फोड म्हणजे काय?
एखाद्या अवयवामध्ये किंवा ऊतींमध्ये पस तयार होऊन जमा होण्याला फोड म्हणतात. यात सूक्ष्मजीव, मृत पेशी, द्रव आणि इतर कचरा असतो. हे फोडं शरीराच्या कोणत्याही भागावर होऊ शकतात जसे की चेहरा, तोंड, दात आणि मूत्रपिंड आणि पोटासारखे अवयव, पण त्वचेवरचे फोड सर्वात जास्त कॉमन आहेत.
फोडाचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
- त्वचेच्या फोडाची सामान्य लक्षणे लालसरपणा, वेदना, सूज आणि पिवळ्या द्रवपदार्थाने भरलेला त्वचेवरील लहान चट्टा आहे.
- जर तुम्हाला अंतर्गत अवयवांमध्ये फोड असेल तर तुम्हाला त्या भागात वेदना होण्यासोबत संसर्ग झाल्याने ताप येऊ शकतो.
- जर फुफ्फुसांमध्ये फोड असेल तर व्यक्तीला श्वास घेण्यात त्रास होतो, थकवा जाणवतो आणि खोकला होतो. फोड कुठे झाला आहे त्यानुसार तो विशिष्ट अवयवाच्या कार्यामध्ये व्यत्यय आणू शकतो.
- तसेच, टॉन्सिल्स जवळ फोड झाल्यास व्यक्तीला बोलायला आणि गिळायला त्रास होतो.
याची मुख्य कारणं काय आहेत?
- जीवाणू, फंगी आणि परजीवी यांसारख्या इतर सूक्ष्मजीवांमुळे संसर्ग झाल्यास सामान्यतः फोड होते.
- अवयवांमध्ये एखादी बाहेरील वस्तू शिरल्यामुळे देखील फोड होऊ शकतो.
- कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना फोड होण्याची अधिक शक्यता असते. प्रतिकार शक्ती कमकुवत होण्याची कारणं पुढील प्रमाणे आहेत:
- फोड इतर कोणत्या रोगाच्या उपस्थितीच होते असे नाही आहे. निरोगी व्यक्तीलासुद्धा फोड होऊ शकतो.
- त्वचेच्या आतील केस ग्रंथी संक्रमित होऊन त्याच्या भोवती फोड बनू शकतो, याला माणिक असे म्हणतात.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
- साध्या वैद्यकीय तपासणीद्वारे तुमचे डॉक्टर त्वचेच्या फोडाचे निदान करू शकतात. पण शरीराच्या इतर भागांवर फोड झाल्यास, त्यांचे कारण जाणून घ्यायला संपूर्ण वैद्यकीय इतिहासाचा अभ्यास आणि तपासणी करणे आवश्यक आहे.
- जर एखाद्या संसर्गाचा संशय असेल तर, डॉक्टर फोडच्या मध्यभागातील द्रवाची किंवा रक्त तपासणी करायला सांगू शकतात.
- प्रभावित अवयवाचा एक्स-रे किंवा सीटी स्कॅन त्यावरील डोळ्यांना न दिसणाऱ्या फोडाची उपस्थिती तपासण्यासाठी मदत करते.
- उपचार फोडाच्या आकार आणि स्थानावर अवलंबून असतो. जर एक लहान त्वचेचा फोड असेल तर अँटीबायोटिक्स आणि हॉट कॉम्प्रेस सारखे घरगुती उपाय पुरेसे असते.
- अवयवांमध्ये मोठे फोड असल्यास, शस्त्रक्रिया हा उपायचा पर्याय असू शकतो. अॅनेस्थेशिया देऊन, डॉक्टर फोड फोडून त्यामधील पूर्ण पस काढतात. यासोबत, संसर्ग पूर्णपणे साफ करण्यासाठी अँटीबायोटिक्स दिले जातात.
- पारंपरिक इन्सेशन आणि ड्रेनेज शस्त्रक्रियामध्ये खूप सुधार झाले आहेत. डॉक्टर शरीराचा भाग आणि फोडाचा आकार यांनुसार शस्त्रक्रिया करतात.