असायटीस/जलोदर काय आहे?
असायटीस म्हणजे उदरच्या लायनिंग आणि अवयवांमधील जागेमध्ये द्रव साचणे. हे प्रामुख्याने लिव्हर सिर्होसिस (स्कारिंग) शी संबंधित आहे, ज्याचे कारण यकृताचा संसर्ग किंवा यकृताचा लठ्ठपणा आणि मधुमेह असु शकते. सिर्होसिस असणा-या सुमारे 80% रुग्णांना जलोदर होतो. भारतामध्ये, यकृत रोगाच्या प्रभावाची अपर्याप्त माहिती, त्याची तपासणी आणि निपुणतेची कमतरता यामुळे त्याचे प्रमाण स्पष्ट होत नाही. पण असायटीस म्हणजेच जलोदराचे प्रमाण 10-30% असल्याचे आढळून आले आहेत.
असायटीस ची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
असायटीस चे लक्षणे कारणांनुसार सौम्य किंवा क्षणिक असू शकतात. जमा होणाऱ्या द्रवपदार्थाची मात्रा कमी असल्यास ठळक लक्षणे दिसून येत नाही. पण, जास्त द्रवपदार्थांमुळे धाप लागणे हा त्रास होऊ शकतो.
इतर लक्षणांमध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत:
- पोटात सूज किंवा ताण पडणे.
- छातीत द्रव जमा होणे.
- वजन वाढणे.
- तृप्त भावना.
- ब्लोटींग.
- अंगात जडपणा जाणवणे.
- मळमळ किंवा अपचण.
- उलटी होणे.
- पायाच्या खालच्या भागा मध्ये सूज.
- मूळव्याध.
असायटीस बरा न झाल्यास पुढे ह्या समस्या होऊ शकतातः
- बॅक्टेरियल पेरीटोनिटिस.
- डायलुश्नल हायपोनाट्रेमिया.
- हेपॅटोरिनल सिंड्रोम.
- अमबिलीकल हर्निया.
त्याचे मुख्य कारणं काय आहेत?
असायटीस विविध गोष्टींचा परिणाम आहे. सिर्होसिस सर्वात मुख्य कारण आहे, ज्यामुळे रक्त प्रवाह अडवल्या जातो. ज्यामुळे यकृताच्या प्रमुख रक्तवाहिन्यांमधील रक्ताचा दाब वाढतो. मूत्रपिंडांमध्ये द्रव संचय होतो कारण किडनींमध्ये जास्तीचे मूत्र शुद्ध करायची पुरेशी क्षमता नसते. यामुळे असायटीस होतो आणि परिणामी अल्ब्युमिन (रक्त प्रथिने) चे प्रमाण कमी होते. यकृताला नुकसान करणारे रोग असायटीसचे कारण असू शकतात.
उदाहरणे:
- दीर्घकालीन हेपिटायटीस बी किंवा सी संक्रमण.
- जास्त मद्यपान.
- ॲपेंडिक्स,कोलाॉन, अंडाशय, गर्भाशय, स्वादुपिंड आणि यकृत यांचा कर्करोग.
इतर काही अशी आहेत:
- यकृत च्या शिरां मध्ये रक्त क्लॉट होणे.
- रक्तसंचयामुळे हृदय बंद पडणे.
- स्वादुपिंडाचा दाह.
- हृदयाच्या आवरणाची झीज होणे किंवा ते जाड होणे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
पोटात किती सूज आहे हे तपासण्यासाठी सुरुवातीला शारीरिक तपासणी केली जाते.
- द्रवाचा सँपल घेऊन तपासणे.
- संसर्ग किंवा कर्करोगाच्या उपस्थितीची तपासणी करण्यासाठी द्रवाची चाचणी केली जाऊ शकते.
- शपॅरासेन्टिसिस ही प्रक्रिया आहे ज्यामध्ये द्रव काढून विश्लेषणासाठी वापरले जाते.
इमेजिंग चाचण्या
-
उदरचा एमआरआय, सीटी किंवा अल्ट्रासाऊंड.
यकृत आणि किडनी फंक्शन्सचा अभ्यास करण्यासाठी टेस्ट
- 24 तासांच्या कालावधीत मूत्र जमा करणे.
- इलेक्ट्रोलाइट स्थिती.
- किडनीच्या फंक्शनची चाचणी.
- यकृताच्या कामांची चाचणी.
- रक्त गोठण्याची स्थिती.
उपचारांमध्ये मूलत: औषधे समाविष्ट असतात जी शरीरातील अतिरिक्त द्रवपदार्थ काढून टाकतात आणि अँटीबायोटिक्स सुद्धा संसर्गापासून बचावासाठी दिली जातात.
डॉक्टर शिफारस करतात त्या सर्जिकल प्रक्रिया खालील प्रमाणे आहेत:
- अतिरिक्त द्रवपदार्थ काढणे.
- यकृतामधील रक्त प्रवाह सुधारण्यासाठी यकृतात एक विशेष ट्रांजुग्युलर इंट्राहेपॅटिक पोर्टोसिस्टेमिक शंट बसवणे.
जीवनशैलीतील खालील काही बदल सांगितले जातात:
- दारू टाळणे कारण यामुळे आपल्या यकृताला आणखी नुकसान होऊ शकते. (अधिक वाचा: दारू कशी सोडता येईल)
- आहारातील मीठ कमी करा (सोडियम 1500 मिलीग्रामपेक्षा जास्त नाही). पोटॅशियम नसलेले पदार्थ उपयुक्त ठरू शकतात.
- द्रव आहार कमी करा.
असायटीस हा एक रोग नाही परंतु अनुचित जीवनशैलीमुळे होणारी स्थिती आहे. यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. औषधे आणि जीवनशैलीत सुधारणा योग्यरित्या केल्यास, ही स्थिती मोठ्या प्रमाणात कमी केली जाऊ शकते.