थ्रॉम्बोसायटोपेनिया आणि इम्यून थ्रॉम्बोसायटोपेनिया म्हणजे काय?
प्लेटलेट्स हा रक्तामधील महत्वाचा घटक आहे. थ्रॉम्बोसायटोपेनिया मध्ये रक्तातील प्लेटलेट्स त्यांच्या सामान्य पातळीपेक्षा कमी झालेल्या असतात. प्लेटलेट्स या रक्त थांबवण्यात महत्वपूर्ण कार्य करतात आणि जखम भरून काढण्यासाठी व रक्तस्त्राव थांबवण्यासाठी प्लेटलेट्सची गरज भासते. इम्यून थ्रॉम्बोसायटोपेनिया (आयटीपी) ही स्वयं रोगप्रतिकारक विकृती आहे ज्यामुळे शरीरातील प्लेटलेट्स कमी होऊन त्यांची कमतरता निर्माण होते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
किरकोळ थ्रॉम्बोसायटोपेनिया आणि आयटीपी मध्ये कोणतेही लक्षणे निर्देशनास येत नाही. गंभीर स्वरूपातील थ्रॉम्बोसायटोपेनिया मध्ये शरीरातील एखाद्या अवयवातून रक्तस्त्राव होत असल्याने तत्काळ वैद्यकीय मदत लागते.
आयटीपी मध्ये पुढील लक्षणे दिसतात:
- त्वचेवरील निळसर भाग आणि लाल डाग त्वचेखाली रक्तस्त्राव झाल्याचे दर्शवतात.
- त्वचेखाली गाठ होणे.
- नाकातून रक्तस्त्राव होणे.
- हिरड्यांतून रक्त येणे.
- लघवी आणि शौचावाटे रक्त येणे.
- जखमेतून फार काळ रक्तस्त्राव होणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
थ्रॉम्बोसायटोपेनिया चे कारण अद्याप माहित नाही. काही वेळा पुढील घटक किंवा त्यांचे एकत्रीकरण थ्रॉम्बोसायटोपेनियास कारणीभूत ठरू शकतात:
- आनुवंशिकता, पालकांकडून मुलांना.
- अस्थिमज्जेत अपुऱ्या प्लेटलेट्स तयार होणे.
- अस्थिमज्जा पुरेश्या प्रमाणात प्लेटलेट्स तयार करत असूनही त्या वापरल्या जाणे किंवा शरीराकडून नष्ट होणे.
- प्लीहात मोठ्या प्रमाणात प्लेटलेट्स धरून ठेवणे.
शरीर जेव्हा प्लेटलेट्सवर हल्ला करतो आणि ते नष्ट होऊ लागतात तेव्हा रोग प्रतिकारशक्तीच्या प्रतिक्रियेमुळे आयटीपी होतो. हे इतर जिवाणू आणि विषाणूंच्या व्हायरल संसर्गा शीही संबंधित असू शकते.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
शारीरिक तपासणी, वैद्यकीय इतिहास आणि रक्त चाचणी करून प्लेटलेट्सच्या कमतरतेचे निदान केले जाते. आयटीपी चे कारण असल्याची शंका असल्यास डॉक्टर पुढील चौकशी करू शकतात.
- रक्तस्रावाची लक्षणे.
- प्लेटलेट्स कमी होण्यास कारणीभूत असलेला एखादा आजार.
- रक्तस्रावास आणि प्लेटलेट्स कमी होण्यास कारणीभूत असलेली एखादी चालू असलेली थेरपी.
सौम्य थ्रॉम्बोसायटोपेनिया आणि आयटीपी ला उपचाराची गरज नसते. या परिस्थितीच्या गंभीर स्वरुपाच्या उपचारसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध थेरपीज पुढीलप्रमाणे आहेत:
- प्लेटलेट्स कमी करण्याचा वेग हळूहळू मंदावणारे औषधोपचार जसे कि कॉर्टिकोस्टेरॉईड्स.
- गंभीर प्रकरणांमध्ये रक्त किंवा प्लेटलेट्सचे ट्रान्सफ्युजन.
- औषधोपचारांना कोणताही प्रतिसाद न दिल्यास शेवटचा पर्याय म्हणून प्लीहा काढून टाकणे. सामान्यतः हा उपचार आयटीपी साठी उपयोगात आणला जातो.