स्तनाच्या समस्या म्हणजे काय?
स्तनांची समस्या हा आजार ब्रेस्ट कॅन्सर ला वळगळता स्तनांना प्रभावित करणारा आजार असतो आणि त्यामुळेच स्तनांमध्ये सौम्यता आढळते. कोणत्याही वयात स्तनांचा त्रास व समस्या होऊ शकतो. स्तनांच्या समस्या काहींना वयात येताना होऊ शकतात, तर काहींना गर्भधारणाच्या दरम्यान किंवा स्तनपानामुळे होऊ शकतात, तर काही जणांना वय वाढल्यामुळे होऊ शकते. स्तनांच्या समस्येला सामान्यतः सौम्य स्तन रोग असे ही म्हणतात.
त्याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
स्तनांच्या समस्यांची चिन्हें आणि लक्षणांची वेगवेगळी रूपे आणि विविध जखमा असू शकतात. तुम्हाला स्तनांची समस्या असल्यास, तुम्हाला खालीलपैकी एक किंवा अधिक चिन्हे आणि लक्षणे दिसून येऊ शकतात:
- स्तनात वेदना.
- स्तनांमध्ये गाठ जे स्तनांमध्ये एक ठिकाणी तंतूमय पदार्थ किंवा चरबीचे जमा झाल्याने होऊ शकते.
- स्तनांमध्ये सिस्ट वाढणे.
- स्तनाग्र/निपल उलट-पलट.
- निपलमधून द्रवाचा स्त्राव होणे.
- निपलवरती भेगा आणि वेदना होणे.
- अतिरिक्त निपल असल्याचे जाणवणे.
- स्तनांवरच्या त्वचेमध्ये बदलावं होणे.
त्याचे मुख्य कारण काय आहेत?
स्तनांमध्ये समस्यांची अनेक कारणे असू शकतात. यात पुढील काही असू शकतात:
- असाधारणपणे स्तनांची वाढ होणे.
- स्तनांमध्ये सूज येणे.
- शरीरामध्ये हार्मोनल बदल आणि असंतुलन.
- स्तनपानाच्या दरम्यान स्तननलिकामध्ये संसर्ग ज्यामुळे फोड किंवा सेप्सीस होणे.
- मिल्क स्टॅसिस.
- स्तनांच्या वाढीसाठी सिलिकॉन किंवा पॅराफिन सारख्या बाहेरील घटकांचा उपयोग करणे.
- दुर्घटना किंवा शस्त्रक्रियेमुळे स्तनांमध्ये ट्रॉमा होणे.
- स्तनामध्ये क्षयरोग हे दुर्मिळ आहे पण स्तनांमध्ये दुखण्याचे हे एक कारण असू शकते.
याचे निदान आणि उपचार कसे केले जाते?
स्तनांच्या दिसण्यात किंवा कार्यात कुठल्याही प्रकारचा बदल दिसला तर त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे आणि अवस्था अधिकच बिकट होण्या पासून बचाव करावा.
स्तनाच्या समस्येचा शोध स्वतःहूनच घेणे ही सर्वात चांगली आणि सोपी पद्धत आहे. जर स्तनांमध्ये एखादी गाठ वाटत असेल तर, हे अत्यंत महत्वाचे आहे की आपण नियमितपणे चेक-अप केल्यास कॅन्सर रोगाच्या संभाव्यतेतून बाहेर पडू शकतो. निदान करण्याच्या पद्धती खालीलप्रमाणे आहेत:
- अल्ट्रासाऊंड.
- मॅमोग्राफी.
- कोअर नीडल बायोप्सी.
- टिशू बायोप्सी.
- पॅथॉलॉजिकल तपासणी.
चाचणीच्या अहवालावर आधारित उपचार ठरविले जातात. काही उपचार पद्धती आशा असू शकतात:
- निपलवर सुथिंग क्रीम वापरणे.
- योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने स्तनपान करणे, जर स्तनपान करण्यास समस्या किंवा त्रास झाल्यास स्तनांची समस्या होऊ शकते.
- शस्त्रक्रियेने स्तनांतून फायब्रॉईड काढणे.
- नीडलद्वारे सिस्ट मधील द्रव काढणे.
- शस्त्रक्रियेने सिस्ट काढणे.
- क्वचितच, स्तन काढावे लागते (स्थिती अधिक गंभीर असल्यास मॅस्टेक्टॉमी करण्याचा सल्ला देऊ शकतात).
- शरीरात हार्मोनल असंतुलनामुळे स्तनाचा त्रास होत असल्यास हार्मोनल पुनर्संचयित करण्यासाठी गोळ्या घेऊन हार्मोनल संतुलन करू शकतो.