स्वीमर्स इअर काय आहे?

स्वीमर्स इअरला ओटीटिस एक्स्टर्ना सुद्धा म्हणतात, हा बाह्य कानाच्या नलिकेचा संसर्ग आहे. ही नलिका कानामध्ये आवाज पोहोचवते. या संसर्गाला 'स्वीमर्स इअर' असे म्हणतात कारण जे लोक पाण्यात जास्त वेळ घालवतात त्या लोकांना हा सामान्यपणे जास्त प्रमाणात होतो.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

स्वीमर्स इअरचे सौम्य लक्षणं म्हणजे कान दुखणे आणि खाजवणे हे आहे. कानाचा रंग लाल होऊ शकतो आणि तुम्हाला कानातून द्रव स्त्रवत असल्याचे देखील जाणवू शकते.

संसर्ग जसा वाढतो, तसतशा वेदना, लाली आणि खाजही वाढते. द्रवासह, कानातून पसदेखील वाहतो. रुग्ण कानात विविध आवाज ऐकू आल्याची देखील तक्रार करू शकतो.

एकदा संसर्ग वाढला की, वरील सर्व लक्षणं आणखी वाढतात. याव्यतिरिक्त, संसर्गामुळे ताप आणि लिम्फ नोड्सला सूज देखील येऊ शकते.

याची मुख्य कारणं काय आहेत?

  • स्वीमर्स इअर मुख्यत्वे बॅक्टेरिया, बुरशी आणि व्हायरससारख्या सूक्ष्मजीवांमुळे होतो.
  • कानातील ओलाव्यामुळे बॅक्टेरिया द्विगुणित होण्यास पोषक वातावरण तयार होते. म्हणूनच जे लोक पाण्यात जास्त वेळ घालवतात ते या संसर्गाला अधिक बळी पडतात.
  • इअरबड्स, पिन किंवा अगदी बोटामुळे कान सतत कोरल्याने संसर्ग वाढण्याची शक्यता वाढते.
  • कानाची उपकरणे आणि इयरफोन्स सारख्या बाहेरील वस्तूंमुळे संसर्ग होऊ शकतो.
  • त्वचेची ॲलर्जी असलेल्या व्यक्तीला अशा प्रकारच्या संसर्गाची अधिक शक्यता असते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

तुमचा वैद्यकीय इतिहास आणि लक्षणांवर आधारित, डॉक्टर आपल्या कानांचे परीक्षण करून सुरुवात करतील.

  • ओटोस्कोप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विशिष्ट उपकरणाचा वापर कानाच्या आतील लालसरपणा पस किंवा मळ पाहण्यासाठी केला जातो.
  • जर कानाचा पडदा गंभीरपणे खराब झाला असेल तर, कोणत्या सूक्ष्मजीवामुळे संसर्ग झाला आहे का  हे तपासण्यासाठी आणखी काही तपासण्याची आवश्यकता असू शकते.

उपचार

  • प्राथमिक उपचार म्हणजे सूक्ष्मजीवांचे प्रतिजैविकेतून बाहेर काढले जातात.
  • कान विशिष्ट सौम्य ॲसिडिक सोल्यूशनने साफ केला जातो आणि सर्व मळ काढून टाकला जातो.
  • कानांच्या नलिकेची सूज कमी करण्यास स्टेरॉईडयुक्त कानांच्या थेंबांची मदत होते.
  • संसर्गाचे सामान्यतः 10-12 दिवसांमध्ये कोणत्याही मोठ्या कॉम्प्लेक्सेस शिवाय निराकरण होते.
Read more...
Read on app