रक्त पातळ होणे म्हणजे काय?
रक्त पातळ हे अशा परिस्तिथीमध्ये होतं, जेव्हा शरीरात रक्त गोठू शकत नाही त्यामुळे रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. अयोग्य किंवा अपर्याप्त क्लॉटिंगमुळे रक्त घटक किंवा क्लॉटिंग घटकांमध्ये दोष असू शकतो. शरीरात तेरा प्रकारचे क्लॉटिंग घटक तयार होत असतात. या क्लॉटिंग घटकांमध्ये कोणतीही कमतरता किंवा दोष असल्यास रक्त पातळ होऊ शकतं. त्यामुळे, रक्तस्त्रावचा विकार होऊ शकतो.
त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
रक्तस्त्राव विकार असलेल्या व्यक्तींमध्ये खालील लक्षणे दिसून येतात:
- नाकातून अनपेक्षित रक्तस्त्राव.
- हिरड्यांमधून रक्तस्त्राव.
- छोट्याश्या जखमेनंतर आणि इंजेक्शननंतर बराच वेळ रक्तस्त्राव होणे.
- शस्त्रक्रियेच्या दरम्यान आणि नंतर अतिप्रमाणात रक्तस्त्राव.
- दातांवरील कोणत्याही प्रक्रियेनंतर बराच वेळ रक्तस्त्राव होणे.
- रक्तात कोणत्याही क्लॉट्सशिवाय मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
रक्तस्त्राव विकार हा क्लॉटिंग घटकामध्ये दोष किंवा त्याच्या अनुपस्थितीमुळे होण्याची शक्यता आहे. रक्तामधील प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यामुळे, किंवा प्लेटलेट्सची कार्यप्रणाली व्यवस्थित नसल्यामुळे होऊ शकतो. रक्त पातळ होणे हा विकार त्याच्या कारणांवरून वर्गीकृत केला जाऊ शकतो:
- आनुवंशिक किंवा आधी पासून असलेल्या रोगामुळे जसे हेमोफिलिया (एक अनुवंशिक रक्तस्त्रावचा विकार).
- ॲनिमिया, व्हिटॅमिन के ची कमतरता, ह्यूमन इम्यूनोडेफिशियन्सी व्हायरस (एचआयव्ही) संक्रमण, लिव्हर सिरोसिस, आणि ल्यूकेमिया सारख्या इतर काही आजारांमुळे.
- ॲस्पिरिन, वॉरफिन आणि हेपरिनसारख्या काही औषधांच दीर्घकाळ सेवन केल्याने.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
रक्त पातळ होणे याचे निदान खालील प्रकारे केले जाऊ शकते:
- पूर्णपणे वैद्यकीय इतिहास बघणे.
- शारीरिक तपासणी.
- रक्त गणना/ब्लड काउंट निर्धारित करण्यासाठी रक्त तपासणी.
- रक्तात क्लॉटिंगची वेळ तपासण्यासाठी टेस्ट.
- रक्तातील प्रोटीनची कमतरता ओळखण्यासाठी टेस्ट.
रक्त पातळ होण्याच्या तीव्रतेनुसार उपचार बदलू शकतात. काही रक्तस्त्राव आजारांमध्ये, रक्त गोठण्यासाठी किंवा रक्त पातळ होण्यापासून टाळण्यासाठी क्लॉटिंगचे घटक दिले जाऊ शकतात, तर इतर विकारांमध्ये, स्थानिक उत्पादनांचे आणि नेझल (नाकांचे) स्प्रे वापरले जाऊ शकतात. खालील उपचार पर्याय असू शकतात:
- व्हिटॅमिन के चे इंजेक्शन.
- ब्लड प्लाझमा किंवा प्लेटलेट ट्रान्सफ्युजन.
- रक्त गोठण्यामध्ये मदत करणारी औषधे.
- इतर औषधे जसे प्लेटलेटशी संबंधित आजार बरा करण्यासाठी हायड्रॉक्स्यूरिया.