सारांश
बद्धकोष्ठता एक सामान्य परिस्थिती आहे, ज्यामध्ये मलनिःसारण कठीण होते आणि ते कमी वारंवारतेने होते. त्याचे अनेक घटकांशी संबंध आहे उदा. आहार, वैद्यकीय इतिहास किंवा इतर आरोग्य परिस्थितींचे अस्तित्त्व असणें. काही वेळा, काही औषधांमुळे सुद्धा बद्धकोष्ठता होते. सर्वच डॉक्टरांचे असे मत आहे की, बद्धकोष्ठता आजार नसून अंतर्निहित पचनतंत्र परिस्थितीचे प्रकटीकरण आहे. बद्धकोष्ठतेच्या इतर कारणांमध्ये आतड्यांतील अडसर, ओटीपोटीच्या स्नायू कमजोर होणें, आहारात तंतूंचे अभाव किंवा निर्जलीकरण हे सामील आहेत.
बद्धकोष्ठतेचे प्रभावी व्यवस्थापन सहज मिळणार्र्या पाचक औषधांद्वारे शक्य आहे. या औषधांनी तात्काळ आराम मिळत असले, तरी ते सारख्या घेऊ नयेत. अनेक घरगुती उपायही वापरले जाऊ शकतात. घातक बद्धकोष्ठता तुमच्यासाठी समस्याजनक असू शकते आणि कारण निर्धारित करण्यासाठी तुमच्या डॉक्टरांनी अनेक चाचण्या करण्याची गरज पडू शकते. आहारामध्ये बदल बद्धकोष्ठतेच्या व्यवस्थापनामध्ये मदतीचे असतात. बद्धकोष्ठतेवर उपचार न झाल्यास, याच्यात गुंतागुंती होऊ शकतात.