सारांश
चिकनगुनिया हाआएडेसडासांमुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. गेल्या दशकात आफ्रिका, आशिया, भारत, कॅरिबिअन आणि मध्य व दक्षिण अमेरिकेत चिकनगुनियाच्या प्रसारात लक्षणीय वाढ झाली आहे. चिकनगुनिया विषाणूची राखण करणाऱ्या मच्छराने चावा घेतलेली बहुतेक माणसं याची लक्षणे दर्शवितात. या लक्षणांमध्ये ताप आणि सांधेदुखीचा समावेश आहे जे गंभीर होऊ शकते. बहुतांश वेळा रुग्णाचे7-10 दिवसांच्या आत आजारातून बरे होणे सुरू होते. नवजात बालकांमध्ये आणि वृद्धांमध्ये आजार वेगाने वाढण्याचा धोका अधिक असतो. आजूबाजूच्या परिसरात साचलेल्या स्थिर पाण्यामध्ये आएडेस डासाची पैदास होते आणि प्रसार होतो. म्हणून, आजाराचा धोका कमी करण्यासाठी, आजूबाजूचे वातावरण स्वच्छ आणि कोरडे ठेवणे महत्वाचे आहे. कूलर, फुलदाणी, शोभेचे पात्र किंवा मासे असलेल्या काचेच्या पेट्या यामधील पाणी काढून टाकावे आणि आठवड्यातून किमान 3-4 वेळा स्वच्छ पाण्याने बदलावे जेणेकरून डासांची पैदास रोखतायेऊ शकेल. इतर निवारक उपायांमध्ये मच्छरदाण्या, डासावरोधक यंत्र, लेपन / मलम वापरणे आणि संरक्षणात्मक कपडे घालणे यांचा समावेश आहे. चिकनगुनियाला बरे करण्यासाठी औषध नाही आणि औषधोपचार करण्यासाठी कुठलीही लस नाही. म्हणून, उपचार,लक्षणे कमी करण्यावर केंद्रित करतात. चिकनगुनिया आणि डेंग्यूची लक्षणे सामान्यतः सारखीच असतात. दोन्हींमध्ये ताप येतो. म्हणूनएका आजाराने दुसऱ्याचाभ्रम होणे शक्य आहे. म्हणूनचउपचार सुरू करण्याआधी योग्य निदान होणे महत्वाचे आहे.योग्य मार्गाने उपचार आणि मुक्तता झाल्यास, लक्षणे सामान्यतः 2-3 आठवड्यांच्या आत कमी होतात. चिकनगुनियापासून होणारी जटिलता दुर्मिळ आहे आणि असुरक्षित समुदायांमध्ये चिकनगुनियाचा प्रकोप नियंत्रित करण्यासाठीची प्रतिबंधक धोरणे फार उपयोगाची होऊ शकतात.