रक्तस्त्राव म्हणजे काय?
शरीरातून रक्त जायला रक्तस्त्राव म्हणतात. शरीराच्या आत होणाऱ्या रक्तस्त्रावला अंतर्गत रक्तस्त्राव म्हणतात व बाहेर होणाऱ्या रक्तस्त्रावला बाह्य रक्तस्त्राव म्हणतात. शरीरातून रक्त बंद रक्तवाहिन्यांमधून वाहते. रक्तवाहिन्यांत कोणत्याही प्रकारची जखम किंवा दोष रक्तस्त्रावासाठी कारणीभूत ठरतो. रक्तस्त्राव हा एखाद्या अंतर्गत रोगाचे किंवा दुखापती चे लक्षण असू शकतो. मासिक पाळीमध्ये आणि प्रस्तुतीनंतर रक्तस्त्राव सामान्य आहे.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
वैद्यकीय स्थिती किंवा जखमेमुळे होणारा रक्तस्त्राव चिंताजनक असतो. शरीरामध्ये नैसर्गिक जखम भरण्याची (क्लोटिंग) यंत्रणा असते, दुखापत झाल्यास जखम होऊन रक्तस्त्राव होतो आणि तुम्हाला क्लॉटिंग डिसऑर्डर (जखम न भरणे) नसल्यास ती जखम नैसर्गिकरित्या भरली जाते. रक्तस्त्रावाच्या काही सामान्य लक्षणं खालीलप्रमाणे आहेत.
- शरीराचे ऑरिफिस किंवा बाह्य भागातून जसे की तोंड, नाक, कान होणारा रक्तस्त्राव किंवा गुदाशय आणि मूत्रमार्गाला किंवा त्वचेला झालेली जखम.
- ताप.
- कमी झालेले हिमोग्लोबिन.
- धक्क्यामुळे शरीर थंड आणि पांढरे पडणे, संथ नाडी (रक्तस्त्राव न थांबल्यास).
याची मुख्य कारणं काय आहेत?
शरीरावर झालेल्या दुखापतीमुळे, दुर्घटनामुळे किंवा आघात झाल्यास रक्तस्त्राव होऊ शकतो. खालील काही सामान्य त्रासदायक कारणेः
- दुखापत, जखम किंवा त्वचेवर झालेल्या जखमेमुळे केशिका फुटणे.
- नाकावर आघात किंवा नाकात बोट टाकल्याने नाकातून रक्त येणे.
- डोक्याला इजा झाल्याने इन्ट्राक्रॅनियल रक्तस्त्राव होणे.
- बंदुकीमुळे इजा होणे.
जेव्हा काही वैद्यकीय परिस्थितीमुळे रक्त वाहते तेव्हा वैद्यकीय कारणास्तव होणारा रक्तस्त्राव असे म्हणतात. त्याची काही कारणं पुढीलप्रमाणे आहेत:
- तीव्र ब्रॉन्कायटीस.
- यकृतमध्ये बिघाड.
- पेशींची संख्या कमी होणे.
- व्हिटॅमिन के/K ची कमतरता.
- ब्लड कॅन्सर किंवा इतर कोणताही वाढलेला कॅन्सर.
- मासिक पाळीदरम्यान अति रक्तस्त्राव.
- गर्भपात किंवा भृणहत्या.
- हेमोफिलिया - एक आनुवंशिक विकार ज्यामुळे आपोआप सांध्यांमध्ये रक्तस्त्राव होतो.
काही रक्त-पातळ करणाऱ्या औषधांमुळे देखील रक्तस्त्राव होऊ शकतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
दुखापत झाल्यास, प्रभावित भागाचा विविध प्रकारे केलेले स्कॅन उपयुक्त ठरू शकतात. बहुतेक वेळा रक्त तपासणी केल्याशिवाय अंतर्गत रक्तस्त्राव लक्षात येत नाही. काही सामान्य निदान तपासण्या आणि पद्धती खालीलप्रमाणे आहेत:
- हिमोग्लोबिन आणि हेमाटोक्रिट परिणाम दाखवणारी रक्त तपासणी.
- पेशींची संख्या.
- मल परीक्षण.
- एक्स रे काढणे.
- सीटी स्कॅन.
- अल्ट्रासाऊंड.
रक्तस्त्राव बंद करण्याचा हेतूच्या प्रामुख्याने उपचार असतो, एकदा रक्तस्रावाचे कारणं समजल्यानंतर पुढील उपचार ठरवता येतात. रक्तस्त्रावचे व्यवस्थापन पुढील प्रमाणे करता येते:
- मासिक पाळीतील अति रक्तस्त्रावसाठी हार्मोनल उपचार.
- जखमी झाल्यास रक्तस्त्राव नियंत्रित करण्यासाठी टूर्निकेटचा वापर.
- घातक रक्तस्त्राव थांबविण्यासाठी शस्त्रक्रियेची मदत.
- रक्त कमी झाल्यामुळे हायपोटेन्शन नियंत्रित करण्यासाठी टिश्यूमध्ये ऑक्सिजनेशन आणि शिरेच्या आत द्रवपदार्थ दिले जाणे.
- सर्जिकल ड्रेसिंग: कोलेजन-आधारित, फायब्रिन-आधारित आणि जिलेटिन-आधारित ड्रेसिंग ज्यामध्ये रक्तस्त्राव रोखण्यासाठी हेमोस्टॅटिक नावाचा घटक असतो.
- वासोकॉनस्टिटर/वाहिनी संकुचित होणे: कॅन्सर शी संबंधित ब्लॅडर किंवा रेक्टल रक्तस्त्राव थांबवण्यासाठी रक्तस्त्राव थांबविणाऱ्या घटकांचा वापर ज्याने रक्तवाहिन्या संकुचित होतात. अश्यावेळी, रक्तस्त्राव झालेल्या जागेवर एंडोस्कोपिक डिलिव्हरी देखील दिली जाऊ शकते.
- रेडिओथेरेपी: ब्लॅडर, गॅस्ट्रोइंटेस्टायनल नलिकेच्या, आणि फुफ्फुस कॅन्सर मुळे रक्तस्त्राव.
- जखम न भरण्याच्या आजारात व्हिटॅमिन के/K थेरपी आणि फायब्रिनोजेनचा वापर.
- जखम भरण्यास(कोग्युलेशन) मदत करण्यासाठी अँटीफिब्रिनोलिटिक.
- प्लेटलेट एकत्रीकरण, गोठलेले प्लाझमा किंवा रक्त यांचे संक्रमण.
मोठ्या प्रमाणावर अंतर्गत किंवा बहिर्गत रक्त जाणे जीवघेणे असू शकते. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यास, ती तूट भरून काढण्यासाठी रक्ताचे संक्रमण केले जाऊ शकते.
सावधानतेचा इशारा: कोणत्याही प्रकारच्या रक्तस्त्रावाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. म्हणूनच, वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेवर निदान आणि उपचार तुमचे आयुष्य वाचवू शकते.