एच. पायलोरी काय आहे ?
एच. पायलोरी (हेलिकोबॅक्टर पायलोरी) हा एक जीवाणू आहे जो आपल्या शरीरात प्रवेश करतो आणि पोटात आश्रीत होतो. हे बऱ्याचदा कॉमन्सल म्हणून काम करतं (पोटात राहतो आणि कोणत्याही प्रकारचा त्रास करत नाही); पण काही लोकांमध्ये काही परिस्थिती मध्ये, तो पोटात वाढतो आणि पोटातील अल्सर साठी कारणीभूत ठरतो. सामान्यत: जीइआरडी (GERD गॅस्ट्रो-एसोफॅगल रेफ्लक्स डिसीज) नामक दीर्घकालीन स्थितीत त्याचा परिणाम होतो ज्याचा सहजपणे अँटिबायोटिक्सचा वापर करून उपचार केला जाऊ शकतो.
त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत ?
जेव्हा एच. पायलोरी पोटात प्रवेश करतो, तो पोटात ॲसिड चे उत्पादन वाढवतो आणि पोटाच्या आतील थराला नुकसान पोहोचवतो ज्याचा अल्सरच्या स्वरूपात परिणाम होतो. (कधी-कधी तो मल्टीपल गॅस्ट्रीक अल्सरसाठी कारणीभूत ठरतो) अल्सरच्या लक्षणांमध्ये समाविष्ट आहेत:
- ओटीपोटाच्या वरील भागात वेदना. (अधिक वाचा: पोट दुखीची कारणं)
- ओटीपोटात वेदना, जे जेवण केल्यावर वाढते आणि जेवणाच्या काही तासांनी थांबते; तसेच उपाशी राहील्याने किंवा उशिरा जेवण केल्याने देखील वाढते.
- मळमळ.
- उलट्या (कधीकधी उलट्यामध्ये रक्त दिसणे).
- पोट फुगी.
- ढेकर.
- वजन कमी होणे आणि ॲनिमिया.
- काळ्या रंगाचे मल.
याची मुख्य कारणं काय आहेत ?
एच. पायलोरी पोटात कसा प्रवेश करतो हे माहिती नाही पण प्रवेश केल्यानंतर पोटाच्या थरात अल्सर उत्पन्न करतो. एच. पायलोरी हा स्वतःच गॅस्ट्रीक अल्सरेशनसाठी कारणीभूत असतो पण काही धोकादायक घटक असे आहेत जे एखाद्या व्यक्तीस जीवाणू संसर्गास प्रवृत्त करू शकतात.
या धोकादायक घटकांमध्ये समावेश आहेत:
- ज्या व्यक्तीला अगोदरच एच. पायलोरी चा संसर्ग झाला आहे, त्याच्या संपर्कात राहणे.
- खराब पाणी पिणे (असे पाणी पिल्याने हा संसर्ग होऊ शकतो).
- जास्त घनतेच्या परिसरात राहणे.
- वाईट वैयक्तिक आरोग्य परिस्थितीत जगणे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?
पुरेश्या वैद्यकीय इतिहासासोबत संपूर्ण क्लिनिकल चाचणी, यामुळे गॅस्ट्रो-एसोफेगल रीफ्लक्स डिसीज (जीईआरडी-GERD) रोगाचे निदान होऊ शकते. एच. पायलोरी च्या संसर्गाचे निदान करण्यासाठी काही तपासण्या करणे अत्यावश्यक आहेत. या तपासणीत समावेश होतो :
- मल च्या चाचणी सोबत रक्त चाचणी जसे की सीबीसी(CBC).
- श्वास युरिया चाचणी.
- पोटाच्या वरच्या पचनमार्गाची एन्डोस्कोपी.
सहसा एच. पायलोरी संसर्गाचा तोंडावाटे औषधोपचार केला जातो, ज्यामध्ये खालील वर्गांच्या औषधांच्या संयोजनाचा उपचार समाविष्ट असतो:
- अँटिबायोटिक्स - ॲमॉक्सिसिलिन, मेट्रोनिडाझोल, टिनिडाझोल, क्लेथिथ्रोमाइसिन इत्यादी औषधे इ. जीवाणू नष्ट करण्यात मदत करतात.
- प्रोटॉन पंप इनहिबिटर आणि हिस्टॅमिन अवरोधक - ही औषधे पोटातील ॲसिड कमी करण्यात मदत करतात आणि अल्सर बरा करण्यासाठी मदत करतात
- बिस्मुथ सबसॅलिसायक्लेट - अल्सरवर आवरण टाकून ते अंतर्गत थर संरक्षित करते.