बर्ड फ्लू काय आहे?
बर्ड फ्लू,वैद्यकीय परिभाषेत याला एव्हीयन इन्फ्लूएंझा असे म्हणतात ज्यामध्ये मनुष्याला एक दुर्मिळ संसर्ग होतो. नावावरुन असे समजते की हे पक्ष्यांमध्ये दिसणारा एक व्हायरल संसर्ग आहे. असे असले तरीही हा मनुष्यामध्ये देखील होऊ शकणारा एक संसर्ग आहे. संसर्गीत व्यक्तीत फ्लू-सारखे बरीच लक्षणे दिसतात आणि त्याला उपचाराची गरज असते. भारतामध्ये वर्षाला बर्ड फ्लूचे चार हजारहून कमी रुग्ण दिसून येतात.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
बर्ड फ्लूची लक्षणे इन्फ्लूएंझा सारखीच असतात. याची काही सामान्य लक्षणे खालील प्रमाणे आहेत:
कधीकधी लोकांना मळमळ आणि उल्टी सुद्धा होते. कधीकधी रुग्णांमध्ये इतर काही लक्षणे न दिसता फक्त डोळ्यांचा संसर्ग होतो.
याची मुख्य कारणं काय आहेत?
दोन प्रकारचे बर्ड फ्लू व्हायरस आहेत त्यातील एच5एन1 मनुष्यामध्ये सामान्यपणे दिसणारे आहे. मनुष्यामध्ये हे संसर्ग पक्ष्यांद्वारे यापैकी कुठल्यातरी एका प्रकारे प्रसारित होतात:
पोल्ट्री हाताळणे
- पक्ष्याची अंडी आणि पोल्ट्रीची विक्री करणार्या ओपन-एअर मार्केट मध्ये एरोसोलायज्ड कणांचे श्वासन करणे.
- संसर्गीत पक्ष्यांना हात लावणे.
- संसर्गीत पक्ष्याची विष्टा पडलेल्या पाण्याने अंघोळ करणे.
संसर्गीत पक्ष्याचे कमी शिजलेले मांस आणि अंड्याने संसर्ग पसरू शकतो. पूर्णपणे शिजलेले पक्ष्याचे मांस किंवा अंडी खाणे सुरक्षित आहे. हा संसर्ग एका संसर्गीत व्यक्तीपासून दुसर्या व्यक्तीला पसरत नाही.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
या संसर्गाचे निदान लॅब मधील साधारण चाचण्या करुन केले जाते कारण बर्ड फ्लू साठी विशिष्ट चाचणी सामान्यपणे सर्वत्र उपलब्ध नसते.
- नाकातील आणि घशातील द्रवाचा नमुना घेऊन व्हायरसची तपासणी केली जाते.
- संपूर्ण ब्लड काउंट घेऊन शरीरात संसर्ग आहे की नाही याची पुष्टी केली जाते.
- फुफ्फुसाचा निरोगीपणा तपासण्यासाठी छातीचा एक्स-रे घेतला जातो.
बर्ड फ्लूच्या मानक उपचारासाठी अँटीव्हायरल औषधे दिली जातात.
- लक्षणे दिसल्यावर पहिल्या 48 तासाच्या आत औषधे घेणे महत्त्वाचे आहे.
- माणसामध्ये दिसणार्या व्हायरसमध्ये सामान्य अँटीव्हायरल औषधांसाठी प्रतिकारशक्ती निर्माण होते ज्यामुळे पर्यायी औषधे द्यावे लागतात.
- प्रतिबंधक उपाय म्हणून संसर्गीत व्यक्तीच्या घरातील इतर सर्व सभासदांना व्हायरस ची बाधा झाली आहे का याची तपासणी करुन संसर्ग असलेल्या वातावरणापासून लांब ठेवले पाहिजे.
- काही बाबतीत रुग्णांना वेगळे ठेवले जाते ज्यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता कमी केली जाते.