जीवाणूजन्य संसर्ग काय आहे?
नैसर्गिकरित्या, काही जीवाणू आपल्या शरीरामध्ये असतात आणि ते हानिकारक नसतात. याशिवाय काही जिवाणू आपल्या शरीराच्या बाहेर म्हणजेच वातावरणात असतात. जेव्हा हे जीवाणू आपल्या शरीरात प्रवेश करतात तेव्हा त्यामुळे संसर्ग होतो आणि अशा जीवाणूंना रोग निर्माण करणारे जीवाणू म्हणतात. काही विशिष्ट परिस्थितीत, शरीरातील “सिंबायोटिक” जीवाणू देखील प्रतिकारशक्ती कमकुवत करुन संसर्ग निर्माण करू शकतात.आपले अवयव जसे कि फुफ्फुस, घसा, आंत्र आणि त्वचा हे सुद्धा बाकीच्या अवयवांसोबत जीवाणूमुळे संक्रमित होऊ शकतात. जीवाणूंचा संसर्ग एका आजारी व्यक्तीपासून निरीगी व्यक्तींपर्यंत सहज पसरू शकतो.म्हणून वैयक्तिक आणि समुदायिक स्वच्छता राखण्यासाठी आणि संसर्गास प्रतिबंधिंत करण्यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घेतली पाहिजे.
याची प्रमुख लक्षणे आणि चिन्हे काय आहेत?
जीवाणूंच्या संसर्गाची लक्षणे ही प्रभावित क्षेत्र आणि संसर्गाची तीव्रता यावर अवलंबून असतात. जीवाणूंच्या संसर्गाची सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:
- खोकला.
- ताप.
- डोकेदुखी.
- सर्दी.
- घाम येणे.
- स्नायू वेदना.
- थकवा.
- श्वास घेण्यात अडचण.
- प्रभावित क्षेत्रात वेदना आणि अस्वस्थता..
- प्रभावित क्षेत्रात सूज आणि लालसरपणा.
- भूक न लागणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
संसर्गास कारणीभूत सामान्य जीवाणू हे आहेत
- स्ट्रेप्टोकोकस.
- स्टॅफिलोकोकस.
- ई कोलाई.
- क्लेब्सीला.
- स्यूडोमोनास.
- मायकोबॅक्टेरियम.
जीवाणूंच्या संसर्गाचा धोका वाढवणारी काही प्रमुख कारणे पुढील प्रमाणे आहेत:
- कापल्या जाणे आणि जखमा होणे.
- जीवाणूजन्य संसर्ग असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणे.
- दूषित अन्न आणि पाणी वापरणे.
- संसर्गित व्यक्तीच्या मलाशी संपर्क.
- जीवाणूंच्या संसर्गाने ग्रासित व्यक्तिच्या खोकल्यातून सोडलेल्या श्वासाशी संपर्क.
- अप्रत्यक्ष संपर्क, जसे दूषित पृष्ठांना स्पर्श करणे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
डॉक्टर याचे निदान खालीलप्रमाणे करतात:
- व्यक्तीच्या वैद्यकीय इतिहासाबद्दल माहिती घेऊन.
- व्यक्तीची शारीरिक तपासणी करुन.
- रेडिओोग्राफिक शोध.
- रक्त आणि मूत्र सारख्या लॅब चाचण्या.
जीवाणूंच्या संसर्गाचा अचूक उपचार हा जीवाणूचा प्रकार आणि जो भाग प्रभावित होतो यावर अवलंबून असतो. डॉक्टर टॉपिकल, मौखिक किंवा सूक्ष्मजीवाना नष्ट करणारे इंजेक्टेबल औषध देतात. जर आधी सांगितलेल्या औषधांनी जर बॅक्टेरिया नष्ट झाले नसेल तर डॉक्टरांनी अँटीबायोटिक बदलणे आवश्यक होते.