डायग्नोस्टिक एजंट म्हणजे काय?
डायग्नोस्टिक एजेंट म्हणजे शरीराचे कार्य तपासण्यासाठी आणि रोगांचे निरीक्षण करण्यासाठी वारपले जाणारे पदार्थ. यामध्ये ऑरगॅनिक किंवा इनऑरगॅनिक रासायनिक मिश्रण, बायोकेमिकल्स, डाइज आणि स्टेन्स, आणि रेडिओक्टिव्ह ट्रेसर्स समाविष्ट असतात. शरीराच्या कार्यातील बदल शोधण्यात हे मदत करतात. एजन्ट चे काम काय आहे यावरून त्यांचे विविध गटांमध्ये वर्गीकरण होते. रोगनिदानासाठी ज्या विविध पद्धती वापरल्या जातात त्यात सुद्धा डायग्नोस्टिक एजंट्स मदत करतात.
त्यांचा उपयोग कसा केला जातो?
डायग्नोस्टिक एजंट्सची खालील भूमिका असते:
- ऑरगॅनिक आणि इनऑरगॅनिक मिश्रणे:
- टिश्यू कल्चर ग्रेड.
- बॅक्टरीयोलॉजिकल एजन्ट.
- हिस्टोलॉजी चाचण्या.
- कॉलेस्ट्रॉलची पातळी निश्चित करणे.
- डाइज आणि स्टेन्स.
- सायटोकेमिकॅल स्टेनिंग.
- सस्तन टिश्यूंना डाग देणे.
- रीएजन्ट डाइज.
- लघवी विश्लेषण.
- स्टेनिंग एजन्ट्स.
- मलेरिया आणि रक्तातील पॅरासाईट्स.
- हिस्टोलॉजिकल स्टेनिंग एजन्ट.
- कल्चर-मीडिया.
- बॅक्टरीया वेगळे करणे आणि शोधणे.
- वांध्यत्व चाचणी.
- निवडक बॅक्टरीया वेगळे करणे आणि कल्टिव्हेट करणे.
- विविध बॅक्टरीयांना वेगळे करणे.
- रेडिओॲक्टिव्ह ट्रेसर्स.
- ब्लड पूल ईमेजिंग.
- ट्युमर शोधणारा एजन्ट.
- हाड खनिज विश्लेषक.
- चरबीचे शोषण ठरवण्यासाठी.
कोणत्या रोगांच्या निदानासाठी हे वपरले जाते?
डायग्नोस्टिक एजंट्स खालील रोगांच्या निदानासाठी वापरले जाते:
- बॅक्टरीया मुळे होणारे संसर्ग.
- कर्करोग.
- हृदयाची विकृती.
- अस्थिमज्जा रोग.
- मूत्रपिंडाचे रोग.
- युरिनरी ट्रॅक्ट संसर्ग.
- पेरिफेरल व्हॅस्क्युलर विकार.
- मधुमेह.
- अल्झायमर रोगा सारखे मानसिक विकार.
- ॲनिमिया आणि ल्यूकेमिया आणि इतर रक्ताचे रोग.
- मेनिंजायटीस.
- मलेरिया, डेंग्यू, आणि चिकन गुनिया.
- मेंदू, छाती, डोके, मूत्रपिंड, थायरॉईड आणि यकृत यासारख्या अवयवांचे इमेजिंग.
- विलसन्स विकार.
हे कसे वापरले जातात?
डायग्नोस्टिक एजंट्स प्रयोगशाळेत रक्त, शौच, थुंकी, लघवी आणि इतर शारीरिक द्रव्यांवर किंवा टिश्यूंच्या नमुन्यांवर वापरले जातात. हे एजंट्स विविध परिस्थितींचे निदान करण्यासाठी वापरले जातात. डायग्नोस्टिक एजंटस्वर प्रतिक्रिया होते आणि ते विशिष्ट मात्रात्मक आणि गुणात्मक परिणाम देतात,ज्यामुळे रोग आहे की नाही ते निश्चित होते. मिळालेल्या निर्णयांवरून रुग्णाच्या शारीरिक परिथितीचे मूल्यांकन होते आणि रोगाची उपस्थिती ओळखली जाते. रोग किती पसरला आहे आणि औषधांच्या प्रभाव होतोय का हे देखील बघितले जाते. अशाप्रकारे, डायग्नोस्टिक एजंट्स वैद्यकीय चिकित्सा आणि उपचारांची दिशा ठरविण्यास मदत करतात.