पराग ज्वर (हे फिव्हर) काय आहे?
घरातील आणि घरा बाहेरील ॲलर्जन्समुळे जर तुम्ही सर्दी सारखी लक्षणे अनुभवात असाल तर सामान्यतः ते पराग ज्वर असू शकते, ज्याला सर्वसामान्यपणे हे फिव्हर असे म्हणतात. ॲलर्जन्सची यादी खूप मोठी आहे आणि प्रत्येक जण सर्व गोष्टींचा प्रतिकार करेल असे नाही. याशिवाय काही शारीरिक लक्षणे जी लोकं अनुभवतात ती म्हणजे अस्वस्थ वाटणे आणि घर, कार्यालय किंवा शाळेतील रोजची कामं करायला सुद्धा त्रास होणे.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
ॲलर्जीमुळे बरीच वेगवेगळी लक्षणे निर्माण होण्याची शक्यता असते. काही लोकं एक दोन लक्षणांचे कॉम्बिनेशन ॲटॅक/झटक्या सोबत अनुभवू शकतात. सामन्यपणे दिसणारे लक्षणं ही अशी आहेत:
- थकवा.
- खोकला.
- सतत शिंकणे.
- डोळे जळजळणे आणि लाल होणे, त्याच बरोबर बर्याचदा डोळ्यातून पाणी येणे.
- नाक बंद होणे आणि सतत वाहणारे नाक.
- डोळयांखाली गडद पॅचेस आणि सूज.
- नाक आणि घश्यामध्ये कोरडेपणा आणि खाजवणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
काही व्यक्तींमध्ये पहिली प्रतिक्रिया अनुभवताना त्यांचे शरीर ॲन्टीबॉडीजच्या मदतीने ॲलर्जी निर्माण करणार्या वस्तूंचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येकवेळेस जेव्हा शरीर त्या ॲलर्जन्स च्या संपर्कात येईल तेव्हा ते आपोआप शरीरात रसायन सोडतील ज्यामुळे नंतर हे फिव्हरची लक्षणे निर्माण होतात.
सामान्य ॲलर्जन्स अशी आहेत:
- झाडं, गवत आणि रॅग्वीड वरील पराग कण.
- पाळीव प्राण्यांचे डॅन्डर, थुंकी आणि त्वचा.
- धूळ आणि कीटक.
- मूस आणि बुरशी वरील स्पोर्स.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
हे फिव्हरचे निदान करणे सरळ आणि सोपे आहे. याची शक्यता बघण्यासाठी दोन महत्वाचे प्रकार आहेत. ते आहेत:
- रक्त तपासणी करून शरीरावर परिणाम करणार्या ॲलर्जन्स आणि त्याच्यासोबत लढणार्या रक्तातील ॲन्टीबॉडीजची एकूण संख्या माहिती करून घ्यायची.
- सांभाव्य ॲलर्जन्स शोधण्यासाठी त्वचेवर टोचून चाचणी करायची. यामुळे कमी प्रमाणात ॲलर्जन्स शरीरात सोडले जातात. जर त्या व्यक्तीला त्या ठराविक वस्तूची ॲलर्जी असेल तर टोचलेल्या ठिकाणी फोड किंवा मुरुम येऊन त्या वस्तूसाठीची प्रतिक्रिया दिसेल.
हे फिव्हरपासून आणि ॲलर्जन्सपासून वाचण्यासाठी त्याच्यापासून होणार्या प्रतिक्रियेपासून लांब राहणे सर्वोत्तम उपाय आहे. काही लक्षणांसाठी औषधे दिली जाऊ शकतात. अधिक तीव्र लक्षणांसाठी जास्त स्ट्रॉंग औषधे देण्यात येतात. त्यापैकी काही हे आहेत:
- खाजवणार्या,सूजणार्या आणि वाहणार्या नाकासाठी नॅसल कॉर्टिकोस्टिरोइड्स चा वापर करणे.
- सतत शिंकणे,वाहाणारे नाक आणि खाजे साठी ॲन्टीहिस्टामाइन्स. ते गोळ्या किंवा स्प्रेच्या रुपात दिले जाते.ॲलर्जीक प्रतिक्रियेत रिलिझ होणारे रसायन हिस्टामाइनवर नियंत्रण केले जाते.
- चोंदलेल्या नाकापासून मुक्तता मिळविण्यासाठी विविध रुपातील नाक साफ करणारे औषध वापरु शकता. त्याचा कुठलाही दुष्परिणाम जसे की उच्च रक्तदाब, डोकेदुखी आणि निद्रानाश नसतो.
- ल्युकोट्राइन मॉडिफायर हे एक औषध आहे जे ल्युकोट्राइनचे अडथळे जे खूप चिकट पदार्थ आणि वाहणार्या नाकासाठीचे प्रमूख कारण आहेत.
- या लक्षणांपासून आराम मिळविण्यासाठी तोंडी कॉर्टिकोस्टिरोइड्स चा वापर केला जातो.
- चिकट पदार्थाची निर्मिती आणि वाहणार्या नाकापासून आराम मिळविण्यासाठी नॅसल इप्राट्रोपियमचा वापर केला जातो.
इतर उपचारात ॲलर्जी शॉट्स, ॲन्टी ॲलर्जी गोळ्या जिभे खाली ठेवणे, वाफ घेणे आणि सायनस साफ करणे याचा समावेश असतो.