गुप्तरोग म्हणजे काय?

गुप्तरोग हा एक सांसर्गिक रोग आहे जो प्रामुख्याने लैंगिक मार्गाने पसरतो. कधीकधी, जवळच्या शारीरिक संपर्काद्वारे देखील ते पसरू शकते.

एखाद्या व्यक्तीमध्ये बऱ्याच काळापासून तो गुप्त राहू शकतो आणि त्यांना संसर्गाचा वाहक बनवतो. हा मूळतः बॅक्टेरियल आहे.

याची चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

गुप्तरोग तीन विशिष्ट टप्प्यात होतो, प्रत्येक टप्प्याचे विशिष्ट लक्षणे आहेत.

  • प्राथमिक गुप्तरोग:
    • हा संसर्गाचा प्रारंभिक टप्पा आहे जो 3 महिन्यांपर्यंत दिसून येते.
    • व्यक्तीला इतर कोणत्याही मोठ्या लक्षणांशिवाय, लहान वेदनाहीन अल्सर विकसित होतात.
    • प्राथमिक गुप्तरोग काही हस्तक्षेपांशिवाय काही आठवड्यात बरा होतो.
  • दुय्यम गुप्तरोग:
    • यात हात, पाय आणि जननेंद्रियाच्या क्षेत्रांपर्यंत पुरळ पसरतात.
    • हे चरण संसर्गित झाल्यापासून साधारण 6 महिने राहते.
    • एखाद्या व्यक्तीत ताप, डोकेदुखी आणि असामान्य जननांग वाढ देखील होऊ शकते.
  • तृचरणातील चरण गुप्तरोग:
    • ही प्रगत अवस्था आहे ज्यामध्ये मुख्य अवयवांवर परिणाम होतो.
    • या अवस्थेत अंधत्व, पक्षाघात आणि हृदयविकाराची समस्या  मुख्य चिंतेची बाब असते.
    • उपचार न केल्यास हे घातक होऊ शकते.

याचे मुख्य कारणं काय आहेत?

  • ट्रेपोनिमा पॅलिडम ह्या जीवाणूमुळे गुप्तरोग होतो.
  • असुरक्षित संभोग करणे ह्या संसर्गाच्या प्रसाराचा सर्वात सामान्य मार्ग आहे.
  • समलिंगी पुरुषांना गुप्तरोग विकसित होण्याचा जास्त धोका असतो.
  • एखाद्या संसर्गग्रस्त स्त्रीमुळे नवजात बाळाला देखील संसर्ग होऊ शकतो, ज्याला जन्मजात गुप्तरोग असे म्हणतात.
  • पुरळ किंवा फोडांच्या संपर्कात असल्यास संसर्ग होऊ शकतो.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

गुप्तरोगाचे निदान:

  • चाचण्या करण्यापूर्वी, डॉक्टर आपला लैंगिक इतिहास विचारतात आणि त्वचा, विशेषतः जननेंद्रिय क्षेत्राचे परीक्षण करतात.
  • तपासणी आणि लक्षांणवरून गुप्तरोग असल्याची आशंका वाटल्यास, गुप्तरोगाचा बॅक्टेरिया तपासण्यासाठी फोडांची आणि रक्ताची तपासणी केली जाते.
  • तृतीय चरणातील गुप्तरोगाची शंका असल्यास, वैयक्तिक अवयव तपासण्यासाठी चाचण्या केल्या जातात.
  • मज्जासंस्थावरील परिणाम तपासण्यासाठी पाठीच्या कणाचे द्रव काढून त्यात जिवाणूचे अस्तित्व तपासले जाते.
  • गुप्तरोगाची पुष्टी झाल्यास, साथीदाराला देखील चाचणी करायचा सल्ला देण्यात येतो.

गुप्तरोगाचा उपचारः

  • प्रारंभिक गुप्तरोगासाठी अँटिबायोटिक्स निर्धारित केले जातात, सामान्यतः अँटीबायोटिक्स इंजेक्शनने दिले जातात. पेनिसिलिन हे गुप्तरोगाच्या उपचारांसाठी सर्वसाधारणपणे वापरले जाणारे अँटीबायोटिक आहे.
  • तृतीय चरणातील गुप्तरोगामध्ये, मुख्यतः लक्षणे सुधारण्यासाठी व्यापक उपचार आवश्यक आहेत कारण या अवस्थेत जिवाणू पूर्णपणे नष्ट होऊ शकत नाही.
  • उपचार चालू असतांना कोणतेही लैंगिक संबंध किंवा शारीरिक संपर्क टाळणे महत्वाचे आहे.

Dr Rahul Gam

Infectious Disease
8 Years of Experience

Dr. Arun R

Infectious Disease
5 Years of Experience

Dr. Neha Gupta

Infectious Disease
16 Years of Experience

Dr. Anupama Kumar

Infectious Disease

Medicines listed below are available for गुप्तरोग. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

OTC Medicine NamePack SizePrice (Rs.)
Nagarjuna Chopachini Pak (400 Gm)400 gm Pak in 1 Bottle337.25
Baidyanath Vyadhiharan Rasayana2.5 gm Ras Rasayan in 1 Bottle139.4
Schwabe Platinum muriaticum Dilution 6 CH30 ml Dilution in 1 Bottle72.25
Cipzer Sharbat Murakkab Musaffi Khoon 200 ml200 ml Sharbat in 1 Bottle449.0
Nagarjuna Chopachini Pak (200 Gm)200 gm Pak in 1 Bottle171.0
Baidyanath Malla Sindoor2.5 gm Tablet in 1 Bottle150.0
Baidyanath Chopchinyadi Churna 60gm60 gm Churna in 1 Bottle141.55
Dr. Reckeweg R34 Recalcifying Drop22 ml Drops in 1 Bottle250.8
Baksons B17 Bones Drop30 ml Drops in 1 Bottle157.25
Baidyanath Sarivadyarishta450 ml Arishta in 1 Bottle142.0
Read more...
Read on app