ऑरगॅनोफॉस्फेटची विषबाधा काय आहे?
शरीरात ऑरगॅनोफॉस्फेट टॉक्सिक पातळी पर्यंत असणे याला ऑरगॅनोफॉस्फेटची विषबाधा म्हणतात.हे या रसायनांच्या अपघाताने किंवा जाणीवपूर्वक संपर्कात आल्याने होते. ऑरगॅनोफॉस्फेट हे रासायनिक घटक आहे जे जंतूनाशक आणि कीटकनाशक यात असते. हे रोपांना आणि पिकाला कीटक, पेस्ट, आणि जिवाणू पासून वाचवते. विषबाधा वेगवेगळ्या मार्गाने होते, जसे तोंडावाटे, नाकावाटे (श्वासोच्छवास),नसेवाटे (इंजेक्शन),किंवा त्वचेतून. भारतात खेड्यामध्ये याची विषबाधा जास्त असल्याचे आढळले आहे.
याची मूख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहे?
कोणत्या मार्गाने आणि किती प्रमाणात ऑरगॅनोफॉस्फेट शरीरात गेले आहे,यावरून ऑरगॅनोफॉस्फेटच्या विषबाधेचे चिन्हे आणि लक्षणे किती गंभीर आहे हे ठरवण्यात येते.
- सौम्य विषबाधेची लक्षणे:
- डोकेदूखी.
- अशक्तपणा.
- मळमळ आणि उलट्या.
- खोकला.
- वाहते नाक.
- रक्तदाब कमी होणे.
- हृदयाचा वेग कमी होणे.
- मध्यम विषबाधेची लक्षणे
- श्वास घेण्यात त्रास होणे.
- गोंधळ.
- पोटात दुखणे.
- त्वचा कोरडी पडणे.
- स्नायूंचे आकुंचन पावणे.
- गंभीर विषबाधेची लक्षणे
- शुद्ध हरपणे.
- आकडी.
- पक्षघात.
- मलमूत्र विसजनावर ताबा न ठेवता येणे.
ऑरगॅनोफॉस्फेटच्या संसर्गानंतर लक्षणे 30 मिनिटे ते 3 तासात दिसतात.
याची मुख्य कारणं काय आहे?
ऑरगॅनोफॉस्फेट चा संपर्कामुळे शरीरात काही एन्झाइम अटकतात आणि त्यामुळे सौम्य,मध्यम,किंवा गंभीर लक्षणे दिसतात. विषबाधा स्वतःला हानी केल्याने किंवा अपघाताने होऊ शकते. कीटकनाशके किंवा जंतुनाशकांसोबत काम करतांना अपघाताने ऑरगॅनोफॉस्फेटशी संपर्क येऊ शकतो किंवा दूषित पाणी किंवा अन्न खाल्याने होऊ शकतो.
ऑरगॅनोफॉस्फेट हे अँटी-कोलिनेस्टरेज आहे,म्हणजे,ते कोलिनेस्टरेज एन्झाइम चे कार्य थांबवते. हा एन्झाइम न्यूरॉकेमिकल ॲसिटोकोलिन ला तोडतो. एन्झाइम चे विभक्त होण्याचे कार्य थांबवल्यावर, ऑरगॅनोफॉस्फेट खालील गोष्टी करतो:
- गंभीर कोलिनेर्जीक चे जीवघेणे संकट.
- इतर विकार जसे क्रेनियल नर्व्ह चा पक्षघात, श्वसनयंत्रणेचे स्नायू आणि इतर हाडाच्या स्नायूंचा पक्षाघात.
- मज्जातंतूला इजा होण्यात उशीर होणे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
ऑरगॅनोफॉस्फेट च्या विषबाधाचे निदान हे रुग्णालयात भरती झाल्यावर रुग्णाच्या लक्षणावरून आणि जवळचे नातेवाईक किंवा बघणाऱ्याकडून संपर्कात आल्याचा वैद्यकीय इतिहास घेऊन केले जाते. डॉक्टर ब्लड टेस्ट करून ऑरगॅनोफॉस्फेटमुळे शरीरात अटकाव करणाऱ्या एन्झाइम ची पातळी बघितली जाते.
सुरवातीच्या उपचारात आत गेलेले ऑरगॅनोफॉस्फेट बाहेर काढण्यासाठी पोट आतून साफ केले जाते. जर ऑरगॅनोफॉस्फेट व्यक्तीच्या कपड्यावर सांडले असेल,तर दूषित कपडे काढून आणि साबण आणि पाण्याने व्यवस्थित साफ करायला सांगितले जाते.श्वास घ्यायला त्रास होत असेल,तर कृत्रिम ऑक्सिजन दिला जातो आणि लक्षणांवर उपाय करायला आणि परिस्थिती आणखी खराब होऊ नये म्हणून योग्य औषधे दिली जातात. जर विष तोंडावाटे घेतलं असेल,न शोषलेले उरलेले विष जठरातून बाहेर काढण्यासाठी जठराला धुतले जाऊ शकते.