हाताचे हाड मोडणे म्हणजे काय?
हाताच्या हाडांना (मनगटाची, तळव्याची, बोटांची हाडे) तडा जाणे किंवा ती तुटणे म्हणजे हाताचे हाड मोडणे होय. मनगटाच्या व बोटांच्या मधील हाडांना मेटाकार्पल हाडे म्हणतात. सर्वसामान्यपणे दिसणारे फ्रॅक्चर म्हणजे बॉक्सर फ्रॅक्चर, पाचव्या मेटाकार्पल हाड मोडणे. हाताची हाडे अगोदरच जोडलेली असतात, त्यामुळे हाताचे हाड मोडल्या नंतर दैनंदिन गोष्टी करण्यात अडथळे येऊ शकतात.
याची प्रमुख कारणं व लक्षणं कोणती?
हाताचे हाड मोडण्या ची सर्वसामान्य कारणं व लक्षणं पुढीलप्रमाणे आहेत:
- दुखणे.
- सूज व स्पर्श झाल्यास दुखणे.
- तुटण्याचा आवाज व वजनदार गोष्टी उचलण्यात त्रास.
हाताचे हाड मोडण्या ची इतर लक्षणे व कारणे पुढीलप्रमाणे:-
- हात बोटे व मनगट हलवण्यात त्रास व अस्वस्थता.
- जागाबदल.
- क्नकल फ्रॅक्चर असल्यास निराशा जनक किंवा उदास दिसणे.
मनगटाच्या फ्रॅक्चर चे मुख्य लक्षणं तात्पुरते दुखणे व त्यामागून जास्त, अचानक असे मनगटाच्या मध्य भागावर दाब दिल्यावरचे दुखणे आहे.
दुर्मिळ पणे दिसणारी लक्षणे पुढीलप्रमाणे:-
- घट्टपणा व निकामी होणे.
- रक्त पेशी किंवा मज्जातंतू मधील नुकसान.
याची प्रमुख कारणे कोणती?
जेव्हा थेट हातावर मार लागल्यास किंवा पडल्यास हाताचे हाड मोडू शकते.
इतर कारणे पुढीलप्रमाणे:
- वाहन अपघातात थेट किंवा क्रशिंग मुळे झालेल्या जखमा.
- खेळातील जखमा, विशेष करून स्नो बोर्डिंग, ज्यामध्ये हाताचे हाड मोडण्याचे धोके जास्त असतात.
- ऑस्टेओपोरोशिस सारखे आजार ज्यामध्ये रुग्णाला फ्रॅक्चर चा धोका असतो.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
लक्षणांचा इतिहास व काळजीपूर्वक केलेली शारीरिक चाचणी फ्रॅक्चर झालेले हाड व त्याभोवती चा भाग यांचे योग्य निदान करण्यासाठी मदत करतात.
डॉक्टर तुमच्या स्नायूंची जोडणी, हाताची स्थैर्यता आणि कार्य तपासतात.
निरीक्षणे पुढीलप्रमाणे:
- फ्रॅक्चर ओळखणे व त्याची गंभीरता जाणून घेणे यासाठी एक्स-रे काढणे उपयोगी ठरते.
- हाडांवर उपचार झाल्यानंतरही त्यांना मिळणारा आराम तपासण्यासाठी एक्स-रे उपयोगी ठरतात.
शस्त्रक्रिया न करता होणाऱ्या उपचारांमध्ये डॉक्टरांकडून हाडे जोडली जातात व कास्ट, स्प्लिंट, बडी टेपिंग वापरून हाडांना आराम देण्यासाठी मदत केली जाते.
ॲनालजेसिक्स (पेनकीलर) देऊन हाडांना आराम दिला जातो.
हातातील कठीणपणा घालवण्यासाठी स्ट्रेचिंग चे व्यायाम उपचाराच्या 3 आठवड्यानंतर सुचवले जातात.
काही बाबतीत शस्त्रक्रियेची गरज असू शकते, जेव्हा डॉक्टर फ्रॅक्चर झालेला भाग उघडून हाडे जोडतात. गरज लागल्यास काही छोट्या वस्तू जसे, स्क्रू, वायर किंवा प्लेट लावून हाडे जोडली जातात.