रेस्ट्रलेस लेग सिंड्रोम काय आहे?
रेस्ट्रलेस लेग सिंड्रोम हा मज्जासंस्थेशी निगडित एक विकार असून त्यात पाय सतत हलवण्याची जोरदार इच्छा होते. मांडी, पोटरी आणि पायाला अगदी क्वचितच, चेहऱ्यावर, हात आणि छातीवर अप्रिय वळवळल्यासारख्या किंवा विचित्र संवेदना जाणवतात. या साधारणतः संध्याकाळी किंवा रात्री जास्त प्रमाणावर जाणवतात.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
याची लक्षणे अप्रिय असून, सौम्य ते मध्यम असू शकतात आणि क्वचित किंवा दररोज जाणवू शकतात. त्यात खालील बाबींचा समावेश होतो:
- पायात (विशेषत: पोटरीत) वेदनादायक पेटके, खाज, विचित्र संवेदना, वळवळ, मुंग्या येणे, आग होणे किंवा ठणकणे.
- असे वाटते की पायातील रक्तवाहिन्या विचित्र पाण्याने भरल्या आहेत.
- दीर्घ काळासाठी बसणे अवघड होते.
- झोपेत काही ठराविक वेळेनंतर अवयवांची हालचाल होते (पीएलएमएस) त्या हालचाली अगदी सौम्य, पुनरावृत्तीत, अनियंत्रित, हिसका बसल्यासारख्या किंवा रात्रीच्या वेळी झोपेत अचानक स्नायू अकडल्यासारख्ये वाटतात. हे दर 20 ते 40 सेकंदात जाणवू शकतात.
- जागे असतांना आणि विश्रांती घेत असतांना देखील अनैच्छिकरित्या पायांची हालचाल होते.
याची मुख्य कारणं काय आहेत?
या विकाराचे मुख्य कारण अद्याप अज्ञात आहे आणि त्याला आनुवंशिक आणि विशिष्ट जीन्सशी संबंधित मानले जाते. काही संबंधित कारण अशी असू शकतात:
- स्नायूंच्या हालचाली नियंत्रित करणाऱ्या आणि हालचालींसाठी आवश्यक असलेल्या डोपमाइन नावाच्या न्यूरोट्रांसमीटरची त्याची पातळी खालावणे.
- आयर्नची कमतरता, ॲनिमिया, क्रोनिक यकृत रोग, मधुमेह यासारखे आरोग्यविषयक विकार किंवा गर्भधारणा.
- काही ट्रिगर्स ज्यामध्ये काही औषधे, धूम्रपान, कॅफेन, अल्कोहोल, लठ्ठपणा, तणाव आणि व्यायामाचा अभाव यांचा समावेश होतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
लक्षणांचा तपशीलवार इतिहास, त्यांची तीव्रता लक्षात ठेवून, त्यांची पुनरावृत्ती, वारंवारता, त्यांना कसे सोडवले जाते, या हालचालींमुळे झोपेत येणारा अडथळा आणि तणाव याचे संपूर्ण मूल्यांकन केले जाते. नंतर एक संपूर्ण शारीरिक तपासणी केली जाते, त्यानंतरः
- ॲनिमिया, यकृताच्या समस्या आणि मधुमेह यांच्या शक्यता फेटाळण्यासाठी रक्त तपासणी.
- झोपेची परीक्षा ज्यात तुम्हाला तुमचे शरीर न हलवता अंथरुणावर झोपवले जाते कोणत्याही अनैच्छिक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी इमोबिलायझेशन चाचणी केली जाते.
- श्वासोच्छ्वासाचा दर, मेंदूतील लहरी आणि झोपलेले असतांना हृदयाचे ठोके यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीसोम्नोग्राफी.
रेस्ट्रलेस लेग सिंड्रोमच्या व्यवस्थापनात खालील बाबी समाविष्ट आहेत:
- सौम्य प्रकरणे जीवनशैलीतील बदलांसह व्यवस्थापित केली जाऊ शकतात ज्यात समाविष्ट आहे:
- वर उल्लेख केलेले ट्रिगर्स टाळणे.
- झोपण्याची योग्य सवय.
- नियमित व्यायाम.
- त्रास होत असतांना केल्या जाणाऱ्या उपचारात समाविष्टीत आहे:
- पायाला मसाज करणे, गरम किंवा थंड कॉम्प्रेस लावणे किंवा गरम पाण्याने आंघोळ करणे.
- दर्लक्ष करण्याकरिता दुसऱ्या क्रियाकलापांमध्ये गुंतणे, जसे की वाचणे.
- आराम किंवा ताण देणारे व्यायाम करणे.
- औषधोपचारांसह उपचारांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
- डोपामाइन ॲगोनिस्ट्स, ज्यामध्ये रोपिनिरोल, प्रामीपेक्सोल किंवा रोटिगोटाइन स्किन पॅच समाविष्ट आहेत.
- वेदना कमी करण्यासाठी औषधे कोडिन, गॅबापेन्टिन आणि प्रीगाबॅलिन समाविष्ट असतात.
- झोपे-संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी टेमाझिपम आणि लोप्राझोलम सारखी औषधे वापरली जातात.
- हा विकार आयर्नच्या कमतरतेमुळे असेल तर आयर्न पूरक देऊन त्याचे निराकरण केले जाऊ शकते आणि गर्भधारणा हे कारण असल्यास, त्याचे निराकरण आपोआपच होते.