लठ्ठपणा - Obesity in Marathi

Dr. Anurag Shahi (AIIMS)MBBS,MD

January 27, 2019

March 06, 2020

लठ्ठपणा
लठ्ठपणा

सारांश

लठ्ठपणा ही जगातील सर्व लोकांना प्रभावित करू शकणारी एक दुर्लक्षित आणि कमी लेखली जाणारी वैद्यकीय अवस्था आहे. तिचे वैशिष्ट्य शरिरात अत्यधिक चरबी जमा होणें असून ती मुले आणि प्रौढ व्यक्ती दोघांमध्ये आढळते. लठ्ठ व्यक्तींच्या संख्येच्या बाबतीत अमेरिका आणि चीननंतर भारत जगात तिसर्र्या क्रमांकावर आहे. लठ्ठपणाशी संबंधित धोक्यातील घटके उदा. हृदयरोग, डायबेटीझ मेलिटसअतीतणाव (उच्च रक्तदाब), ऑस्टिओआर्थरायटीस आणि मूत्रपिंडरोग यांमुळे लठ्ठपणा सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. सुदैवाने, लठ्ठपणा निवारणयोग्य अवस्था असून प्रभावीपणे उलटवली जाऊ शकते. जीवनशैली व आहारातील बदल, शारीरिक हालचाली आणि शस्त्रक्रिया असाध्य लठ्ठपणापासून रुग्णांना बरे करण्यासाठी वापरल्या जातात.

लठ्ठपणा (स्थूलता) काय आहे - What is Obesity in Marathi

लठ्ठ असणें म्हणजे काय

लठ्ठ: हे शब्द ऐकल्यानंतर आपल्या मनात एक “जाड व्यक्तीची’’ प्रतिमा उभरते, जिला दुहेरी हनुवट्या असतील, खूप कॅलॉरी असतेल आणि तो शक्यतो काही शारीरिक हालचाली करण्यास असमर्थ असेल. हीच आपली नैसर्गिक प्रतिक्रिया नव्हे का? हो, नक्कीच लठ्ठ म्हणजे अधिक वजन, पण आपल्या सर्वांना हे माहीतच असेल असे नाही की हे वैद्यकीय समस्या आहे, जी शरिराच्या विविध भागांत शरिरातील चरबी असामान्यपणें जमल्याने येते ज्यामुळे शरिराचे वजन खूप वाढते आणि तिचे एकूण आरोग्यावर अनेक दुष्प्रभावे होतात.

तुम्ही हे निर्धारित कसे कराल की एखादी व्यक्ती अधिक वजनाची किंवा लठ्ठ आहे? उत्तर आहेः शरीर-भार सूचकांक. शरीर-भार सूचकांक एक सांख्यिकीय आकडा आहे, ज्याचे गणन तुमच्या उंची आणि वजनाच्या आधारे केले जाते. शरीर-भार सूचकांक मोजमाप एखाद्या व्यक्तीच्या लठ्ठपणाची गणना करण्यासाठी एक उपयोगी सूचक असू शकते.एखाद्या व्यक्तीचे वजन गरजेपेक्षा 20% असल्यास तिला लठ्ठ समजले जाते. तुमचे शरीर-भार सूचकांक 25 आणि 29.9 यांच्यामध्ये असल्यास, तुम्हाला अती वजनाचे समजले जाईल. तुमचे शरीर-भार सूचकांक 30 किंवा अधिक असल्यास, तुम्हाला लठ्ठ समजले जाईल.

तुमचे शरीर-भार सूचकांक 25पेक्षा अधिक असल्यास, तुम्ही वजन कमी करण्याच्या कार्यक्रमांचा विचार केला पाहिजे आणि शरीर-भार सूचकांक 30 पेक्षा अधिक असल्यास, तुम्ही वजन कमी करण्यासाठी डॉक्टरांकडून सल्ला घेण्याचा गंभीरपणें विचार करावा. हे महत्त्वाचे आहे, कारण लठ्ठपणामुळे इतर वैद्यकीय अवस्था उदा. मधुमेह, कॉरॉनरी हृदयरोग, अतीतणाव, बाधाकारक निद्राविकार, सांध्यांचे ऑस्टिओआर्थरायटीस इ. यांची शक्यता होण्याचा किंवा वाढण्याचा धोका असतो. ही अवस्था हाताळण्यातील पहिला टप्पा म्हणजे तुमच्या लठ्ठपणाचे मूळ कारण शोधून काढणें. तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनशैलीचे निरीक्षण किंवा डॉक्टर अगर पोषणतज्ञाच्या सल्ल्याद्वारे हे साध्य करू शकता.

तुम्हाला हे माहीत होते का?

तुमच्या कंबरेचे व्यास तुमच्या आरोग्याचे निर्धारण करणारे एक महत्त्वाचे घटक आहे. तुम्ही पुरुष असून तुमच्या कंबरेचे माप 94 सें.मी. (37 इंच) किंवा अधिक आणि तुम्ही स्त्री असून तुमच्या कंबरेचे माप 80 सें.मी. (31.5 इंच) किंवा अधिक असल्यास, तुमचे आरोग्य धोक्यात आहे.

लठ्ठ असल्याने तुम्हाला अस्वस्थता वाटू शकते आणि तुमच्या दैनंदिन जीवनांत अडथळे येऊ शकतात. तुम्हाला श्वास गेल्यासारखे वाटू शकते आणि तुम्हाला चालणें किंवा शारीरिकदृष्ट्या सक्रीय राहणेंही अवघड होऊ शकते. तुमच्या शरिराच्या मापात बसणारे कपडेही मिलणें अवघड होऊ शकते. लठ्ठ लोकांना खूप कमी काम करूनही खूप घाम येऊ शकतो. तसेच, तुम्ही लठ्ठ असल्यास, तुमच्या संवेदनांवरही प्रभाव पडू शकतो.तुमचे स्वाभिमान आणि आत्मविश्वास कमी होऊ शकते. लोकांनी नकारात्मकरीत्या तुमच्या लठ्ठपणावर बोट ठेवल्याने, तुम्हाला नकोशी, अपराधभावना,लाज आणि हेच नाही,तर अवसादही जाणवू शकतो. या सामाजिक दोषभावनांवर मात करण्यासाठी, आम्ही पुढील भागांमध्ये लठ्ठपणाची कारणे आणि निवारण यांबद्दल माहिती देऊ, जेणेकरून या स्थितीत बाहेर पडून एक निरोगी जीवन जगू शकाल.

Weight Loss Juice
₹539  ₹599  10% OFF
BUY NOW

लठ्ठपणा (स्थूलता) ची लक्षणे - Symptoms of Obesity in Marathi

लठ्ठपणाची सर्वांत सामान्य लक्षणे खालीलप्रमाणें

  • वजनामध्ये अवाजवी वाढ.
  • अत्यधिक वजनामुळे अनियंत्रित उच्च रक्तदाब आणि तणाव. 
  • दैनंदिन गतिविधी करतांना श्वासातील समस्यांना सामोरे जावे लागणें. 
  • अत्यधिक वजनामुळे सांधेदुखी.
  • अधिक कॉलेस्टरॉल पातळी.
  • अनियंत्रित भुकेचे झटके
  • अतिशय थकवा 

डॉक्टरांना कधी भेटावे

लठ्ठपणा कधीही वैद्यकीय आपत्स्थिती नसते. पण काही घटके आणि लक्षणे यांच्या आधारे, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायची योग्य वेळ निवडू शकाल. संशोधकांचा दावा आहे की, बहुतांश लोक मनोवैज्ञानिक व सामाजिक कारणांमुळे डॉक्टरांकडे जाण्याकडे दुर्लक्ष करतात किंवा टाळतात. हेही लक्षात आले आहे की, त्याने हा आजार बळावायलाच मदत होते.

तुम्हाला शरिराच्या वजनामुळे जिने चढणें, चालणें, पळणें आणि दैनंदिन गतिविधी करण्यासारखा गोष्टींत दररोज अडचण येत असल्यास, शक्य तेवढे लवकर डॉक्टरांना भेटावे, अशी आमची तुम्हाला नम्र विनंती आहे. अशा गतिविधी करण्यात अडचण असल्यास त्वरीत कार्यवाही करण्याची गरज आहे.

तुम्हाला खालील लक्षणे दिसल्यास, तुम्ही लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा:

  • उच्च रक्तदाब आणि श्वसनविकार
  • अन्नाच्या आचेसह झोप कमी होणें
  • हृदयात वेदना
  • वाढीव रक्तशर्करा किंवा मधुमेह
  • अवसाद आणि अतीतणाव
  • पचनतंत्र, यकृत आणि अमाशयातील समस्या
  • अधिक कॉलेस्ट्रॉल
  • गुडघे आणि पाठीच्या खालच्या भागात वेदना
  • अनुपयोगितेची जाणीव आणि उदासीनतेची प्रवृत्ती

लठ्ठपणा (स्थूलता) चा उपचार - Treatment of Obesity in Marathi

लठ्ठपणासाठी उपचाराची गरज केव्हा असते?

आहारात बदल केल्याने आणि शारीरिकदृष्ट्या अधिक सक्रीय राहिल्याने वजन घटले पाहिजे. तरीही, काही वेळेस, तुमचे डॉक्टर औषध किंवा वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेचा सल्ला देऊ शकतात, विशेषकरून जेव्हा  आहारातील बदल आणि व्यायाम केल्यानेच वजन कमी होत नसेल आणि दिनक्रमावर प्रत्यक्ष प्रभाव पडत असेल तर. 

वैद्यकीय उपचार:

डॉक्टरांद्वारे सुचवलेल्या अनेक औषधांचा आम्ही सल्ला दिलेला आहे, जे वैद्यकीय पर्यवेक्षणाखाली, पुढील आहार व व्यायामासह घेतली जाऊ शकतात, उदा.:

  • लहान मुले आणि लठ्ठ किशोरांसाठी, इंसुलिन प्रतिरोध आणि हायपरइंसुलिनेमेनिआच्या प्रसंगांत, मेटफॉर्मिन वापरले जाते.
  • हायपोथॅल्मिआशी निगडीत लठ्ठपणासाठी ऑक्ट्रिओटाइड वापरले जाते.
  • ऑर्लिस्ट्रॅट तुमच्या अन्नातील चरबी शोषण्यापासून शरिराला रोखते. 30 किंवा अधिक शरीर-भार सूचकांक असलेल्या आणि जीवनशैली व व्यवहार परिवर्तन प्रभावी नसलेल्या लोकांसाठी, याचा सल्ला दिला जातो.

तथापी, या सर्व औषधांचे सहप्रभाव असल्याने, त्यांना केवल नोंदणीकृत व्यावसायिकाच्या सल्ल्यानेच घेतले पाहिजे. गरोदर स्त्रिया, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी कोणतीही मात्रा सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांना भेट दिली पाहिजे.

शस्त्रक्रिया उपचार

एखाद्या व्यक्तीने वजन कमी करण्याच्या इतर सर्व योग्य पद्धती करून पाहिलेल्या असून अपयश असल्यास, आणि ती व्यक्ती शस्त्रक्रिया व सामान्य भुलीसाठी उचित असल्यास शस्त्रक्रियांचा सल्ला दिला जातो. शरीरभार सूचकांक 50 असल्यासच, सामान्यपणें शस्त्रक्रिया केली जाते. यासाठी  वैद्यकीय संज्ञा बॅरिएटिक शस्त्रक्रिया अशी आहे. दोन सामान्य प्रकारच्या शस्त्रक्रिया म्हणजे गॅस्ट्रिक बॅंडिंग आणि गॅस्ट्रिक बायपास. त्यामध्ये तुम्हाला कमी जेवता यावे म्हणून पोटाचा आकार कमी करणें किंवा तुमच्या शरिराने कमी अन्न अवशोषावे म्हणून, तुमच्या गटचा भाग बायपास करणें सामील आहे. बॅरिअटिक शस्त्रक्रियेनंतर तुम्हाला दीर्घकालिक उपचार आणि पाठपुरावा कार्यक्रमातून जावे लागते. 

जीवनशैली परिवर्तन

तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल करेपर्यंत, औषधे घेतल्याने किंवा शस्त्रक्रिया केल्याने प्रभाव पडत नसल्याचे पाहण्यात आलेले आहे. शस्त्रक्रियेनंतरही, जीवनशैली उचित नसल्यास, तुम्हाला काही वर्षानंतर परत वजनवाढीला सामोरे जाऊ लागू शकते. केवळ खालील टिपण्यांचे अनुसरण करून व्यक्ती योग्य प्रकृती राखू शकते. 

  • शारीरिक क्रियांमध्ये सुसंगत रहा
  • सही मात्रा में भोजन और सही भोजन 
  • पुरेपूर झोप घेणें (कमीत कमी 6-8 तास). 
  • अधिक शर्करा असलेल्या वस्तू टाळणें (बेकरी पदार्थ, चॉकलेट, गोड पदार्थ)
  • प्रक्रिया केलेले अन्न आणि जंक फूड टाळणें
  • मद्यपान कमी करणें
  • वजनात नियमित निरीक्षण ठेवणें.
  • वर्षातून एकदा संपूर्ण शरिराची तपासणी करवून घेणें
  • सहा महिन्यांतून एकदा नियमित रक्तचाचण्या
  • आहारात तंतू, फळे, भाज्या, सहज प्रथिने, विविध धान्यातील कार्बोदके, डेअरी पदार्थ सामील करणें.
  • डॉक्टरांच्या सल्लेनुसार औषधे घेणें. थायरॉयडसारख्या विशिष्ट आरोग्य अवस्थांना दैनंदिन औषधांची गरज असते, ज्यांशिवाय वजनवाढ होऊन इतर प्राणघातक अवस्थांचीही शक्यता वाढू शकते.
Amla Juice
₹269  ₹299  10% OFF
BUY NOW


संदर्भ

  1. National Heart, Lung, and Blood Institute [Internet]: U.S. Department of Health and Human Services; Overweight and Obesity
  2. World Health Organization [Internet]. Geneva (SUI): World Health Organization; Obesity.
  3. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Overweight & Obesity
  4. National Health Service [Internet]. UK; Obesity.
  5. National Health Information Center, Washington, DC [Internet] U.S. Department of Health and Human Services; Obesity Prevention

लठ्ठपणा साठी औषधे

Medicines listed below are available for लठ्ठपणा. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.