कॅन्सरच्या उपचार प्रामुख्याने दोन प्रकारांनी केला जातो:
सर्जिकल पद्धती
यात अनैसर्गिक वाढ किंवा पेशींचा गोळा काढून टाकण्याचा समावेश असतो त्यानंतर वाढलेला भाग काढायला बायोप्सी केली जाते. जेव्हा ट्यूमर शोधून त्याला सहजासहजी काढणे शक्य असते तेव्हा हे उपयोगी ठरते.
शस्त्रक्रिया नसलेली पद्धत
त्यात किमोथेरपीचा समावेश असतो, ज्यामध्ये मूलत: असामान्यपणे वाढलेल्या पेशींच्या गाठी औषधांच्या मदतीने नष्ट करणे आणि रेडिओथेरपीचा समावेश असतो, ज्यात वाढत्या ट्यूमरवर केंद्रितपणे सोडलेल्या गामा किरणांसारख्या किरणांचा वापर करतात.
कधीकधी शस्त्रक्रिया आणि शस्त्रक्रिया नसलेली पद्धत दोन्हींचा वापर केला जातो. आधी, रेडिओथेरपी किंवा किमोथेरपीद्वारे ट्यूमरचा आकार कमी करण्याचा सल्ला दिला जातो आणि त्यानंतर कॅन्सरच्या जखमांचा भाग कापला जातो. शस्त्रक्रियेनंतर, इतर ठिकाणी त्याचा प्रसार टाळायला पुन्हा किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी केली जाते.
इतर उपचार पर्याय हार्मोनल थेरपी, इम्यूनोलॉजिकल ट्रीटमेंट्स, बिस्फॉस्फोनेट्स इ. विशिष्ट कॅन्सरच्या आवश्यकतेनुसार वापरले जातात. उदा. स्तन आणि पुर:स्थ कॅन्सर हार्मोनल थेरपीद्वारे उपचार केल्यास उपयोगी असतात.
कॅन्सरशी संबंधित लक्षणे वाढण्यापासून रोखायला औषधे देखील दिली जातात. यात वैयक्तिक लक्षणे रोखण्यासाठी पेनकिलर, अँटासिडस्, अँटीपायरेटिक्स यांचा समावेश असू शकतो.
बहुतेकदा, वेदनाशामक घेणे हा एकमेव उपचार शक्य असतो, जिथे कॅन्सरमुळे सतत होणारी वेदना आणि अस्वस्थता दूर करण्यासाठी मॉर्फिन किंवा इतर वेदनाशामक औषधांचे पॅच वापरले जातात, कारण कॅन्सर स्वत:च्या व्यापक स्वरूपामुळे नियंत्रित होऊ शकत नाही.
नवीन प्रकारचे उपचार
कॅन्सरच्या उपचाराचे क्षेत्र अत्यंत उदयोन्मुख क्षेत्र आहे. खर्च कमी करायला आणि पुन्हा कॅन्सर होण्याचे टाळायला जवळजवळ दरवर्षी नवनवीन उपचार पद्धती वापरल्या जात आहेत. त्याच्या प्रकारानुसार कॅन्सरचा वारंवारता दर सुमारे सात ते 100 पर्यंत आहे. नवीन संशोधन कॅन्सरच्या पेशींचे कार्य समजून घ्यायला त्यांचे मार्ग शोधण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत जेणेकरुन त्यांची वाढ आणि प्रसार रोखण्याचे सर्वोत्तम मार्ग शोधता येतील. यामध्ये सीएससी मार्कर ओळखायला आणि कॅन्सरच्या विकासामागील विशिष्ट डीएनएतील फेरफार आणि अनुवंशशास्त्र शोधायला सीएससी लक्षित करायला आणि मारून टाकायला विशिष्ट टी पेशी विकसित करण्याच्या कॅन्सरच्या स्टेम सेल्सवरील अभ्यासांचा समावेश आहे.
राहणीमानात बदल
प्रभावित व्यक्तीने फक्त राहणीमानात किरकोळ बदल केल्यास त्याचे जीवन सुधारायला आणि लक्षणे नियंत्रित ठेवायला मदत मिळू शकते. यात खालील बाबींचा समावेश असू शकतो:
-
घरी बनवलेले पौष्टिक अन्न खा
-
नियमितपणे व्यायाम करा. आठवड्यातून 5 दिवस 30 मिनिटांच्या मध्यम जोमदार व्यायामाने मदत होऊ शकते. तुम्ही अति कष्टदायक क्रिया करायला अक्षम असाल तर, 30 मिनिटांच्या झटपट चालण्याने मदत होऊ शकते.
-
तंबाखू आणि मद्यपान टाळा.
-
तुमचे पुढचे मूल्यांकन करायला नियमित आरोग्य तपासणीला जा.
-
योगा करून, ध्यान करून किंवा आवडीने किंवा छंदानुसार ताणतणावावर व्यवस्थित नियंत्रण ठेवा.
-
नेहमी आनंदी, प्रसन्न आणि सकारात्मक रहा. सर्व कॅन्सर असाध्य आणि प्राणघातक नसतात.