डायबेटिक कीटोॲसिडॉसिस काय आहे?
डायबेटिक कीटोॲसिडॉसिस (डीकेए) ही मधुमेहा मधील एक कॉम्प्लिकेशन आहे. यामध्ये रक्तातील किटोन्सच्या असामान्य उच्च पातळीमुळे ते ॲसिडिक बनते. उपचार न केल्यास व्यक्ती कोमा त जाऊ शकते किंवा त्याचा मृत्यू होऊ शकतो. टाईप 1 मधुमेहामध्ये हे सामान्य आहे पण टाइप 2 मधुमेहाचे लोक क्वचितच डीकेएला बळी पडतात. भारतात डीकेएच्या घटनांबद्दल मर्यादित माहिती आहे.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
डीकेएच्या धोक्याची चिन्हे आणि लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:
- खूप तहान लागणे.
- वारंवार लघवी करण्याची इच्छा होणे (अधिक वाचा: वारंवार लघवीचे कारण).
- उच्च रक्तातील शुगरची पातळी.
- मूत्रात किटोन्सचे उच्च स्तर.
इतर लक्षणे जे दिसू शकतातः
याची मुख्य कारणं काय आहेत?
मधुमेहामध्ये इन्स्युलिनची कमतरता शरीराला उर्जा स्त्रोत म्हणून चरबी वापरण्यास प्रवृत्त करते. चरबीचे प्रमाण बिघडल्यामुळे किटोन्स तयार होतात. हे अतिरिक्त किटोन्स नंतर मूत्रात उत्सर्जित होतात.
डीकेए मुख्यत्वे खालील गोष्टींद्वारे ट्रिगर होते:
- संसर्ग: आजारपणाच्या उपस्थितिमुळे काही हार्मोन्सच्या पातळीमध्ये वाढ होऊ शकते ज्यामुळे इन्स्युलिनच्या क्रिया निष्भ्रम होतात.
- इन्स्युलिन रेजिमेन: इन्स्युलिनच्या अयोग्य किंवा न घेतलेल्या डोजमुळे डीकेए होऊ शकतो.
- पर्याप्त अन्न न घेतल्याने.
इतर घटकांमध्ये यांचा समावेश आहे:
- भावनात्मक किंवा शारीरिक धक्का.
- ह्रदयविकाराचा झटका.
- अल्कोहोल किंवा सहसा कोकेन या ड्रगची सवय.
- औषधांचा वापर.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
वैद्यकीय इतिहास, शारीरिक तपासणी व प्रयोगशाळेतील चाचण्या या डॉक्टरांना निदान करण्यासाठी मदत करतात. एचबीए 1 सी आणि इतर ब्लड शुगर यांचे मोजमाप केले जाते. रुग्ण आधीपासूनच मधुमेहाने पिडीत असल्यास किटोन्स तपासले जातात. हे मूत्र किंवा रक्त चाचणीद्वारे करता येते. इतर चाचण्यांमध्ये पुढील समाविष्ट आहेः
- धमनी रक्तात गॅसचे मापन.
- मूत्र विश्लेषण.
- ऑस्मोलालिटी रक्त तपासणी.
- बायोकेमिकल चाचण्या (सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, इत्यादींसाठीचे परीक्षण).
डीकेएचा उपचार करण्याचा हेतू ब्लड शुगर नियंत्रण करणे आहे. ओरल ब्लड शुगर कमी करणारे एजंट्स सुरुवातीला दिले जाऊ शकतात किंवा आपले शुगर पातळी खूप जास्त असल्यास, इन्स्युलिन दिले जाऊ शकते. रुग्णाच्या शुगरच्या पातळीवर आधारित हे उपचार निश्चित केले जातात. उपचारांमध्ये द्रव आणि इलेक्ट्रोलाइट बदलण्याची देखील आवश्यकता असते.
स्वत:ची काळजी घेण्याच्या टिप्सः
- रक्तातील शुगरच्या पातळीवर लक्ष ठेवा.
- अँटी-डायबेटिक औषधे घेतल्यानंतर, आपल्याला हायपोग्लायसेमिक वाटू शकते. आपल्याबरोबर साखर, कॅन्डी किंवा चॉकलेट ठेवल्यास आपत्कालीन परिस्थितीत मदत होऊ शकते.
- निर्धारित केल्यानुसार औषधे घ्या.
- जेव्हा आपल्याला बरे वाटत नसेल तेव्हा प्रत्येक 4-6 तासांनी किटोन्स तपासा.
- आपल्या मूत्र चाचणीत केटोन्सची उपस्थिती दिसल्यास व्यायाम टाळा.
- आपल्याला अस्वस्थ वाटत असल्यास किंवा इशाऱ्याची लक्षणं आढळल्यास, आपल्या डॉक्टरांना त्वरित कॉल करा.
जीवनशैलीत करायचे बदल:
- आहारात साखरयुक्त अन्न प्रतिबंधित करा.
- चरबीयुक्त अन्न खाणे टाळा आणि जास्त तंतुमय पदार्थ निवडा.
- रक्त किटोन्स मुक्त झाल्यावर आणि साखरेची पातळी नियंत्रित झाल्यावर व्यायाम सुरु करा.