तोंडाची जळजळ म्हणजे काय?
तोंडाची जळजळ (बीएमएस) किंवा स्काल्डेड माऊथ सिन्ड्रोम म्हणजे एखाद्या व्यक्तीला जीभ, टाळू, आणि ओठांवर असह्य जळजळ होणे.
हा एक दुर्मिळ विकार आहे आणि याची लक्षणं आणि कारणं रुग्णानुसार बदलतात.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
तोंडाची जळजळ होण्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे अशी आहेत:
- जिभेवरची जळजळ, वेदनादायक असू शकते आणि भाजल्यासारखी जखम वाटू शकते.
- गरम पेय जसे कि चहा, किंवा अम्लीय पेय स्थिती अजून खराब करू शकतात.
- ओठांवर किंवा तोंडाच्या कोपऱ्यांमध्ये सुद्धा जळजळ जाणवू शकते.
- चवीचे आकलन बदलल्याने खाण्यास त्रास होतो.
- क्वचित, तोंड बधिर झाल्याची तक्रार रुग्ण करू शकतो.
याची मुख्य कारणं काय आहेत?
बीएमएस ची कारणं अशी आहेत:
- प्राथमिक बीएमएस कोणत्याही विशिष्ट स्थिती किंवा कारणाशी निगडीत नाही.याचे कारण बहुधा अज्ञात असते.
- दुय्यम बीएमएस एखाद्या विशिष्ट एजंट किंवा अंतर्निहित रोगामुळे होते.
- कॅन्डिडा सारखे संसर्ग, किंवा फोड झाल्यामुळे तोंडात जळजळ होते.
- लाळेचे उत्पादन कमी झाल्यामुळे झिरोस्टोमिया किंवा तोंड कोरडे होते. तोंडाच्या कोरडेपणामुळे देखील बीएमएस होऊ शकतो.
- ज्या लोकांना मधुमेह किंवा थायरॉईडचा विकार असतो ते नेहमी तोंड जळजळ करत असल्याची तक्रार करतात. कारण यात हार्मोनच्या असंतुलनामुळे झिरोस्टोमिया होतो, ज्यामुळे जळजळ होऊ शकते.
- ॲसिड रिफ्लक्स किंवा जीईआरडी (GERD) सारख्या गॅस्ट्रिक समस्यांमुळे सुद्धा तोंडाची जळजळ होऊ शकते.
- ॲक्रेलिकपासून बनविलेल्या डेंचरमध्ये तीक्ष्ण टोक असतात ज्यामुळे गालांच्या आतल्या भागावर किंवा तोंडाच्या तळाशी अल्सर आणि बर्न्स होऊ शकतात.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
- रुग्णाची लक्षणे आणि त्याची शारीरिक तपासणी यावरून तोंडाच्या जळजळीचे निदान करणे अत्यंत सोपे आहे. पण, कारणं निश्चित करण्यासाठी काही चाचण्या केल्या जाऊ शकतात.
- मधुमेह, थायरॉईड विकारासाठी रक्त तपासणी.
- लाळचे प्रमाण आणि गुणवत्ता तपासण्यासाठी लाळेची चाचणी.
बीएमएस उपचारांमध्ये हे समाविष्ट आहे:
- प्राथमिक तोंडाची जळजळ जी कोणत्याही अंतर्निहित कारणाशी निगडीत नाही. म्हणून तिचा उपचार जळजळ कमी करून होतो. यासाठी, आहारात काही विशिष्ट बदल करणे आवश्यक आहे जसे की:
- मसालेदार अन्न, ॲसिडिक अन्न आणि त्रासदायक पदार्थ टाळावे. धूम्रपान आणि मद्यामुळे लक्षणे आणखी खराब होऊ शकतात, म्हणून ते सुध्दा टाळावे.
- आवश्यक पोषक तत्वांचा समृद्ध समतोल आहार घ्यावा.
- दुय्यम तोंडाच्या जळजळीच्या उपचारांमध्ये त्याची कारण ओळखणे समाविष्ट आहे.
- ॲसिड रिफ्लक्स ला आहारामध्ये बदल आणि ॲन्टासिड औषधांद्वारे नियंत्रित केले जाते.
- हार्मोनल विकार इन्स्युलिन, औषधे आणि व्यायामांद्वारे नियंत्रित केले जातात.
- संसर्ग झाल्यास फंगल औषधे आणि अँटीबायोटिक्स प्रभावी असतात.
- घरगुती काळजीमध्ये बर्फाचे तुकडे चावणे, शीतपेय पिणे किंवा प्रभावित क्षेत्रावर एलोवेरा चा अर्क लावणे समाविष्ट आहेत.