वॉल्फ-पार्किन्सन-व्हाईट सिंड्रोम (डब्ल्यूपीडब्ल्यू) म्हणजे काय?
सामान्य परिस्थितीत, हृदयातील विद्युत सिग्नल हृदयाचा ठोका व्यवस्थापित करतात. हे विद्युत सिग्नल हृदयाच्या वरच्या चेंबर्सवरून खालच्या चेंबर्समध्ये ॲट्रीओव्हेंट्रिक्युलर (एव्ही) नोड नावाच्या ऊतीद्वारे प्रवास करतात. व्हेंट्रिकल्समध्ये प्रवेश करण्यापूर्वी सिग्नल एव्ही नोडमध्ये थांबतात. वॉल्फ पार्किन्सन व्हाईट सिंड्रोम (डब्ल्यूपीडब्लू) मध्ये, अतिरिक्त मार्ग बनलेला असतो ज्यातून एव्ही नोडमध्ये न थांबता सिग्नल सरळ खालच्या चेंबरमध्ये जातो. यामुळे हृदयातील ठोके वाढतात. ते सामान्य प्रति मिनिट 70-80 बीट्सऐवजी प्रति 200 बिट्सपर्यंत पोहोचू शकतात.
याची चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
डब्ल्यूपीडब्ल्यू सिंड्रोममध्ये खालील लक्षणे दिसून येतात:
- हृदयाचे ठोके वाढण्याच्या घटना.
- हृदयाचे पॅल्पिटेशन.
- छातीत वेदना आणि घट्टपणा जाणवणे.
- श्वास घेण्यात अडचण येणे.
- रक्तदाब कमी होणे.
- चक्कर येणे.
याची मुख्य कारणे काय आहेत?
डब्लूपीडब्लूचे कारण अद्याप सापडले नाही आहे, परंतु खालील गोष्टींमुळे ते होऊ शकते:
- पुरुषांमध्ये.
- हृदयातील अनुवांशिक दोषामुळे.
- पालकांकडून अनुवांशिकरित्या झाल्यामुळे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
डब्ल्यूपीडब्ल्यूचे निदान करण्यासाठी खालील चाचण्या केल्या जातात:
- वैद्यकीय इतिहासाचा अभ्यास करणे आणि शारीरिक तपासणी करणे.
- हृदयाच्या संरचनात्मक दोषांची शक्यता कमी करण्यासाठी इकोकार्डियोग्राम चाचणी करणे.
- हृदयाचे विद्युत सिग्नल चालन प्रणाली तपासण्यासाठी इलेक्ट्रोकार्डियोग्राम चाचणी करणे.
- असामान्यता व्यायाम करतांना राहते की नाही हे तपासण्यासाठी व्यायाम चाचणी करणे.
- हृदयाच्या विद्युतीय क्रियाकलापांची तपासणी करण्यासाठी इलेक्ट्रोफिजियोलॉजी करणे.
डब्ल्यूपीडब्लूच्या उपचार पद्धती खाली नमूद केल्या आहेत:
- हृदयाच्या ठोक्यांचा वेग कमी करण्यासाठी किंवा त्याच्या दरातील वाढ टाळण्यासाठी अँटी-अर्रिथ्मिक औषधे दिली जातात.
- औषधे अप्रभावी झाल्यास विद्युत कार्डियोव्हर्जन ही डब्ल्यूपीडब्ल्यू सिंड्रोम व्यवस्थापित करण्यासाठी वापरली जाणारी दुसरी पद्धत आहे.
- इलेक्ट्रोफिजियोलॉजी ज्यामध्ये अवांछित मार्ग छोट्यख रेडिओफ्रीक्वेंसी उपचारांद्वारे काढला जातो.
- नको असलेला अतिरिक्त मार्ग काढण्यासाठी ओपन हार्ट सर्जरी केली जाऊ शकते.