जायंट सेल आर्टेरायटिस - Giant Cell Arteritis in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

December 01, 2018

March 06, 2020

जायंट सेल आर्टेरायटिस
जायंट सेल आर्टेरायटिस

जायंट सेल आर्टेरायटिस म्हणजे काय?

जायंट सेल आर्टेरायटिस ही एक संसर्गाची स्थिती आहे ज्यामध्ये डोके व कमरेच्या वरच्या भागात संसर्ग होतो. सामान्यपणे डोक्याच्या बाजूला असणाऱ्या धमन्यांवर याचा वर परिणाम होतो, ज्यांना टेंपोरल आर्टरिज किंवा क्रेनियल आर्टेरीज म्हणतात. हा प्रामुख्याने डोकेदुखी व अंधुक दिसणे, डबल दिसणे या लक्षणांमुळे ओळखता येतो. स्ट्रोक, अंधत्व व इतर कॉम्पिकेशन्स टाळायला लगेच केलेला उपचार महत्त्वाचा असतो.

याची प्रमुख चिन्हे व लक्षणे काय आहेत?

या संसर्गाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीत खालील सर्व किंवा काही लक्षणे दिसून येतात:-

  • खूप डोकेदुखी,( तसेच रक्तपेशी मध्ये घट्ट पणा) व्रण असल्यामुळे केस कापताना व विंचरताना दुखणे.
  • थकवा.
  • ऐकण्याच्या समस्या.
  • हात,पाय, खांद्याच्या स्नायूंमध्ये व नितंबामध्ये विशेष करून सकाळच्या वेळी दुखणे.
  • फ्लू सारखी लक्षणे, ज्यात रात्रीच्या वेळेस घाम किंवा ताप.
  • वजन कमी होणे.
  • डोकेदुखी.
  • क्लाऊडीकेशन (खाताना तोंड किंवा जीभ दुखणे).
  • जेव्हा मोठ्या आर्टरीज मध्ये परिणाम होतो तेव्हा चालताना पोटरी दुखते.
  • अचानक व संपूर्णपणे दृष्टी जाणे, जे दुर्मिळ व सामान्यपणे सुरुवातीलाच जाणवते, पण जर दुर्लक्ष केले तर संपूर्णपणे दृष्टी जाऊ शकते.
  • डबल दिसणे.
  • दुर्मिळ प्रकरणात, स्ट्रोक किंवा सौम्य स्ट्रोक.
  • नैराश्य.

खालील लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा त्वरित सल्ला घेणे आवश्यक असते:-

  • पाहण्यात अडचण.
  • जबडा व जीभ दुखणे.

याची प्रमुख कारणे काय आहेत?

याची प्रमुख कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरी खालील कारणे असू शकतात:

  • वाढते वय.
  • जेनेटिक.
  • अचानकपणे झालेला व्हायरल किंवा बॅक्टरियल संसर्ग.
  • हृदयविकाराच्या आजाराचा इतिहास.
  • शरीराची रोगप्रतिकारशक्ती ऑटोइम्युनिटी मुळे धमन्यांवर हल्ला करते, ज्यामुळे त्या सुजतात.

याचे निदान व उपचार कसे केले जातात?

लक्षणे व कारणांच्या आधारे डॉक्टर योग्य निदान करण्यासाठी तुम्हाला हा सल्ला देऊ शकतात:-

  • सखोल वैद्यकीय इतिहास जाणल्यानंतर शारीरिक चाचणी.
  • परिणाम केलेल्या टिश्यू ची बायोप्सी केली जाते( छोटे नमुने शस्त्रक्रियेने काढले जातात).
  • एरीथ्रोसाईट सेडीमेंटेशन रेट तपासण्यासाठी रक्त तपासणी केली जाते.
  • मॅग्नेटिक रेझोनन्स अँजिओग्राफी.
  • डॉपलर अल्ट्रसाऊंड.
  • पोस.
  • झिट्रोन एमिशन टोमोग्राफी.

जर ह्या आजारावर उपचार केले नाहीत तर गंभीर कॉम्पिकेशन्स होऊ शकतात, जसे अंधत्व किंवा स्ट्रोक.(डोके व डोळ्यामध्ये अशुध्द रक्त प्रवाहामुळे) म्हणून या स्थितीच्या योग्य व त्वरीत उपचारांचा सल्ला दिला जातो. उपचार खालील प्रमाणे असू शकतात:-

  • प्रेड्नीसोन, कॉर्टीकोस्टरॉइड, ही उपचारांची प्रमुख पद्धत आहे.
  • दृष्टी मध्ये समस्या असल्यास ॲस्पिरीन 100 मिलिग्रॅम दिवसाला घेणे.
  • इतर परिणाम कमी करण्यासाठी, कॅल्शिअम व्हिटॅमिन डी असणारे पदार्थ दिले जातात.
  • पित्ताशयात गंभीर परिणाम झाल्यास प्रोटॉन पंप इन्हिबिटर (ओमेप्राझोल) वापरायचा चा सल्ला दिला जातो.



संदर्भ

  1. J. Alexander Fraser et al. The Treatment of Giant Cell Arteritis. Rev Neurol Dis. Author manuscript; available in PMC 2011 Jan 4. PMID: 18838954
  2. Thomas Ness et al. The Diagnosis and Treatment of Giant Cell Arteritis. Dtsch Arztebl Int. 2013 May; 110(21): 376–386. PMID: 23795218
  3. National Centre for Advancing Translatinal Science. Giant cell arteritis. U.S Department of Health and Human Services; [Internet]
  4. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Eyes - giant cell arteritis
  5. American College of Rheumatology. Giant Cell Arteritis. [Internet]