ट्यूलेरिमिया काय आहे?

ट्यूलेरिमिया म्हणजे बॅक्टरीयाचा संसर्ग; जो संसर्गित प्राण्याकडून मनुष्याकडे प्रसारित केला जातो. हा एक दुर्मिळ आजार आहे, परंतु  मुख्यतः उत्तर अमेरिका आणि युरोप आणि आशियाच्या काही भागांमध्ये आढळतो.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

ट्यूलेरिमियाची लक्षणे खालील प्रमाणे आहेत:

बॅक्टेरियाच्या संपर्कात आल्यानंतर 3-5 दिवसांनी लक्षणे दिसू लागतात.

याची मुख्य कारणं काय आहेत?

ट्यूलेरिमियाचे मुख्य कारण फ्रान्सिसला ट्यूलेरेन्सिस नावाचा बॅक्टरीया आहे. हा बॅक्टरीया अनेक कुरतडणाऱ्या जंगली प्राण्यांमध्ये आढळून येतात.संसर्ग झालेला प्राणी चावल्याने किंवा गोचीड, मच्छर आणि घोडमाशी यामुळे मनुष्याला हा रोग होतो. हा बॅक्टरीया असलेल्या घाण जागी श्वास घेण्यामुळे संसर्ग  होऊ शकतो. संसर्गित प्राण्यांशी थेट संपर्क किंवा मृत शरीराला हाताळणे देखील प्रसाराचे एक कारण आहे. पूर्णपणे व्यवस्थित न शिजलेले आणि संसर्गित मांस खाणे देखील संसर्ग पसरवू शकते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

ट्यूलेरिमियाचे निदान करणे कठीण होऊ शकते कारण त्याची लक्षणे इतर सामान्य रोगांच्या लक्षणांसारखीच असतात त्यामुळे गोंधळ होऊ शकतो. परंतु, ट्यूलेरिमियाचे निदान  विशेषतः रक्त तपासणी आणि छातीच्या एक्स-रे च्या मदतीने केले जाते. कुरतडणारे प्राणी हाताळण्याचा इतिहास व शारीरिक तपासणीदेखील निदान करण्यात मदत करतात.

निदानाची पुष्टी झाल्यानंतर, डॉक्टर अँटीबायोटिक्स उपचार म्हणून वापरण्याची शिफारस करतील. ट्यूलेरिमियाच्या उपचारांसाठी सर्वसाधारणपणे वापरले जाणारे अँटीबायोटिक्स खालीलप्रमाणे आहेत:

  • स्ट्रिप्टोमायसिन.
  • जेंटॅमायसिन.
  • सिप्रोफ्लॉक्सासिन.

लक्षणांच्या तीव्रतेवर अवलंबून उपचार 3 आठवड्यांपर्यंत चालू शकतात.

ग्लव्ह्ज घालून प्राणी आणि माती हाताळल्याने, आणि फक्त व्यवस्थित शिजवलेले मांस खाल्ल्याने ट्यूलेरिमियापासून संरक्षण शक्य आहे.

ट्यूलेरिमियाचा उपचार करणे शक्य आहे. पण या रोगाचे निदान योग्यरीत्या होऊ शकले नाही तर तो न्युमोनियाला आणि हाडांच्या संसर्गाला कारणीभूत ठरू शकतो.

 

Read more...
Read on app