व्हायरल ताप म्हणजे काय?
ताप हे असे आजाराचे लक्षण आहे ज्यात शरीराचे तपमान सामान्यपेक्षा जास्त असते. सर्वसाधारणपणे ताप येणे हे शरीरात शिरलेल्या परकीय जीवाशी शरीर लढत आहे याचे लक्षण असते. जेंव्हा हा परजीव एक विषाणू असतो तेंव्हा त्याला व्हखयरल ताप असे म्हणतात. अनेक व्हायरल संसर्गांमुळे ताप येतो जसे की साधी सर्दी, डेंग्यू आणि श्वसनसंस्थेचा संसर्ग.
याच्याशी निगडीत चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
व्हायरल ताप आलेल्या व्यक्तित पुढील चिन्हे आणि लक्षणे दिसू शकतात:
- अंगदुखी.
- अशक्तपणा.
- भूक न लागणे.
- वजन कमी होणे.
- थकवा.
- मळमळ.
- उलट्या.
- अंगावर चट्टे उठणे.
- डोकेदुखी.
- थंडी वाजणे.
- हुडहुडी भरणे.
याची प्रमुख कारणं काय आहेत?
सर्वसामान्य व्हायरल संसर्ग ज्यामुळे ताप येतो ते पुढीलप्रमाणे आहेत:
- डेंग्यूचा ताप.
- श्वसनसंस्थेचा सिन्सिशियल विषाणू संसर्ग.
- एचआयव्ही.
- कानाच्या मध्यभागी संसर्ग.
- स्वाईन फ्लू.
- कांजण्या.
- गोवर.
- हर्पिस सिम्प्लेक्स.
- हेपटायटीस.
- शिंगल्स.
विषाणूंनी दूषित अन्नाचे सेवन केल्यामुळे त्या अन्नातून होणार्या विषबाधेमुळेही व्हायरल ताप येऊ शकतो. विषाणू संसर्ग झालेया व्यक्तीच्या शिंकेतून होणार्या दूषित हवेच्या संपर्कात आल्यानेही व्हायरल आजार पसरू शकतात. डासांसारख्या कीटकांच्या माध्यमातून डेंग्यू सारखे विषाणू पसरतात.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
ताप आल्याचे किंवा इतर लक्षणांचे निदान करण्यासाठी डॉक्टर शारीरिक तपासणी करतात. त्यानंतर विविध रक्त चाचण्या करण्यास सुचविल्या जातात ज्यामधे व्हायरल अॅन्टीबॉडीज (विविध वायरल संसर्गांच्या विरोधातील अॅन्टीबॉडीज) आहेत का ते तपासले जाते. विषाणू ओळखण्यासाठी अल्ट्रासाऊंड आणि छातीचा एक्स रे सारख्या विशिष्ट चाचण्या केल्या जातात.
व्हायरल तापावरचे उपचार त्याच्या कारणावर अवलंबून असतात. डॉक्टर पुढे दिलेले उपचार सुचवू शकतात
- वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामके.
- ताप कमी करण्यासाठी अॅन्टी पायरेटिक्स.
- व्हायरल संसर्ग कमी करण्यासाठी अॅन्टी व्हायरल ड्रग्स.
जीवनशैली व्यवस्थापनाच्या पुढील सूचना व्हायरल ताप टाळण्यासाठी आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी उपयोगी ठरतात:
- ताण कमी करणे.
- आरोग्यदायी आणि समतोल आहाराचे सेवन.
- नियमित व्यायाम.
- पुरेसा व्यायाम.
- भरपूर पाणी पिणे.