न्युट्रोपेनिया म्हणजे काय?
न्युट्रोपेनिया ही रक्तातील न्युट्रोफिल्स ची पातळी कमी होण्याची स्थिती आहे. न्युट्रोफिल हा पांढर्या रक्तपेशी चा प्रकार असून हाडामध्ये तयार होतो, जो तुमच्या शरीराला जंतुंशी लढून संसर्गा पासून वाचवतो. जर न्युट्रोफिल्सची पातळी रक्ताच्या प्रत्येकी 1500 मायक्रो लिटर कमी झाल्यास तुम्ही न्युट्रोपेनिक असल्याचे म्हणले जाते.
न्युट्रोपेनिया असणाऱ्या लोकांमध्ये कमकुवत प्रतिकार शक्ती मुळे संसर्गाचे वाढते धोके दिसून येऊ शकतात.
याची प्रमुख कारणे व लक्षणे काय आहेत?
न्युट्रोपेनियाशी निगडित कोणतीही विशिष्ट लक्षणे नाही आहेत. तो संसर्ग झाल्यानंतर निष्पन्न होतो. संसर्गाच्या बाबतीत सामान्यपणे दिसणारी लक्षणे पुढीलप्रमाणे:
- थकवा.
- खूप ताप.
- थंडी वाजणे.
- पोटदुखी.
- जुलाब.
- पुरळ.
- कफ, श्वास घेण्यात त्रास.
- घसा सुजणे.
- मुत्रविसर्जनावेळी दुखणे.
- जखमे भोवती लालसरपणा दिसणे.
याची मुख्य कारणे काय आहेत?
कर्करोग उपचार हे न्युट्रोपेनिया च्या महत्त्वाच्या कारणांपैकी एक आहे. त्यामध्ये केमोथेरपी (औषधासोबत), रेडिओ थेरपी (किरणासोबत) बायोथेरपी (जीवांपासून मिळविलेले पदार्थ). हे उपचार कर्करोगाच्या पेशी व सामान्य पेशी यामध्ये फरक करू न शकल्यामुळे सर्व पेशी संपवतात. इतर कारणे पुढीलप्रमाणे आहेत:
- बॅक्टरिया आणि व्हायरल संसर्ग.
- अप्लास्टिक ॲनेमीया सारखे हाडांचे विकार.
- लिमफोमा आणि ल्युकेमिया सारखे ट्यूमर्स.
- प्लिहा सुजणे.
- रिह्युमेटोईड अर्थ्रायटीस, हायपर थायरॉयडिस्म, लुपस सारखे ऑटो इम्यून आजार.
- हायपर थायरॉयडिस्म साठीची औषधे.
- व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता.
- एचआयव्ही संसर्ग.
- अवयव प्रत्यारोपण.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
रक्तातील न्युट्रोफिल्सची पातळी तपासण्यासाठी डॉक्टर तुम्हाला रक्त तपासणी करण्याचा सल्ला देतात. जर न्युट्रोपेनियाचे कारण स्पष्ट न झाल्यास, डॉक्टर बोन मॅरो मधील विकार तपासण्यासाठी बोन मॅरो चाचणी करण्याचा सल्ला देतात.
न्युट्रोपेनियाचे उपचार त्याच्या कारणानुसार बदलतात. संसर्गा च्या बाबतीत अँटीबायोटिक्स घेण्याचा सल्ला दिला जातो. केमोथेरपी मध्ये, उपचाराच्या 2 आठवड्यात न्युट्रोफिल चा आकडा कमी होतो आणि 3-4 आठवड्यात तो सामान्य पातळीला पोचतो. जर सामान्य पातळी गाठण्यास अपयश आल्यास वाढीव घटकांसोबत उपचार सुरू केले जातात जे बोन मॅरो पासून पांढऱ्या रक्त पेशी चे प्रमाण वाढवले जाते. हा महाग उपचार असून, सर्वांना परवडणारा नाही आहे.