ब्लॅडर इरीगेशन म्हणजे काय ?
ब्लॅडर इरीगेशन ही एक प्रकिया आहे ज्यामध्ये मूत्राशयाच्या आतील भागास निर्जंतुक पाणी किंवा सामान्य खारट पाण्यने स्वच्छ केले जाते. यामुळे मूत्राशयात रक्ताच्य गाठी होत नाही आणी लघवी करताना कसलाही त्रास होत नाही, विशेषतः मूत्राशयाशी संबंधित शस्त्रक्रियेनंतर. ब्लॅडर इरीगेशन हे कॅथेटरमध्ये ब्लॉकेज निर्माण होण्यापासून बचाव करते (रक्ताच्या गाठी, इंफेक्शन, आणि होणाऱ्या जळजळपासून इ.)
हे का केले जाते?
मूत्राशयाच्या आत गंभीर रक्तस्तव होत असल्यास डॉक्टर ब्लॅडर इरीगेशन करण्याचा सल्ला देतात. हे मुख्यतः मूत्र मार्गात रक्ताच्या गाठींसारखा प्रकार होऊ नये आणि लघवी करण्यात काही अडथळा होऊ नये म्हणून केले जाते. लघवीत अडथळ्याची अति तीव्र बाधा असणाऱ्या रुग्णांना आणि त्याच बरोबर कॅथेटर रोग असलेल्यांमध्ये विविध चिन्हें आणि लक्षणें दिसून येतात.
- कॅथेटरमधून मूत्र बाहेर पडण्यास मार्ग नसणे.
- मूत्रशयाच्या पूर्णतेमुळे ओटीपोटात त्रास आणि कॅथेटरच्या भोवती अचानक तीव्र वेदना जाणवणे.
- कॅथेटर जवळ मूत्र अनियंत्रित होऊन सुटणे.
- घाम वाढणे, हृदयाचा ठोक्यात ही वाढ निर्माण होणे किंवा ब्लड प्रेशर कमी होणे हे जास्त काळापर्यंत कॅथेटरमध्ये अढथळा आल्यास होते.
त्याची गरज कोणाला आहे?
ब्लॅडर इरीगेशनचा मुख्य: उद्देश हा मूत्राशयात रक्ताच्या गाठी तयार होण्यापासून आणि कॅथेटरमधील अढथळ्यामुळे मूत्रमार्गातून मुत्राचा प्रवाह थांबवणे हे टाळण्यासाठी केला जातो. मुत्राच्या प्रवाहात तीव्रता निर्माण होण्याची स्थिती खालीलप्रमाणे आहे.
- गंभीरपणे मूत्रमार्गात ट्रॅक संसर्ग किंवा ब्लॅडर इन्फेक्शन ज्यामुळे रक्तस्त्राव होतो.
- वाढलेली प्रोस्टेट ग्रंथी.
- मूत्रमार्ग किंवा युरीथ्रल सखोलता संक्रमित होणे.
- किडनी स्टोन.
- मूत्रमार्गात कॅथेटर टाकताना जखम आणी आघात होतो ज्यामुळे रक्तस्त्राव झाल्यामुळे रक्ताच्या गाठी होतात.
- कोमा-मध्ये असलेली व्यक्ती आणी ज्यांच्या मुत्रशयात कॅथेटर बर्याच काळापासून आहे.
- प्रोस्टेट ग्रंथी संबंधित जसे ट्रान्स-यूरिथ्रल रीसक्शन ऑफ प्रोस्टेट (टीयूआरपी) आणि होल्मियम लेझर एन्युक्लुएशन ऑफ प्रोस्टेट (होएलइपी).
- ब्लॅडर शस्त्रक्रिया ट्रान्स-यूरिथ्रल रेसेक्शन ऑफ ब्लडर ट्यूमर (टीयुआरबीटी) आणि मूत्राशयाशी संबंधित इतर प्रक्रिया आणि प्रोस्टेट ग्रंथी.
- ब्लॅडर ट्यूमरसाठी रेडियेशन.
ते कसे केले जाते?
ब्लॅडर वॉश किंवा इरीगेशन सामान्यत: निर्जंतुकी किंवा सामान्य खारट पाण्याने केले जाते. कधीकधी विशिष्ट रसायने किंवा अँटीबायोटिक सोल्युशनचा वापर संसर्ग बरा करण्यासाठी केला जाती. 3-मार्ग कॅथेटरच्या मदतीने पुढील प्रक्रिया सामान्यपणे केली जाते ज्यामुळे द्रवपदार्थाचा प्रवाह होऊ शकतो, इरीगेशन वापरले जाते आणि एकाच वेळी मूत्राशयाच्या आत आणि बाहेर करणे.
सध्याचे ऑटोमॅटिक डिव्हाइस हे ब्लॅडर इरीगेशनसाठी वायरलेस सेन्सरसह अधिक प्रभावी असल्याचे आणि वारंवार ब्लॅडर इरीगेशन आवश्यक असणाऱ्या लोकांसाठी सुरक्षित सिद्ध झाले आहे, उदाहरणार्थ, वाढलेल्या प्रोस्टेट ग्रंथींसाठी.