गरोदरपणातील दुखणे काय आहे ?
गरोदरपणात वाढणाऱ्या बाळाला जागा करण्यासाठी शरीरात बरेच बदल होत असतात त्यामध्ये हार्मोन बदल ही होत असतात. शरीराच्या सामान्य रचनेत बरेच बदल होत असतात, त्यामुळे शरीराच्या विविध भागात वेदना होतात.
याच्याशी संबंधित चिन्हे आणि लक्षणे काय आहे?
गरोदरपणात होणाऱ्या वेदनेशी संबंधित मुख्य चिन्हे आणि लक्षणे खालील प्रमाणे आहे:
- बद्धकोष्टता.
- नाकातून रक्त बाहेर पडणे.
- थकवा.
- लघवी करताना त्रास होणे.
- भावनेत आणि जाणिवेत बदल होणे.
- काळजी .
- पायामध्ये सुजन येणे.
- पोट फुगणे.
- मळमळ.
- उलट्या.
- हिरड्यातून रक्त येणे.
- भिती.
- घाम येणे.
- वजन वाढणे.
- ताप.
- स्तनांमध्ये दुखणे .
- योनीतून पांढरे पाणी येणे .
- विसरणे .
- थंडी वाजणे .
- हिटबर्न.
- श्वास घ्यायला त्रास होणे – डीसपनोइया.
याची मुख्य कारणं काय आहेत?
गरोदरपणात वेदना होण्याचे मुख्य कारणं ही आहेत:
- प्रिक्लेम्प्शिया (उच्य रक्तदाब) मुळे डोकेदूखी किंवा मायग्रेन होतो.
- गर्भशयातील स्नायू आणि लिगामेन्ट्स ताणायला सुरवात होते त्यामुळे ओटीपोटाच्या एक किंवा दोन्ही बाजूला वेदना होतात .
- गर्भाशयाच्या वाढत्या वजनामुळे वेदना होऊ शकतात, पायाला मुंग्या येणे किंवा बधिर होणे.
- गर्भामुळे पाठीवर आणि शरीरावर ताण पडतो,त्यामूळे पाठदुखी होऊ शकते.
- प्लॅसेंन्टल अब्रप्शन, या परिस्थितीत प्लॅसेंटा गर्भाशयापासून दूर होते, त्यामुळे सतत वेदना होतात.
- गर्भवती महिलेला पायात आणि तळपायात कळाहयेण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे स्नायूमध्ये अचानक आणि तीव्र वेदना होऊ शकतात.
- मूत्रामार्गातील संसर्ग खालच्या भागातील पाठीचे दुखणे आणि पोटाच्या खालच्या भागात वेदना होऊ शकतात..
- काही महिलांमध्ये, सांधे शिथिल होतात आणि कंबरेचा भाग अस्थिर होतो त्यामूळे कंबरेत आणि पायात वेदना होतात.
- एक्टोपिक गर्भधारणा, अशी परिस्थिती ज्यामध्ये जननक्षम अंडे गर्भाशयाच्या बाहेर रुजतात,त्यामूळे खूप वेदना होऊन ब्लीडींग होऊ शकते.
- अचानक झालेल्या गर्भपातामुळे सौम्य ते मध्यम प्रमाणात पाठदुखी होऊ शकते.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
गरोदरपणातील वेदनेचे निदान करण्यासाठी,डॉक्टर वैद्यकीय तपासणी करून वेदनेचे कारण जाणून घेतात.
डॉक्टर रुग्णाची शारीरिक तपासणी करून रुग्णातील लक्षणे लिहून घेतात.
गरोदरपणातील वेदना कमी करण्यासाठी खालील उपचार केले जातात:
- तोंडावाटे घेतली जाणारी औषधे जसे ओपीओईड ॲनलजेसिक्स, स्टेरॉईड नसलेली दाह नाशक औषधे (एनएसएआयडी) आणि वेदनाशामक औषधे वेदना कमी करण्यासाठी घेतली जातात.
- फेंटानिल पॅचेस मूळे सतत होणाऱ्या वेदनेपासून आराम मिळतो.
- वेदना कमी करण्यासाठी गर्भधारणेसंबंधी नसलेल्या कारणासाठी जसे गॉलब्लॅडरचा दाह, अपेंडिक्स फुटणे, मूत्राशयाचा खडा ,पेप्टिक अल्सर इत्यादी गोष्टींसाठी शस्त्रक्रिया केली जाते.