विल्म्स ट्यूमर काय आहे?
विल्म्स ट्यूमर रिनल किंवा मूत्रपिंडाचा कर्करोग आहे. मुलांमध्ये हा सर्वात सामान्य प्रकारचा सॉलिड मॅलिग्नंट नेओप्लाझम (कर्करोगाचा ट्यूमर) असतो. या स्थितीचे वर्णन प्रथम डॉ. मॅक्स विल्म्स, या एका सर्जनने वेगळ्या नावाखाली केले होते आणि सुरुवातीला हा मूत्रपिंडाचा जन्मजात सर्कोमा म्हणून ओळखला जात होता.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
हा ट्यूमर जवळजवळ नेहमीच मूल 10 वर्षाचे होण्यापूर्वी सापडतो. विल्म्स ट्यूमरच्या सामान्य लक्षणांमध्ये यांचा समावेश होतो:
- पोट ठळकपणे मोठे होणे.
- पोटदुखी.
- भूक न लागणे.
- मळमळणे.
- उलट्या.
- हेमट्युरिया (लघवीतून रक्त जाणे).
- हेपेटोमेगाली (वाढलेले यकृत).
- असायटिस (उदरामध्ये द्रव जमा होणे).
- कंजेस्टिव्ह हार्ट फेलिअर.
- रक्तदाब वाढणे.
- डिस्मोर्फिझम (असामान्य शरीर रचना).
- फिकेपणा.
याची मुख्य कारणे काय आहेत?
विल्म्स ट्यूमर एक दुर्मिळ रोग आहे आणि यात अनुवांशिक घटक महत्वाची भूमिका बजावतात. विल्म्स ट्यूमरचे रोगजनक समजून घेण्यात, सबस्टंटियल आनुवंशिकी आणि आण्विक अभ्यासाचे योगदान आहे. गुणसूत्र 11 मधील बदल विल्म्स ट्यूमरशी संबंधित आहेत.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
विल्म्स ट्यूमरचे याप्रकारे निदान केले जाते:
- वरील ओटीपोटात सूज येणे.
- इतिहास आणि कौटुंबिक इतिहास.
- उदर आणि ओटीपोटाची अल्ट्रासोनोग्राफी.
- नवजात शिशुंमध्ये हायपोग्लामसेमिया (कमी रक्त शर्करा).
- संगणित टोमोग्राफी (सीटी) स्कॅन.
- पूर्ण रक्त गणना (सीबीसी).
- रिनल (किडनी) फंक्शन टेस्ट.
- लघवी ची चाचणी.
- लिव्हर फंक्शन टेस्ट.
विल्म्स ट्यूमरच्या उपचारांमध्ये सर्जरी, किमोथेरपी आणि रेडिओथेरपी समाविष्ट आहे. ट्यूमर तुटण्याची शक्यता असल्यामुळे, शस्त्रक्रिया चिंताजनक असते. एकपक्षी रिनल ट्यूमरमध्ये मूत्रपिंडावर, ट्रांसपेरिटोनियल रॅडिकल काढणे, एक प्रकारची शस्त्रक्रिया ज्यामध्ये ओटीपोट उघडून मूत्रपिंड काढून टाकले जाते, याला प्राधान्य दिले जाते. अनेक प्रकरणांमध्ये मूत्रपिंड आंशिक काढणे किंवा आंशिक कापून काढणे देखील विचारात घेतले जाते. एकदा काढल्यानंतर रोगमुक्तता जलद होते. एका किडनीवर भार वाढून जटिलता होणे टाळण्यासाठी, डायलिसिसची आवश्यकता भासू शकते.