅक्चर यांच्यामुळे हाताचे दुखणे होऊ शकते. हाताच्या दुखण्याची लक्षणे सहभागी पॅथॉलॉजी आणि प्रभावित संरचनेनुसार बदलू शकतात. तरी, हाताच्या दुखण्याची काही सामान्य चिन्हे आणि लक्षणे अशी आहेत:

  • वेदना (थ्रोबिंग,झुनझुनी,क्रम्प सारखे).
  • सूज.
  • कठोरता.
  • झुनझुनी किंवा बधिरपणा.
  • हाताच्या हालचालींमध्ये किंवा प्रभावित हाताने काम करण्यात अक्षमता किंवा अडचण.

त्याची मुख्य कारणं काय आहेत ?

हात दुखणे हे हाडे, सांधे, टेंडन्स, कानेक्टिंग टिशू  किंवा नर्व्हस यासारख्या अंतर्भूत संरचनांच्या त्रासामुळे होऊ शकतो. हात दुखण्याची काही सामान्य कारणांमध्ये हे समाविष्ट होते:

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?

योग्य वैद्यकीय इतिहास आणि योग्य क्लिनिकल तपासणी संभाव्य निदान करण्यासाठी मार्गदर्शन करू शकते.काही रक्त तपासण्या आणि रेडियोलॉजिकल चाचण्या एक निश्चित निदान प्रदान करू शकतात.या तपासणीत समाविष्ट आहे:

  • रक्त तपासणी :
    • एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट (ईएसआर-ESR) पूर्ण रक्त गणना(कम्प्लिट ब्लड काऊंट) (सीबीसी-CBC).
    • सी-रिॲक्टिव्ह प्रथिने.
    • रह्युमेटोईड आर्थराइटिस घटक.
    • व्हिटॅमिन D3 ची पातळी.
    • युरिक ॲसिड ची पातळी.
  • प्रभावित हाताच्या मनगटाचा एक्स-रे.
  • प्रभावित हातात नस अडकलेली आहे का, हे तपासण्यासाठी एमआरआय (MRI) स्कॅन.

हाताच्या दुखण्यासाठी उपचार पद्धती:

हात दुखण्याच्या उपचारात्मक उपाय दुखण्याच्या कारणांवर अवलंबून असतात. तरी फिजिकल थेरपीसोबत काही औषधं वेदना कमी करण्यासाठी मदत करतात.या उपचार पर्यायांमध्ये हे समाविष्ट आहे:

  • औषधं - पेरासिटामॉल, एसीक्लोफेनॅक आणि आयबुप्रोफेन सारख्या तोंडी ॲनल्जेसिक (वेदना शामक) औषधांचा वेदना कमी करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो.
  • आईस पॅक - बर्फ किंवा बर्फाच्या तुकडे शिकल्याने वेदना कमी करण्यासाठी मदत होऊ शकते.
  • फिजिकल थेरपी- योग्य फिजिकल थेरपी हाताच्या दुखण्यापासून सुटका देऊ शकते.
  • उपचारात्मक अल्ट्रासाऊंड न्यूरोजेनिक किंवा झुनझुनी वेदना कमी करण्यात मदत करू शकते.



संदर्भ

  1. National Health Service [Internet] NHS inform; Scottish Government; Hand pain
  2. National Institute of Neurological Disorders and Stroke. [Internet]. U.S. Department of Health and Human Services; Carpal Tunnel Syndrome Fact Sheet.
  3. American Dental Association. [Internet]. Niagara Falls, New York, U.S.; Reducing Hand Pain.
  4. Orthoinfo [internet]. American Academy of Orthopaedic Surgeons, Rosemont IL. Arthritis of the Hand.
  5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Wrist pain