घश्याचा संसर्ग म्हणजे काय?
घसा हा शरीराचा एक भाग असून त्यामार्फत अन्ननलिकेपर्यंत अन्न आणि श्वसननलिकेपर्यंत हवा पोहोचवली जाते. वैद्यकीय परिभाषेत घशाला फॅरिंक्स असे म्हणतात. घश्याच्या संसर्गामध्ये घसा दुखणे, त्रस्त घसा आणि घसा खवखवणे असे त्रास होतात. विषाणू हे घश्याच्या संसर्गाचे अतिसामान्य कारण असले तरी जिवाणूही यास कारणीभूत असू शकतात.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
पुढील लक्षणे घश्याच्या संसर्गामध्ये सामान्यतः अनुभवास येतात:
- अन्न गिळण्यास अडचण येणे.
- घसा दुखणे.
- घोगरा आवाज.
- डोकेदुखी.
- कफ.
- गळ्यातील लिम्फ ग्रंथींचे सुजणे.
- ताप.
- मळमळ आणि उलटी.
याची मुख्य कारणं काय आहेत?
घश्याच्या संसर्गाचे मुख्य कारण हे विषाणू आणि जिवाणू आहे
- अंदाजे 90% घश्याचे संसर्ग विषाणूंमुळे होतात. घश्याच्या संसर्गास कारणीभूत असलेले विषाणू हे फ्लू, सर्दी, डांग्या खोकला, कांजण्या आणि गोवर यांना कारणीभूत असलेले विषाणू असतात.
- जिवाणूंमुळे होणार घशाचा संसर्ग हा सहसा स्ट्रेप्टोकोकल संसर्गामुळे होतो.
धूम्रपान, प्रदूषण आणि ॲलर्जी मुळे घश्याच्या संसर्गाचा धोका वाढू शकतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
डॉक्टर रूग्णाची संपूर्ण शारीरिक तपासणी करून घश्याचा संसर्ग हा नाक व कानाच्या जवळील भागात आहे का हे तपासतात. डॉक्टर ताप तपासण्यासाठी शरीराचे तापमान मोजतात तसेच कान, नाक, घसा आणि मानेतील लसीका गाठीही तपासतात. डॉक्टरांना घश्याचा संसर्गाची शंका असल्यास ते गळ्यातील द्रवाची स्ट्रेप चाचणी आणि लॅबोरेटरी चाचणी करण्यास सुचवतात.
घश्याचा संसर्गावर मात करण्यासाठी पुढील काही उपचार पद्धती निर्धारित केल्या जातात.
- जिवाणू संसर्गाच्या प्रकरणांमध्ये अँटिबायोटिक्स.
- व्हायरल संसर्गाचा उपचार.
- वेदना शामक जसे की इब्युप्रोफिन आणि ॲस्पिरीन सारखी घसादुखीपासून आराम देणारी औषधे.
- उष्माघातास प्रतिबंध करण्यासाठी पुरेश्या प्रमाणात पाणी पिणे.
नॉन प्रिस्क्रिप्शन थ्रोट लोंझेंजेस आणि कूल मिस्ट व्हेपोरायझर घसादुखीपासून आराम देण्यास आणि इतर संबंधित लक्षणे कमी करण्यास मदत करतात.चांगली स्वच्छता राखल्यानेही संसर्गसास प्रतिबंधित करण्यास मदत मिळू शकते.